Skip to main content

विरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३५ (विवाह विशेष...-२)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/03/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मागुन येऊन मग मला अचानक काकूनीच जागं केलन. "अरे आत्मू..आता जरा ध्यानातून बाहेर ये...आणि तुझ्यासाठी जे ध्यान तिकडे आत डोळे-लावून बसलय ना? त्याच्यासाठीच्या तयारीला लाग..जा .. आवरायला घे त्या शेजारच्या घरात जाऊन... जा!" असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन... पुढे चालू... ============================ वस्तुतः आमची मित्रमंडळी आणि मी स्वतः देखिल,या आदल्या दिवशी वांङनिश्चय वगैरे करण्याच्या विरोधी होतो.

मालती-माधव...एक लघुकथा...इथेच पूर्ण केली आहे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/03/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मालती-माधव... भाटगरच्या त्या अथांग जलाशयाच्या काठावर मी माझ्या गाडीला टेकून उभी होते. थोड्या अंतरावर एका सिमेंटच्या बाकावर एक वृद्ध स्त्री म्हणजे माझी मालतीआजी डोळे मिटून मागे टेकून बसली होती. तिच्या अंगावर उगाळलेल्या चंदनाच्या रंगाची साडी होती. तिने डोक्यावरुन पदर घेतला होता. त्या साडीचे मरुन रंगाचे काठ मागेच असलेल्या लालचुटूक रंगाच्या फुलांना फिके पाडत होते. आजवर मी तिला याच रंगाच्या साडीत पाहिले होते. पण त्याने काय फरक पडला असता ? तिच्या खानदानी सौंदर्याचा प्रभाव समोरच्यावर सहज पडत असे. मालतीआजी जर कधी बोलली तर मात्र तिच्या विद्वत्तेचा अंदाज समोरच्याला येत असे. पण असे प्रसंग विरळाच.

अवताराची गोष्ट....

लेखक जेपी यांनी शनिवार, 14/03/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
पिढीजात चालत आलेली गावची देशमुखी सांभाळणारा संपतराव तसा भला माणुस..सगळ्या गावचा कारभार पहात होता.. त्याच्या बद्दल कुणी वाईट-वक्कट बोलायच नाही..संपतराव सगळ्याच्या मदतीला धावायचा. तरी त्याला स्वतःला पोर नसल्याच दुखः होत.लग्नाला पाच वर्ष होऊन गेलती..सगळे देव,तिर्थ्,डॉक्टर पालथे घालुन झाले.. देशमुखाला आपला वारसा कोण चालवणार याची काळजी लागुन राहीली.. देवान बहुतेक त्याच आईकल..उशीरा का होईना घरात पाळणा हलला..देशमुखाला आभाळ ठेंगण झाल.. योगायोगान त्या वेळेस गावात भागवत सप्ताह चालु होता..देशमुखाने..भागवतकार पुराणीक बुवांना घरी बोलवल.. बुवा आले..देशमुखाने आदरभावाने त्यांचा पाहुणचार केला..पोराला त्यांच्

एक संवाद - १

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 12/03/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी. संगणकावर चॅटींग सोफ्टवेअरवर चालू असलेला संवाद - तो - हाय ती - हेलो तो - कधी आलीस ? ती - आत्ताच आलीय. १५ मिनिटे झालीत. ट्राफिक जास्त होते आज. तो - ओके, चहा झाला का? ती - नाही जातेय आता. तो - मीपण जातोय चहासाठी, कँटीन मध्ये येतेयस का? ती - नाही मी जागेवरच चहा घेऊन येतेय. तो - ठीक आहे. डब्यात काय आणलं आहेस ? ती - कालचा उरलेला भात होता त्याला नवऱ्याने फोडणी दिली, तोच घेऊन आलेय. तो - ओके. लकी आहेस. ती - का ? तुला नाही का करून दिले काही बायकोने? तो - तीचे जाउदे गं…. तुला माहीत आहे ना.

गृहिणी......आदरांजली-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आदरांजली-२ इस्मत चुगताई : (१९११-१९९१) त्यांच्या काळातील बंडखोर व रुढींवर, ढोंगीपणावर विनोदाच्या अंगाने आसूड ओढणारे लेखन ही यांची खासियत. त्यासाठी त्यांनी बरीच किंमत मोजली पण चातुर्याने त्या त्यातून सहिसलामत पार झाल्या. त्या काळात असे लेखन करणे किती अवघड असेल याची आपण कल्पना करु शकतो.... का आजच्या काळात ते त्याहून कठीण आहे ......? या कथेत पुरुषी अहंकार, एका स्त्रीकडे माणूस म्हणून न बघता स्त्री म्हणूनच बघण्याचा समाजाचा हट्ट, चांगल्या घरची व वाईट घरची हा भेदभाव, नैसर्गिक भावना, बंधने, माणसाच्या मनात चाललेले खेळ..... इ.वर इस्मतआपाने चांगला प्रकाश टाकला आहे.

घनचक्कर घोरींचे घनघोर-चक्र

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 11/03/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘सईमावशी, तू, आदिमामा, संतोषकाका आणि ती प्रतिगामी शिल्पा असे बूर्झ्वा लोक्स माझ्या डिसीजनला बिलकुल धक्का लावू शकत नाहीत !’ स्वराने त्वेषाने हातातला काटा समोरच्या प्लेटमधल्या इडलीत खुपसला आणि दुसऱ्या हातातल्या चमच्याने झटक्यासरशी तिचे दोन तुकडे केले ! इडलीच्या जागी तिला प्रतिगामी शिल्पा, तिची साक्षात जन्मदात्री दिसत असावी की काय अशी मला शंका आली. ‘अगं, आमची काय बिशाद तुला धक्का लावायची ! ..आय मीन, तुझ्या डिसीजनला..

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३४ (विवाह विशेष...)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 11/03/2015 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. अरे व्हायचं काय आणखिन आता त्यात?...तिच्या आई बापास सगळे बोललो नीट.आणि पुढल्या पौर्णिमेच्या मुहुर्ताला 'बैठकिचे' - सगळे ठरवुन आलो...आता दे बरं मला टाळी!" पुढे चालू... ================================== आणि मग,झाली...अखेर ती बैठक की कायशी म्हणतात ज्याला जुन्या श्टाइल मधे.., ती बैठक झाली. फक्त उलट आश्चर्य म्हणजे, बाबां ऐवजी आज्जीच आमच्या विवाहास 'कमी वय' म्हणून 'अजुन चांगली(?) दो.......न वर्ष जाऊ देत,मग करा लग्न' असा आक्षेप घेत होती. पण शेवटी काकानी आज्जीला. "आगो मायो माझे...