नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ?
कराडची मुलगी शिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या शहरात आलीय आणि नोकरी साठी धडपड करत एका कंपनीत पोहोचतेय ... आणि " नाव काय तुझं ? असा प्रश्न आला की उत्तर काय द्यायचं देताना मनात हजार कल्लोळ उठतायत.... काय असेल कारण ? हे समजून घ्यायचं असेल तर नुकतीच प्रदर्शित झालेली "नाव काय तुझं ? " ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी !