मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पालकांनी उत्तीर्ण करण्याची अकरावी प्रवेशपरिक्षा: काही प्रश्न व सुचना

अमृतांजन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अकरावी प्रवेश सुरळीत व कमी कटकटीचा होण्यासाठी अनेक घटक, शासन, महाविद्यालये आपपल्या परीने प्रयत्न करीत असतातच. परंतू मला काही सुचना द्यायच्या आहेत व काही साधे प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्नांच्या उत्तरासाठी जाणकार मिपाकर ह्यांच्या मदतीची अपेक्षा आहे व सुचनांची पडताळणी व्हावी आणि आपणही सुचना ह्या धाग्यात द्याव्यात. जर त्या सुचना यदाकदाचित योग्य व्यक्तिंनी पाहिल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल अशी माफक अपेक्षा मला आहे. ***[संगणकाव्दारे वर्गीकरण करुन प्रवेश देण्याची बातमी वाचली आहे. ते जर होऊ शकले नाही तर काही सुचना व प्रश्न लागू पडतील]*** प्रश्न: १. दहावीच्या निकालानंतर प्रत्येक महाविद्यालय किती दिवस अधिकृतपणे प्रवेशप्रक्रिया चालू ठेवते? १.१ एखाद्या महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया संपली हे कसे कळते? त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातच चौकशी करावी कागते का? १.२ कोणत्या शाखेत प्रवेश मिळाला हे कधी कळते? त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातच चौकशी करावी कागते का? २. प्रत्येत महाविद्यालयाचा अर्ज विकत घेण्यासाठी किती वेळ रांगेत सरासरी तास घालवावे लागतात? ३. प्रत्येक महाविद्यालयात अर्ज देण्यासाठी किती वेळ रांगेत सरासरी तास घालवावे लागतात? ४. एका महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया संपूर्णपणे पार पाडण्यासाठी एंड-२-एंड किती वेळ जातो? ५. एखाद्या महाविद्यालयाचा प्रवेश रद्द करायला काय करावे लागते? त्यासाठी किती वेळ जातो? किती चकरा माराव्या लागतात? ६. प्रत्येक महाविद्यालयात ४ चाकीची पार्कींग व्यवश्था असते का? ७. किती दिवस सुटी पालकांनी घ्यावी लागते? ८. पुण्यात/मुंबईत किती महाविद्यालये अकरावीसाठी व शाखेसाठी आहेत हे कुठे कळते? त्यांचे पत्ते कुठे मिळतील? ९. प्रत्येक महाविद्यालयात मागील वर्षी कोणत्या शाखेत किती टक्क्यांना प्रवेश दिला गेला हे कुठे कळते? १०. प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश क्षमता किती आहे हे कुठे कळते? सुचना: १. कोणत्यातरी तर्कशुद्ध वर्गवारीने काही-काही महाविद्यालये एकत्र (गट) येऊन एक-खिडकी योजना शहराच्या काही भागात चालू करु शकतील का? पालक पैसे, कागदपत्रे, फोटो सगळे घेऊन एका खिडकीतून सगळ्या गटाचे प्रवेश अर्ज घेऊन, दुसऱ्या खिडकीत सगळ्या महाविद्यालयाचे अर्ज देऊ शकले तर फार वेळ, पेट्रोल, सुट्या [ह्या सुट्या विकल्यातर मिळणारे पैसे हजारात असतात त्यामुळे त्याही प्रवेश खर्चात धराव्या लागतात], मनस्ताप वाचेल. २. प्रत्येक महाविद्यालयाने प्रवेश अर्ज घेण्यासाठी [व नंतर भरण्यासाठी] क्रमाक्रमाने विद्यार्थ्यांना बोलवावे- क्रम ठरवण्याचे हे मार्ग असू शकतात- अल्फाबेटीकली, शाखेप्रमाणे इतर. ह्यात सगळ्या महाविद्यालयांचा समन्वय असावा. ह्याचे फायदे- २.१ शहरातील सगळ्या महाविद्यालयांनी निकालाच्या आदल्यादिवशी पेपर मध्ये एकाच ठिकाणी हे प्रसिद्ध करावे. त्यामुळे पालकांना कोणत्या दिवशी कुठे जायचे आहे ते कळेल. २.२ महाविद्यालयांना प्रत्येक दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संखेचा अंदाज येईल. ह्यासाठी दहावी बोर्डाची मदत होऊ शकेल व त्या-त्या शहरातील विद्यार्थ्यांची नावे कळतील. शक्यतो विद्यार्थी काय निकष लावून प्रवेश घेतात हे संख्याशास्त्राचे नियम वापरुन माहित होऊ शकते. त्याप्रमाणे त्यांनी सोय करुन दिल्यास कमीतकमी वेळेमध्ये प्रत्येक प्रवेशप्रक्रिया पार पडू शकेल २.३ ज्यांना अमुक एक शाखा नकोच आहे असे विद्यार्थी त्यादिवशी गर्दी करणारच नाहीत ३. ज्याठिकाणी याद्या - नावे लिहिली जातात ते एका फळ्यावर चिटकवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. भारतीय पुरुष सरासरी ५.५ फूटाचा व स्त्री ५.० फूटांची असते. यादी पहाण्यासाठी ते फळे ह्या उंचीचा अंदाज घेऊन वर लावावेत. अक्षर मोठे असावे. म्हणजे फळ्याजवळ रेटारेटी करत याद्या पहाव्या लागणार नाहीत; ह्यात महिलांची फार कुचंबणा होते.

वाचने 1359 वाचनखूण प्रतिक्रिया 2

अमृतांजन 03/07/2009 - 14:45
ह्या विषयात मी आता मास्टरी मिळवली आहे बर का. अनेकांना मीच मदत केली अर्जे भरण्याचा चक्रव्युह भेदण्यासाठी.

In reply to by अमृतांजन

पाषाणभेद 03/07/2009 - 17:34
अमृतांजन , काही समजले नाही. वरती प्रश्न विचारता आणि खाली "मास्टरी मिळवली आहे " सांगता? काय खरे ते सांगुन टाका. आमचे ज्ञान वाढेल प्रवेशाचे. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)