मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जवाबः शहरातला आणि खेड्यातला मुलगा

३_१४ विक्षिप्त अदिती · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाषाणभेद यांनी शहर किती वाईट आणि खेडं किती चांगलं हे इथे सांगितलं आणि मग मी विचार केला का बरं लोकं एवढं चांगलं खेडं सोडून शहरात येत असतील? नारायणगावच्या आसपास किंवा, ट्रेकच्या निमित्ताने अधूनमधून पाहिलेली खेडी माझ्या शहरी नजरेला अशी दिसली! असेल तुझ्याकडे टीव्ही तरी घरी तुझ्या वीज असते काय? नाय रे नाय, नाय रे नाय खात असशील तू भाकरी तरी बरोबर भाजी मिळते काय? नाय बॉ नाय नाय बॉ नाय असेल तुझ्या गावात शाळा तरी शाळेत शिक्षक असतात काय? नाय रे नाय, नाय रे नाय असेल तुझ्याकडे खेळायला जागा तरी शेतकामातून फुरसत मिळते काय? नाय रे नाय, नाय रे नाय असेल तुझ्या गावात नदी तरी पाणी तिचे आहे शुद्ध काय? नाय रे नाय, नाय रे नाय खाते मी मंडईतले तरी आंबे कधी तू हापूस चाखलास काय? नाय रे नाय, नाय रे नाय असेल तुझ्या शिवारात खिल्लार तरी दूध तुला प्यायला मिळते काय? नाय रे नाय, नाय रे नाय शहरात आहे माझ्या त्रासच फार पण खेड्यात पोटाला मिळतं काय? काहीच नाय, काहीच नाय!

वाचन 8015 प्रतिक्रिया 0