Skip to main content

विचार

अश्वत्थ

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 24/06/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कोरड्या डोळ्यात आता नुरला विश्वास शांत घरातली भासे खिन्न ओसरी उदास झाले कवाड पोरके नाही अंगणाची साथ चुडा भरल्या हातात बूजगावण्याचा हात अश्वत्थाच्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी पारावर हिंडणारी बघ साळुंकी एकटी खोली भरून दाटला खुळा अंधाराचा जीव बाहेरचा कव डसा शोधी जमिनीचा ठाव वारा झपाटून आला होई क्षणात बेभान स ळ स ळू न उठते पिंपळाचे पान पान

पहिले पाढे पंचावन्न!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 23/06/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
अन्वयचा बाळकडू वरचा लेख वाचला आणि परवाची गोष्ट आठवली ती लिहावी म्हटले. ------------------------------------------------------------------- हा आठवडा चिरंजिवांच्या ह्या शालेय वर्षाचा शेवटचा आठवडा. शनिवारपासून सुट्टी सुरु होईल आणि थेट सप्टेंबरात शाळा उघडेल तेव्हा मुलगा पहिलीतून दुसरीत जाईल. परवाची गोष्ट, मुलाला टेबल्स करुन द्यायचे मनात आले, टेबल्स म्हणजे पाढे. म्हटलं त्यालाच लिहायला लावूयात म्हणजे अनायसे लिहूनही होतील. क्रिएटीविटी चं भूत डोक्यात ना! मनाशी कल्पना घोळवत होतो काय करावे.

प्रिय अन्वयराव,

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 23/06/2009 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपले मिपाकर अन्वयराव ह्यांच्या छोटेखानी लेखाला हे आमचे छोटेखानी उत्तर! हे उत्तर ह्या स्वतंत्र लेखातून आणि वेगळेपणाने द्यायची कारणे तीन! १) आज बर्‍याच दिवसांनी एखाद्या लेखाला चार ओळींचे उत्तर देण्यास टाईम भेटला. एरवी, 'वा!', 'सुंदर!', 'छान!' या पलिकडे काही उत्तर द्यायला इच्छा असूनही टाईम भेटत नाही. २) अन्वयरावांनी एका बापाच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

एका सोनालीची महालढाई

लेखक ज्ञानदा कुलकर्णी यांनी रविवार, 21/06/2009 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
सोनाली नवांगुळ
आजचा सकाळ पाहिला, पहिल्या पानावरच उजव्या कोप-यातील हे शीर्षक वाचले. बाकीचा पेपर टाकला आणि आधी सप्तरंग वाचायला घेतले. पहिल्याच पानावरचा सोनालीचा फोटो पाहीला, केवढी स्मार्टनेस आहे तिच्या चेहे-यावर.

विचार करा तडीपार

लेखक अजय यांनी शुक्रवार, 19/06/2009 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीची आय-माय कुण्या युपी बिहाऱ्याने काढली तर त्याची पार आपन वाट लावून टाकू बर्का. आता आपल्याच मान्साकडून बोल्लं जातं काईबाई.... काल आमच्या उदव सायेबाचं लेकरू (म्हंजे आदित्य ठाकरे सायेब) म्हने की राजकारनात येयाचं नाई. त्यांनी तर द ड्रीम वुई शेअर अशी शेअर बाजाराला जोडनारी नवी संगटनापन सुरू केली हाये. तीचे मराठीत नाव तुमीच सोदून मिपावर लिवा. त्यांनी आनकी काही तरी सांगीतलं. रोकठोक आनी खनखनीत- "जो विचार करशील, तो तडीपार ने, अशी शिकवण आई-बाबा देतात" (प्रसिद्धी - सकाळ, मुंबई, टुडे पान २) आता बगा आमंचा नवा नेताच ईचार तडीपार करायला सांगतो .

तो-ती व मी - लिमिटेड लफडा !!!

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 19/06/2009 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मे च्या प्रचंड उन्हामध्ये देखील पावसाचा हलकासा वर्षाव देखील मन हेलावून जातो असेच काहीतरी त्याच्या सोबत घडले होते, अस्ताव्यस्त राहाणारा, मित्राच्यात दंगा घालणारा, तासंन तास फोनवर बोलणारा तो अचानक दोन दिवसामध्ये बदला, गप्पा मारणे नाही, चुकून देखील फोन करणे नाही जेव्हा आम्ही फोन करु तेव्हा त्याचा फोन बिझी दिवस असो वा रात्र... व हाच बदल जवळ जवळ महिनाभर सर्वजण पाहत होते, काय झाले काय नाही ह्यावर चर्चा करत होते मित्राच्या गप्पामध्ये हॉट टॉपिक बनला होता व अचानक एक दिवस त्याचा फोन आला... तो - अबे अडचण आहे मदत करशील का ? मी- बोल लेका जवळ जवळ दिड महिन्याने तु माझी आठवण काढली आहेस...

आज का

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 17/06/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज का मुरलीधराच्या पावरीची साद नाही? आज का राधे तुझ्याही पैंजणांचा नाद नाही? शब्द झाले मूक, जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही? हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही निर्गुणी भजने कुमारांची कधी ना ऐकिली तू, भीमसेनांच्या स्वरांचा घेतला आस्वाद नाही! सोड हे सुकणे, फुलांची पालखी दारात आली स्वागताला हो पुढे, यासारखा आल्हाद नाही या तुझ्या असण्यास वा दिसण्यास का जगणे म्हणावे? खोलली त्याने कवाडे, अन् तुझा प्रतिसाद नाही! आज छेडू या सुरांना, विसरुनी चिंता उद्याच्या आजचे गाणे खरे, येथे उद्याला दाद नाही!
Taxonomy upgrade extras

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -१

लेखक दशानन यांनी बुधवार, 17/06/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कोण आपलं वाटेल व कधी कोणी आपल्या मनातील अंधा-या जागे मध्ये ज्योत घेऊन येईल हे समजणे खुपच अवघड... प्रेमाची रुपेच निराळी.. प्रत्येक नजरेने वेगळी दिसणारी... प्रेमाची अवस्थाच निराळी, प्रेम कुठे व कसे भेटेल हे त्या कामदेवाला देखील माहीत नसावे.. तो मोका साधतो व तीर चालवतो.. नजरेला नजर भिडते व प्रेम होते... ही सर्वमान्य अवस्था.. पण जगात सर्व काही एवढं सोपं नसत की दोन ओळी मध्ये कथा समाप्त... खुप संघर्ष असतो.. काही युध्द लढावी लागतात मनाशी... जनाशी.. तेव्हा कुठे यशस्वी प्रेम भेटतं.. अशीच एक छोटी कहानी... त्या दोघांची !

पावसाला विनंती

लेखक राजा यांनी मंगळवार, 16/06/2009 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाला विनंती
अरे अरे पावसा, तू पड भसाभसा तू पड भसाभसा वेडा झाला बळी राजा नको देऊ त्याला सजा वर पहाता पहाता, जीव झाला रड्कासा तू पड भसाभसा का रुसला आम्हावरी ? तुझ्याविना कोण तारी सा~या सजिवांचा देव, तुझ्यावरच भरवसा तू पड भसाभसा पुर्वी तानसेन राग म्हणायचा धो धो पाऊस पडायचा तु नाही पडला तर, सुर गवसेल कसा तू पड भसाभसा नद्या नालेही ओसरली तळे सुध्दा खाली झाली गुरं ढोरं वेडी झाली, जसा पाण्याविणा मासा तू पड भसाभसा तुझ्या विणा शेती नाही शेती विणा काम नाही पाण्याच्या
Taxonomy upgrade extras

आकांत

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 15/06/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्राण झाला शांत आता संपला आकांत आता यायचे ना फिरुन येथे, सोडला हा प्रांत आता तोडले सारेच धागे, का पडावी भ्रांत आता? सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता सोहळे सोसून फसवे जीव झाला क्लांत आता वादळाचे धुमसणे हे का न होई शांत आता?
Taxonomy upgrade extras