एकम् सत्
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात... अर्थात शाळांपेक्षा आणि मास्टर्स/पिएचडीच्या पदवीदानापेक्षा, बॅचलर्सच्या पदवीदानाचा सर्वात जास्त गाजावाजा होतो, त्याला महत्व असते. त्याला येणारे अतिथी हे बर्याचदा जगात प्रसिद्ध असतात (किमान अमेरिकेत नक्कीच).
अशा ठिकाणी जी अनेक प्रभावी भाषणे झाली आहेत. नजीकच्या काळात असे एक प्रभावी भाषण, जे मला खूप आवडले होते,ते म्हणजे २००५ साली, स्टॅनफर्ड विद्यापिठात केलेले स्टिव्ह जॉब्ज (ऍपल काँप्युटर्स, आयपॉड, आयफोन फेम)चे भाषण. हे भाषण वाचले नसल्यास अवश्य वाचा. आपल्याकडे विविध कारणाने या पदवीदानाचे महत्व हवे तितके राहीले आहे असे वाटत नाही. कॉलेजच्या तासांप्रमाणेच हा समारंभ पण बंक करण्यात आणि पोस्टाने डिग्रिसर्टीफिकेट घरी येण्यात आपण समाधान मानतो... त्याने काही कदाचीत फरक पडत नसेलही, पण तरी देखील आता असे वाटते की हा अधुनिक काळातील चांगला संस्कार आहे.
तर अशा या पदवीदान समारंभाच्या मौसमात, कालच्या रविवारी (मे १७), राष्ट्राध्यक्ष ओबामांना नॉत्रे डेम विद्यापिठात प्रमुख पाहूणे म्हणून बोलावले होते. आता हे विद्यापिठ कॅथलीक धर्म पाळणारे विद्यापिठ आहे. अर्थातच तेथील बहुसंख्य विद्यार्थी हे कॅथलीक आहेत आणि त्यांचे विचार हे बायबल म्हणजेच श्रेष्ठ, ते ही रोम मधून जसे सांगितले तसे. ह्या संदर्भात अमेरिकेत सर्वत्रच एक प्रश्न कायम टोकाच्या भुमिका घेतो, तो आला - गर्भपात हक्काचा. ख्रिश्चन धर्म आणि विशेष करून रोमन कॅथलीक पंथात गर्भपात मान्य नाही. त्यातील काही कारणे मला देखील पटतात, पण तो विषय वेगळा आहे आणि तरी त्यांची टोकाची आणि निव्वळ धर्मामुळे म्हणून असलेली भुमिका पटत नाही. त्याच वेळेस अतिरेकी स्वतंत्र (लिबरल्स) विचारवाद्यांना कुठलेच बंधन नको असते. मध्यम विचारवाद्यांना स्वतःपुरते बंधन अथवा विचारकरून कृती भावते पण इतरांना मात्र स्वातंत्र्य देणे महत्वाचे वाटते.
ओबामा हे देखील मध्यम मार्गातील आहेत. (बहुतांश डेमोक्रॅट्स तसेच असतात तर काही अतिरेकी स्वतंत्र अल्ट्रा लिबरल्स). असे मध्यम मार्गी ओबामा जे गर्भपात हक्क मानतात त्यांना "आपल्या विद्यापिठात" बोलावले म्हणून नॉत्रे देमच्या विद्यार्थ्यांना राग आला आणि गेले काही दिवस भरपूर निषेध झाला, बातम्या आल्या. अर्थात असे "वादग्रस्त पाहुणे" आणणे हे कुठल्याही विद्यापिठ प्रशासनांना आवडते, कारण त्यानिमित्ताने बातमी होते, फुकटची प्रसिद्धी होते, आपला स्वतंत्रपण दिसतो आणि नवीन विद्यार्थी पुढच्या वर्षाकरता मिळू शकतात. (सगळ्यात शेवटी"सबसे बडा रुपय्या!")
अर्थात ओबामा तेथे काल गेले आणि त्यांच्या वक्ता दषसहस्त्रेशू या कारकिर्दीस शोभणारे भाषण केले. मात्र या भाषणात गर्भपाताच्या हक्कावरून जे धर्माच्या नावाने फरक पडत वाद घडत आहेत त्याचा उल्लेख करताना ते जे काही म्हणाले ते त्यांच्याच शब्दात वाचण्यासारखे आहे:
...we must find a way to reconcile our ever-shrinking world with its ever-growing diversity - diversity of thought, of culture, and of belief. In short, we must find a way to live together as one human family.वरील वाक्ये जेंव्हा वाचली तेंव्हा "वसुधैव कुटुंबकम" म्हणणारे आपले जुन्याहून जुने असले तरी नित्यनुतन राहणारे भारतीय तत्वज्ञान आठवले. तसेच आठवले अजून एक कायम वापरले जाणारे वाक्यः "एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति" अर्थात सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही. राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत. कुठेतरी आपण सर्वसमावेशक नाही ह्या भितीने तर कुठेतरी त्यांचा त्यातील मुल्ये भ्रष्ट करून वापर करणार्यांच्या त्राग्याने प्रतिक्रीया म्हणून... मग जसे "योग" निर्यात करून "योगा" आयात केला तसेच काहीसे उद्या आपण ओबामा म्हणतात म्हणून आपलेच तत्वज्ञान ऐकायला लागणार का? वास्तवीक मला सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, आपल्या तत्वज्ञानातून घेतलेल्या ओळी असाव्यात असे सहज वाटणारी ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?
वाचने
5664
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
लेख
In reply to लेख by रेवती
देशाबाहेर असताना
पदवीदान
फार छान
ओबामांचे भाषण उत्तम होते
In reply to ओबामांचे भाषण उत्तम होते by धनंजय
खुलासा
In reply to खुलासा by विकास
हम्म - चांगले आहे
In reply to हम्म - चांगले आहे by धनंजय
अभिमान आणि जबाबदारी
लेख आवडला
राहून
सहमत.
भगवद्गीता
In reply to भगवद्गीता by क्लिंटन
चांगला शब्द
In reply to भगवद्गीता by क्लिंटन
कदाचन?
In reply to कदाचन? by धनंजय
ते वेग़ळे
In reply to कदाचन? by धनंजय
दयानंद
In reply to दयानंद by क्लिंटन
अधिकार, अपेक्षा... मा कर्मफलहेतुर्भू:
In reply to अधिकार, अपेक्षा... मा कर्मफलहेतुर्भू: by धनंजय
धन्यवाद
In reply to धन्यवाद by क्लिंटन
न भंग पावे...
In reply to कदाचन? by धनंजय
गीता (अवांतर)
एकम सत ची भानगड
In reply to एकम सत ची भानगड by मिसळभोक्ता
अनर्थ
In reply to एकम सत ची भानगड by मिसळभोक्ता
चूक भूल घ्यावी