Skip to main content

विचार

विचार — वैचारिक मराठी लेखनाचा विभाग. तत्त्वचिंतन, समाजचिंतन आणि जीवनमूल्यांवरील मराठी विचार येथे वाचा व चर्चेत सहभागी व्हा.

पालकांनी उत्तीर्ण करण्याची अकरावी प्रवेशपरिक्षा: काही प्रश्न व सुचना

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 26/05/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.

अकरावी प्रवेश सुरळीत व कमी कटकटीचा होण्यासाठी अनेक घटक, शासन, महाविद्यालये आपपल्या परीने प्रयत्न करीत असतातच. परंतू मला काही सुचना द्यायच्या आहेत व काही साधे प्रश्न विचारायचे आहेत.

प्रश्नांच्या उत्तरासाठी जाणकार मिपाकर ह्यांच्या मदतीची अपेक्षा आहे व सुचनांची पडताळणी व्हावी आणि आपणही सुचना ह्या धाग्यात द्याव्यात. जर त्या सुचना यदाकदाचित योग्य व्यक्तिंनी पाहिल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल अशी माफक अपेक्षा मला आहे.

***[संगणकाव्दारे वर्गीकरण करुन प्रवेश देण्याची बातमी वाचली आहे. ते जर होऊ शकले नाही तर काही सुचना व प्रश्न लागू पडतील]***

प्रश्न:

मनासारखे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/05/2009 09:13 या दिवशी प्रकाशित केले.

हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे

तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे

मुठीत बांधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे

खुळे तुझ्या स्वप्नात जागते,
मना करू दे मनासारखे

दंवात न्हाते पहाट ओली,
धुके झरू दे मनासारखे

सुरांसवे माझ्या काव्याचे
दुवे जुळू दे मनासारखे

पसायदानी मागे ज्ञाना,
जनां मिळू दे मनासारखे

मौन तुझे

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 23/05/2009 07:03 या दिवशी प्रकाशित केले.

बोल एकदा काहितरी रे
मौन तुझे घायाळ करी रे

कातर हळवी सांज गातसे
तरल विराणी दर्दभरी रे

श्रावणातही तळमळते मी
झेलुनिया अलवार सरी रे

जाणवते ती तुझी असोशी
इथे दाटतो श्वास उरी रे

देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे

अंतरण्याने अंतर वाढे
मिटव दुरावा हा जहरी रे

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे

जवाबः शहरातला आणि खेड्यातला मुलगा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/05/2009 20:25 या दिवशी प्रकाशित केले.

पाषाणभेद यांनी शहर किती वाईट आणि खेडं किती चांगलं हे इथे सांगितलं आणि मग मी विचार केला का बरं लोकं एवढं चांगलं खेडं सोडून शहरात येत असतील? नारायणगावच्या आसपास किंवा, ट्रेकच्या निमित्ताने अधूनमधून पाहिलेली खेडी माझ्या शहरी नजरेला अशी दिसली!

असेल तुझ्याकडे टीव्ही तरी
घरी तुझ्या वीज असते काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खात असशील तू भाकरी तरी
बरोबर भाजी मिळते काय?

नाय बॉ नाय नाय बॉ नाय

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

लेखक भोचक यांनी बुधवार, 20/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.

''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

कोण म्हणाले

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/05/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

कोण म्हणाले हे तुजला ; ऐसे मी करणार नाही
खोट्या शपथाना या पुढे अजिबात बधणार नाही

दिल्या घेतल्याशिवाय होतात व्यवहार हे मी सांगणार नाही
दिल्या घेतल्या शिवाय व्यवहार अजिबात मी करणार नाही

प्रतीज्ञेत " भावंड्"म्हणेन; आप-पर मानणार नाही
स्वार्थ माझा येता समोरी ; आप-पर जाणणार नाही

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे मिथ्य मांडणार नाही
"दिल्या घेतल्याने होत आहे आधी दिलेघेतलेची पाहिजे: हे सत्य सोडणार नाही

जमवेन जरी नाठाळांची गर्दी ;नाठाळ मी ठरणार नाही
तालावरी नाचेन त्यांच्या मग विरोधच उरणार नाही

बेणारे

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 19/05/2009 01:36 या दिवशी प्रकाशित केले.

बेणारे

युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या
शोकसंघर्षातून गर्वल्यालेला
बधिराsकांत

तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित
सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक
बाजारगप्पा

चिअर्स चिअर्स

आणि विद्धनजरेने पहायची
पैलतीरावरच्या
बेणारेची सुटकाधडपड

किंवा वितळून राहायचे
ऐलतीरी झारीतल्या
शुक्राचार्यासारखे

आळोखे पिळोखे देऊन
कंटाळा आल्यावरती
मात्र टाळ्या पिटून
निघून जायचे

उगाच तो आकांत
मनाला चिकटला तर काय घ्या

म्हणत म्हणत की
"अशी धडपड अनुभवायची
म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "?

एकम् सत्

लेखक विकास यांनी सोमवार, 18/05/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.

अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 18/05/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.

आजच्या जीवनात सर्वानाच वाढत्या वजनाची काळजी लागलेली असते. वजन ही अशी गोष्ट आहे की जी वाढताना कळत नाही. पण उतरवताना खिशासहीत सगळेच हलके करते.
मी एक अनुभव घेतलेला आहे त्यामुळे वजन एका रात्रीत ( म्हणजे "ओव्हरनाईट" उगाच अपसमज नकोत) दोन ते अडीच किलोने कमी होउ शकते.
कोणतेही विनोदी व्यायाम प्रकार न करता / कोणतेही महाग औषधोपचार न करता वजन दोन ते अडीच किलोने कमी करणे शक्य आहे का?
अनुभवान्ती म्हणेन हे सहज शक्य आहे.
कसे?...... किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे? ...................................................................