Skip to main content

विचार

चक्रव्यूह

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 23/04/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
साध्या सोप्या संदर्भांचा अर्थ लावणंही कठीण होतंय भोवळ येईतो फिरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? अज्ञात भविष्याच्या दोरीवरून अधांतरी चालताना मनाचा तोल सावरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? नाचवणारी बोटं कुठली, धागा कुठला, दिसत नाही बाहुल्या होऊन नाचत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा भळभळणारा शापित जन्म जखमा फुलवत हसत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? चक्रव्यूहात तडफडणा-या अभिमन्यूच्या अगतिकतेनं दैवाच्या गुंत्यात अडकून जाणं, एवढंच हाती राहिलंय का?

माझे नाव

लेखक निशिगंध यांनी गुरुवार, 23/04/2009 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
जोवर मी लहान होतो. म्हणजे शाळेत जात असे. तोवर मला माहे नाव मुळीच आवडत नसे. मला माझ्या आई बाबांचा खुपच राग येत असे. मला वाटायचे की, हे काय निशिगंध नाव आहे तेही मुलाचे. नाजुक मुलीचे असल्यासारखे. कधी जर जर आजारी पडलो तरी डॉक्टर साहेब हात लावायच्या अगोदर सुचवायचे की, तुझे नाव फारच नाजुक आहे ते बदल म्हणजे तु आजारी नाही पडणार. आणी मी नाईलाजाने एक जळजळीत नजरेने आई बाबांना खुन्नस द्यायचो. निदान निशिकांत तरी ठेवायचे. पण आता मला निशिगंध हेच नाव खुप आवडते. कारण फक्त एकच ते म्हणजे निशिगंधाचे फुल..ते मला खुप आवडते. पांढरे शुभ्र नाजुक असे ते फुल पाहील्यावर मला असे उगीच वाटते की मीच आहे.

महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 23/04/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार
फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो.

तू!

लेखक उमेश कोठीकर यांनी गुरुवार, 23/04/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुझेच नाव स्वप्नांच्या ओठी "तू"च निघे मोती शब्दांच्या पोटी निळ्या या नभात भासे तुझे रूप पृथ्वी सर्व वाटे तुझेच स्वरूप! दिसे फक्त तूच नेत्री येई पाणी ऐकू येते फक्त नाव तुझे कानी आरशात तूच दिसते साकार एकांतही घेतो तुझाच आकार! तळ्यात चंद्र तुझेच बिंब फुलांत तूच दवाने चिंब होउनी श्वास जाई तू आत स्पंदते नित्य तू हृदयात मंदिरी मूर्तीत हसते तूच कणीकणी माझ्या वसते तूच!
Taxonomy upgrade extras

अभिनंदन

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 20/04/2009 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात भीती कसली?

बेत आहे..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 20/04/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज थोडेसे चुकीचे वागण्याचा बेत आहे. आज तुजला एकट्याने गाठण्याचा बेत आहे. भेटते मजला पुन्हा ती त्याच त्या वळणावरी का मज कळेना योग हा की गुंतण्याचा बेत आहे. अंगणी माझ्या कशाला कवडशांनी फेर धरला ही तुझी चाहूल की हा चांदण्याचा बेत आहे. टाकली पेटीत जेव्हा मी जराशी जास्त नाणी देव वदला, आज भलते मागण्याचा बेत आहे. एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे. रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 19/04/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण
दोन - चार दिवसांपुर्वीच 'सनई-चौघडे' हा चित्रपट पाहिला. खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले. 'कांदेपोहे' या नावाने मी हा चित्रपट पाहण्या अगोदर एक लेख येथे लिहिला होता. या चित्रपटाला इतके महत्व देणे अवास्तव नव्हते हे या चित्रपटाने सप्रमाण सिध्द केले. उत्कृष्ट संवाद, उत्तम अभिनय या सर्वांनी हा चित्रपट उत्तम झाला आहे. मराठी चित्रपटातील संवाद प्रभाव पाडत नाही हा समज ''सगळे पुरूष सारखे असतात, पण एकसारखे नसतात'' अशा संवादानीं खोटा ठरवलेला आहे.

मनात लपलेला दु:शासन!

लेखक उमेश कोठीकर यांनी शनिवार, 18/04/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
शरीर स्त्रीचे भासे शाप डोळे विखारी जगी अमाप नजर फिरते अंगी जैसी बुभुक्षित ते कामुक साप! परस्त्री ती समोर दिसता दु:शासन तो जागे क्षणात खेळ मनीचा विकृत चाले भोग तिचा तो घेई मनात गर्दी असो! असो एकांत पदर खेचण्या अधीर हात हात सराईत जागी लागे वखवखलेली श्वापद जात! असो बालिका असो तरूणी नाते गोते लज्जा नाही नरमादीचे नाते एकच! असहाय्य मादी मुकाट साही असेल कोठे कृष्ण सखा तो? कवच तुझे दे! शरीरी रक्षक दग्ध होईल शरीर अमुचे कामुक नजरा!
Taxonomy upgrade extras

कसाब ने कोर्टात साक्ष फिरवली"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 18/04/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
एक शंका..... आज पेपर वाचताना बातमी वाचली कि "कसाब ने कोर्टात साक्ष फिरवली" मला असे विचारायचे आहे कि. कसाब हा साधरण गुन्हेगार नाहि तर तो अतिरेकि आहे व त्याच्या साक्षिला महत्व आहे.आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे तर त्याचा सरकार का उपयोग करत नाहि..पोलिस त्याच्या कबुलि जबाबाच व्हिडिओ चित्रिकरण का करु शकत नाहित व साक्ष म्हणुन ते चित्रिकरण का दाखवु शकत नाहित??..या बाबत कायदा काय सांगतो?

पौर्णिमा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 17/04/2009 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य विभागातल्या पौर्णिमा पाहून {वाचून} मला माझी पौर्णिमा खुणावू लागली. थोडी वेगळी पौर्णिमा. हाकारले फुलांनी अंगार शोधताना मज पौर्णिमा गवसली अंधार शोधताना एकेक पाकळीचा एकेक सूर झाला हरपून भान गेले गंधार शोधताना माझ्यापुढे खुली ही झाली कुबेरनगरी, माझ्याच अंतरीचे भांडार शोधताना डोळ्यांत दाटलेले ते भाव मूर्त झाले नाकारण्यात दडला स्वीकार शोधताना खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये, सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया झाले तपस्विनी का संसार शोधताना?