Skip to main content

समीक्षा

पुस्तक परिचय: ययाति

लेखक श्रीगणेशा यांनी बुधवार, 26/06/2024 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 04/06/2024 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

वरवर लहान वाटणारे अनुभव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं. माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली. मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं.

अर्धा कप दुध...

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 12/05/2024 08:17 या दिवशी प्रकाशित केले.

ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला, 

"अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की. 

आई,लवकर उठलीस, चहा घेणार? 

नको ,तुला उशीर होतोय. 

बरं निघतो मी". क्लिनीक मधे खुप गर्दी होती. 

पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली. 

" आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय.

 काय झालं.?

काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या.

नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

लेखक मार्गी यांनी बुधवार, 08/05/2024 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल ✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण ✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग ✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं! ✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल ✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका ✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध सर्वांना नमस्कार. सध्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये थोडा आल्हाददायक थंडावा मिळावा, म्हणून हा वेगळ्याच विषयावर लिहीण्याचा प्रयत्न. गेल्या काही महिन्यांमध्ये काही दिवस आजारी असल्यामुळे व फ्रॅक्चरमुळे आराम करत असताना सहज म्हणून ह्या व्यक्तीरेखा आठवल्या.

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 03/05/2024 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 01/05/2024 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं. काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या व्याधीचा विषय निघाला. “अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “ असं मी समर्थांना म्हणालो. “जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च केल्यास घरी कष्ट कमी होतात.आणि बाहेर जेवण्याच्या सवयी वाढत असल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी खाण्याच्या सोई वाढत आहेत.

दर्शननं केला प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 25/04/2024 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 06/04/2024 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

डोंगरवाटा , पुस्तक परीचय

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 25/03/2024 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
अजून वाचतोय...या पुस्तकाने भूरळ पाडली, गारुड केलं जणू, मंत्रमुग्ध झालो. --------------------------------------- डोंगरवाटा लेखक : शेखर राजेशिर्के प्रकाशन: सृजनरंग प्रकाशन मुद्रक : प्रमोद घोसाळकर संपादक : श्रीरंग पटवर्धन मुद्रीतशोधन : उदय शेवडे किंमत : रु.900 असं म्हणतात कि वीरांचे पोवाडे,वीरांनीच गावेत... त्याच न्यायाने, ह्या पुस्तकाचा परीचय लिहीण्याआधी पात्रता निकष ( क्लालीफीकेशन राऊंड ) पास करणे मला आवश्यक वाटले, म्हणून कनकेश्वर (अलीबाग) ट्रेक केला, काल पुण्यात पहाटे वेताळटेकडी वर जाऊन आलो.