मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोण म्हणाले

विजुभाऊ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोण म्हणाले हे तुजला ; ऐसे मी करणार नाही खोट्या शपथाना या पुढे अजिबात बधणार नाही दिल्या घेतल्याशिवाय होतात व्यवहार हे मी सांगणार नाही दिल्या घेतल्या शिवाय व्यवहार अजिबात मी करणार नाही प्रतीज्ञेत " भावंड्"म्हणेन; आप-पर मानणार नाही स्वार्थ माझा येता समोरी ; आप-पर जाणणार नाही "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे मिथ्य मांडणार नाही "दिल्या घेतल्याने होत आहे आधी दिलेघेतलेची पाहिजे: हे सत्य सोडणार नाही जमवेन जरी नाठाळांची गर्दी ;नाठाळ मी ठरणार नाही तालावरी नाचेन त्यांच्या मग विरोधच उरणार नाही लाचार जरी कोणी म्हणेल ; लाज मला वाटणार नाही लाचारीमुळेच मिळे मलीदा ;सत्य त्यांस सांगणार नाही बोलेन त्या शब्दास जागेन ; ऐसे मी करणार नाही शब्द असती फुगे हवेचे सांगण्यास कचरणार नाही करीता कोणी विरोध मजला ; मी त्यास डरणार नाही हातपाय तोडेन ऐसे; चालता तो उरणार नाही तुला तोडले ते फौज माझी ;हे जाहीर सांगणार नाही तुझ्या सांत्वना मेळावे भरविण्या मागे मी रहाणार नाही नेतेपद हे तत्व माझे ; बाणा हा सोडणार नाही लक्ष वेळा वाकेन परी ;कणा हा मोडणार नाही लक्ष तडजोडी करेन ; सत्तेस मी मुकणार नाही अढळपद मिळो देवा ; प्रार्थना कधी चुकणार नाही ..................विजुभाऊ सातारवी

वाचने 1627 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/05/2009 - 13:29
बोलेन त्या शब्दास जागेन ; ऐसे मी करणार नाही शब्द असती फुगे हवेचे सांगण्यास कचरणार नाही विजूभौ, अजून येऊ द्या ! -दिलीप बिरुटे (शब्दांचे फुगे हवेत सोडणारा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया 20/05/2009 - 13:46
विजूभौ, अजून येऊ द्या ! --अवलिया

क्रान्ति 19/05/2009 - 21:34
दिल्या घेतल्याशिवाय होतात व्यवहार हे मी सांगणार नाही दिल्या घेतल्या शिवाय व्यवहार अजिबात मी करणार नाही खासच हम नहीं सुधरेंगे! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

विजुभाऊ 25/05/2009 - 12:04
सर्वाना धन्यवाद भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही