Skip to main content

विरंगुळा

Wrong Number

लेखक NiluMP यांनी शुक्रवार, 06/02/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लँडलाईनच्या काळात राॅंग नंबर म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी होती. टेलेकम्युनिकेशन आणि मोबाईल क्रांतीमुळे त्यातुन सुटका झाली. पण मार्केटिक काॅलमुळे नवीन डोकेदुखी सुरु झाली पण राॅंग नंबर व मार्केटिक काॅलमुळे करमणूकही होते कशी याचेच काही किस्से मी सांगाणार आहे किस्सा 1. सर्वसाधारणपणे आपण ज्याला फोन करतो त्याची खात्री करुन आपल्याला ज्याच्याशी बोलयचे आहे त्याचे नाव सांगतो.

एम. एस. ई. बी. आणि संस्कार !

लेखक म्हया बिलंदर यांनी गुरुवार, 05/02/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.? पलीकडून - हं बॉला? म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये. पलीकडून- बरं . म्हया बिलंदर - अहो, बरं काय? कोणाला तरी पाठवून बिघाड दुरुस्त करून घ्या. पलीकडून - हं, येईल १५ मिनटात . म्हया बिलंदर - कोण? पलीकडून - कोण म्हणजे? म्हया बिलंदर - कोण म्हणजे, वीज की तुमचा माणूस? पलीकडून - माणूस. म्हया बिलंदर - मग वीज? पलीकडून - तिथून पुढं १५ मिनटात. म्हया बिलंदर - अहो, संध्याकाळ झालीये पूर्ण काळोख पडलाय. मुलांचा आभ्यास जेवण सगळं राहिलंय आणि… (पलीकडून खड्याक.

दहशतवाद म्हणजे काय?

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 05/02/2015 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
तर दहशतवाद काय असतो हे समजुन घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. उदा. एक नवरा असतो आणि त्यांची एकुलती एक बायको असते. (सगळ्याची एकुलती एक बायको आणि एकुलता एक नवरा असतो, हा अपवाद असतात काही ज्याच्या काही उपशाखा असतात ज्या अनधिकृत असतात). तर असो. भावना म्हटले कि अवांतर आलेच. तर फेब्रुवारी आला आहे, प्रेमाचा महिना आहे, बायकोला कचेरीत काही काम नसते, नवऱ्याच्या सोबत घालवलेले काही प्रेमळ क्षण आठवून नवऱ्याशी काही प्रेमयुक्त गुंज मनीचे करण्यासाठी ती नवऱ्याच्या कचेरीत त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क न करता त्यांच्या कचेरीच्या दुरध्वनीवर संपर्क करते. अनायासे नवऱ्याची जेवणाची वेळ झालेली असते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 05/02/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..! पुढे चालू.... ======================= त्या रात्री.. मला झोप अशी नीट येतच नव्हती. मनात एकच विचार येत होता. माणूस.. हा, आधी सदाचारी असल्याचा दिसतो,आणि मग.. धर्म त्यामागून डोकावल्यासारखं का वाटतं?

माझे स्मार्टपण !

लेखक स्नेहन्कित यांनी बुधवार, 04/02/2015 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून ,.... माझे माहेरपण, किव्वा माझे बालपण, असे काहीतरी वाचकाच्या मानता यावे, हा उद्देश ! कारण, एखादी नववधू, जेव्हा लग्न करायचे ठरवते, त्यानंतर साधारण, १-२ वर्ष ती आणि तिचे कुटुंब, चांगल्या स्थळाचा शोध घेतात, ४ ठिकाणी चौकशी करतात, इतराना लाभलेल्या नवर्यांचे भले बुरे गुण जाणून घेतात आणि मगच योग्य त्या स्थळाशी सौरिक जूळवतात. इतके सारे करून देखील, सप्तपदी मधील शेवटचे पा उल टाकताना ती शासंक असते … काय होईल ?, कसे होईल?, मला जमेल का ?...माझे आयुष्य कायमचे बदलून जाणार ….मी चांगला निर्णय तर घेतला आहे ना ?….

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 03/02/2015 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. सगळे आनंदानी ओरडायचे:- "अग्नि नारायण भगवान की...........................जय!" पुढे चालू... ============================ आणि मग ते घमेलं यजमान पत्नी कडून पूजन करून घेऊन, अग्निमुख नावाचा यज्ञपूर्व होमंसंस्कार सुरु झाल्यावर कुंडात मध्यभागी ओतल जायचं. बास्स! आणि एकदा का हा मेनपॉइंट ऑफ दि गेम नीट झाला,की मग..माझी आणि सुर्‍याची चक्र फिरायला सुरवात व्हायची. मग होमकुंडाभोवती सर्वत्र आसने लावणे. त्यां'समोर यज्ञाची हविर्द्रव्य (आहुतींचे पदार्थ) नीट लाऊन ठेवणे.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/02/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
a (पुस्तक-परिचय ) शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २.

डेथ ऐप्लिकेशन

लेखक म्हया बिलंदर यांनी रविवार, 01/02/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर - ह्यालो मी - हं सर बोलाना ? सर - आरं आईक की. . मी - हं सर - त्यो आपला ह्यो हाय का.. गणू ? मी - म्हणजे डॉ. गणेश ना? त्याचं काय? सर - हा त्योच, त्याचा बा म्येलाय तर त्यो गेलाय सुट्टीवर मी - अरेरे. . वाईट झालं. सर - तर त्याला लिहायचय डेथ ऐप्लिकेशन. मी - सर, लीव ऐप्लिकेशन सर - त्येच, मी सुरुवात करून दिलीये फुडच्या दोन ओळी जरा सांगचिल का ? मी - हो सर, काय लिहिलंत? सर - Dear Sir, आता सांग. मी - Dear Sir, I am sorry to inform… सर - Sorry? Sorry कशाला?

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २७ (यज्ञयाग विशेष!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 31/01/2015 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. शिवाय.. दरवर्षी एका माजी विद्यार्थ्याला अनुष्ठानाचं यजमानपद लाभत असे. आणि तो नुकताच विवाहित झालेला असेल..तर गुरुजि अगदी हमखास त्यालाच बसवणार्,हे ही ठरलेलं असे. पुढे चालू... ======================= आमचा अनुष्ठानाचा महिना कोणता? तर पौष. दरवर्षीचा अगदी ठरलेला. मग आंम्ही रानातून सदाशिव दादा बरोबर जाऊन लाकडं/फाटी/गाठी आणि येता जाता जेव्हढ्या म्हणून गोळा होतील तेव्हढ्या शेण्या समिधा असं अगदी १ महिना आधिपासून आणून गोठ्यामागे रचायला लागायचो.