प्रिय अन्नपूर्णा,
तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते.
माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!