एक अपरिचित प्रकाशन - सैनिक समाचार
- Read more about एक अपरिचित प्रकाशन - सैनिक समाचार
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे.
सुरुवातीला फौजी अखबारचे मुख्य कार्यालय सिमल्यात असले तरी त्याचे प्रकाशन अलाहाबादहून होत असे. भारतीय लष्करातील घडामोडींची माहिती जवानांना करून देता यावी या हेतूने फौजी अखबार सुरू करण्यात आले होते.
