Skip to main content

विरंगुळा

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

लेखक स्वप्नांची राणी यांनी शनिवार, 31/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 29/01/2015 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मग मी,गुरुजी आणि बाकिचे सर्व विद्यार्थी, तो परिक्षे आधीचा महिना-फुल्ल तयारी करून..परिक्षा द्यायला निघालो- ते महाराष्ट्राच्या एका महान शहरात...म्हणजे कुठे???? तर ................." पुढे चालू... ============================== म्हणजे कुठे???? तर होय हो!..तुमचे पुणे - "ते विद्येचे माहेरघर-पुणे !ते मंडईचे पुणे..ते गणपति मारुतिंचे पुणे!.. ते शनिवारवाडा आणि लालमहालाचे पुणे!" काय आहे ना? आमचा काका नेहमी म्हणायचा, "या पुण्याची तारिफ नाहि केली ना?

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 27/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. गुरुजिंच्या या वागण्याचा पाठशाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर असा काहि जबरदस्त परिणाम घडलेला असायचा. कि तो विद्यार्थी कित्त्तीहि स्वच्छंदि वगैरे असला,तरीही...जर पड्लच काहि चुकिचं पाऊल,तर ते पडण्याआधी गुरुजिंचा चेहेरा त्याच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नसे! पुढे चालू... ============================== दिवसामागुनी दिवस चालले... ह्या गाण्यातील ओळींप्रमाणे त्यातला पुढचा जो भाग , तो जीवलगा..कधी रे येशील तू??? हा ही वेदपाठशाळेच्या-हरएक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातला समान धागा..

सरस्वती पूजन

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 26/01/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.

उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. विवेक पटाईत ह्यांच्या लेखात केवळ वसंतपंचमीचाच उल्लेख आहे. मात्र सुगी साजरी करण्याचे मार्ग अनेक आहेत! चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!

गुपित- एक गुढ रहस्यमय रुपक कथा -एकाच भागात संपुर्ण

लेखक जेपी यांनी सोमवार, 26/01/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
"कस होणार या पोराच !." पार्थचे बाबा ,पार्थाच्या आईकडे पहात म्हणाले. "जाऊ द्या हो, अजुन लहान आहे आणी काही वाईट तर करत नाही ना!." पार्थची आई. पार्थ मात्र स्वतः मध्येच मग्न होता.पार्थ लहान असताना हातात उदबत्ती घेऊन बोबड्या भाषेत देवापुढे..जय..जय..करायचा तेंव्हा सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायच, पण पार्थ आता आठ वर्षाचा झालता.सुट्टीच्या दिवशी त्याच आवडत काम म्हणजे,देवाची पुजा करणे..देवपुजे मध्ये तो तास-दोन तास सहज रमुन जायचा.देवांना स्नान घालणे,वस्त्रानीं पुसणे. त्यांना गंध लावुन जागे वर ठेवणे हे मन लावुन करायचा.नंतर पाच-दहा मिनीट हात जोडुन प्रार्थना करायचा. पार्थ लहानपणापासुन आपल्या आजोबांना पुजा क

पोपटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 23/01/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/01/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे.. पुढे चालू... ======================================= पहिले सहा महिने संपले..दिवाळीची सुट्टीही झाली. आणि आंम्ही सर्व मुलं पळत पळत पाठशाळेत परत आलो. अगदी ठरल्या दिवशी! माझ्या घरून निघायच्या एक दोन दिवस अलिकडे तर.. आज्जीला, माझ्यावर शाळेतून कुणी चेटूक केलय की काय???

ते तिघं !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 22/01/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
ते तिघं सध्या आपल्या सगळ्यांच्या घरात धुमाकूळ घालतायेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर घरात राहणं मुश्कील होईल. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आपलं कुटुंबप्रमुख पद त्यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतं. आणि आपण काहीही केलं तरी त्यांना आता अवरु शकत नाही. ये हमारे बस की बात नही!! आता तुम्ही विचाराल , हे कोण तुर्रमखान ? त्यांची ओळख काय ? त्याचं कर्तुत्व काय ? ओळख म्हणाल तर आपल्या रोजच्या सक्तीच्या पाहण्यातले. कर्तुत्व म्हणाल तर अफ़ाट ! अचाट ! पहिला -- आजीने कष्टाने उभे केलेल्या गृह उद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री !