अनाहिता इन रसायनी
मागचा कट्टा होऊन तीन चार महिने होऊन गेले. सर्व अनाहितांना पुन्हा भेटण्याचे वेध लागले. मग प्रस्ताव आला. निमंत्रक मुंबईकर अनाहिता. चर्चा झाल्या. ठिकाणं चाळली गेली. तारखांसाठी पानं फडफडवून झाली. कुठून कोण कोण येणार याची यादी झाली. आणि शेवटी कट्टा ठरला. बहारीनहून विशाखाताई आणि जर्मनीहून स्वातीताई याच काळात पुणे मुंबईत येणार होत्या. त्या दोघींनीही यायचं नक्की केलं. उत्साह अजून वाढला. ठिकाणाच्या बाबतीत अजून गोंधळ होते. त्या चर्चांचा कंटाळा येऊन अजयाने तिचं घर हे ठिकाण फायनल केलं !
आणि काउंटडाऊन सुरू झाला. तेवढ्यात ते मेलं अनाहिता बंद पडलं. मग कसंकाय वर भागवलं.
मिसळपाव