Skip to main content

विचार

खेळ जुने-नवे

लेखक जागु यांनी बुधवार, 03/06/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे खेळ म्हणजे पकडा-पकडी, लपाछूपी, डबाइसपैस, विठी दाडू, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, संत्र लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, रंग रंग कोणता रंग, म्हातारी म्हातारी, पायता पायता, आट्यापट्या, रुमाल उडवी, पतंग उडविणे, चाक फिरविणे (गाडा) आबादबी, खांबापकडी, आणि असे बरेचसे खेळ होते. ह्या खेळांमधून मुलांचे मनोरंजन तर होतच होते शिवाय त्यांचा व्यायामही होत होता. तसेच काही खेळ होते जसे कवड्या उडविणे, अटक्-मटक, भोवरा फिरवीणे, चिठ्ठी चिठ्ठी, भातुकली ह्या खेळातुन मुलांचे निखळ, निरागस मनोरंजन होत होते.

कावळा आणि चिमणी

लेखक अनामिक यांनी सोमवार, 01/06/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे. (काही बदल सुचवता आले तर नक्की सुचवा).

साखरेचे खाणार त्याला..!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 01/06/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही.

शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 01/06/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे.

मराठी माणसाचा तारणहार कोण?

लेखक घोडीवाले वैद्य यांनी रविवार, 31/05/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारणात सद्‌हेतूने येणारांची संख्या आता घटलीये. किंबहुना या लोकांना आता राजकारणात स्थानच राहिलेले नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा राजकारणाचा नियम झालाय. एक विचार घेऊन आम्ही राजकारणात येतो, जनतेच्या उद्धार हेच आमचे कर्तव्य आहे, असे आश्‍वासक शब्द वापरून राजकारणात स्थिर स्थावर व्हायचे आणि नंतर वाट्टेल तशी भूमिका बदलून लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाला हरताळ फासायचा. हे थोड्या बहुत फरकाने प्रत्येक राजकीय पक्षालाच लागू आहे. त्यात कॉंग्रेस हा तर व्यवहारवादीच पक्ष आहे. तरीही सामान्य जनांमध्ये हाच पक्ष लोकप्रिय आहे. त्याची कारणे आर्थिक व्यवहारांशीच निगडीत आहे.

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ...

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 31/05/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वीचे करिअर गायडन्स वर्गाचे धागे... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग १ ...भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ... http://www.misalpav.com/node/1425 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ... http://www.misalpav.com/node/1451 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा... http://www.misalpav.com/node/1560 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....

काव्य

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 31/05/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यात हरवलेला मी .. शब्दांना नाही गणती एक सोडावा, दुसर्‍या जोडावे ओळ, शब्द मर्यादेसाठी मनामध्ये उजवे, डावे कुणी म्हणतात . . काव्य असावे छांदस, शब्दांच्या मर्यादेत. मर्यादा सोड्ली तर गैर, नी छंदमुक्त अन स्वैर.. मला नाही वाटंत तसं, कि .. हव्यात मर्यादा काव्यासाठी अथांग सागर, सुसाट वारे खुला निसर्ग सर्वांसाठी एक विचारू तुम्हाला मी. .? जंगलामध्ये आडवाटेवर फुलांची असतेच् ना वस्ती ? रसिक पाखरे येतातच् ना रसभरल्या फळांवरती ? म्हणून कधी वाटते मला.
Taxonomy upgrade extras

मुंबईचा पावणा

लेखक शरदिनी यांनी शनिवार, 30/05/2009 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचा पावणा फ़सला बाई मला प्रणयाचा डोंगळा डसला डोंगळा फ़िरतोय भुक्केला फ़िरूफ़िरूनी जीव शिणला शरम टांगली वेशीला मला प्रणयाचा डोंगळा डसला बांकेबिहारी नक्को गं बाई मुरली शर्मा नक्को गं बाई मग कोण मनामधि घुसला? मुंबईचा पावणा फ़सला ३० मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras

अण्णामामा.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 29/05/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
३० मे २००८. मी ऑफिसला निघण्याची तयारी करत होतो. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली, नंबरात ९१ आकडा दिसत होता म्हणजे भारतातून फोन होता. शुक्रवारी सकाळी फोन? जरा चमत्कारिक वाटलं. "दादा, अण्णामामा गेला!" पलीकडून बहीण बोलत होती. "आं...कधी? कसा काय?" "आजच. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर! हा फोन झाल्यावर आईला लग्गेच फोन कर. तिला खूप टेन्शन आलंय!" तिचा आवाज कापत होता. ऐकत होतो. शेजारच्या खुर्चीत खचलो. हार्ट ऍटॅक नंतर हॉस्पिटलमधे भरती केल्यावर एकेक सिस्टिम फेल होत गेली आणि शेवटी गेला. मुलगा स्वतःच डॉक्टर त्यामुळे काळजी घेण्याची परिसीमा असणार हे उघड होतं. अमेरिकेतून मुलगीही आलेली होती.