Skip to main content

प्रतिभा

कवी होण्याच्या चार सोप्या टिप्स

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 10/05/2020 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आज मी आपणाला कवी कसे बनावे याच्या चार सोप्या टिप्स देणार आहे. होतकरू तरूणांना यांचा निश्चित फायदा होईल. अनेकांना कविता लिहायची इच्छा असते. पण ती लिहावी कशी हे मात्र कळत नाही. त्यांच्यासाठी या टिप्स फार उपयोगी ठरतील. पहिली टिप : सुरुवातीला आपल्या मनातल्या भावना मुक्तपणे वाहू द्या. मनात येतील ते शब्द कागदावरती लिहून घ्या. तीन चार शब्दांची एक ओळ करा. आणि त्या ओळी एकाखाली एक लिहा. अभिनंदन! तुमची पहिली कविता तयार आहे. याला मुक्तकविता असे नाव देऊन कुठेही चिपकवा. दुसरी टिप : यमकांचा सराव. आपला शब्दसाठा वाढवा. कोणत्या शब्दाला कोणते यमक योग्य जुळते याचा सराव करा.

सुटकेस ६

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 09/05/2020 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो. चांगले प्रसन्न वाटत होते. आंघोळ वगैरे करून काऊंटरवरच्या म्हाताऱ्याला हिशोब दिला. आणि रस्त्यावर आलो. एका हॉटेलमध्ये फाफडा की काय तसले खाल्ले. आणी वडापने अहमदाबाद ला जायला निघालो. दोन अडीच तासांचा प्रवास मोठ्या मुश्कीलीने काटला. काल रात्री आपल्या हातून भयंकर गोष्ट घडली. गांज्याच्या नशेने माणूस एवढे उत्तेजित होते? काही कळेना. कदाचित माझ्याच मनात आतमध्ये कुठेतरी असे काही करायची सुप्त ईच्छा दडली असावी. पण पुन्हा असल्या फंद्यात पडायचे नाही असे मनोमन ठरवले. वडाप अहमदाबादमध्ये घुसले तसे रोख चारशे रूपये देऊन उतरलो. आळस झटकून तोंड धुतले. आणि एक हॉटेलमध्ये नाष्टा केला.

सुटकेस ५

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 08/05/2020 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस ४ ----------------------- स्टेशनला गेलो आणि गाडी पार्क केली. मग तोबा गर्दीत सलीमची वाट बघत बसलो. तिकीट काऊंटरच्या आसपास भटकलो. साला नक्की कुठे असेल या विचारात असतानाच तो पुढे येऊन टपकला. "चलो.." म्हणून मला सोबत येण्याची खूण केली. मी त्याच्या मागे मागे एका उड्डाणपूलाखाली अंधाऱ्या जागेत गेलो. तेथे एक भिकारी भीक मागत बसला होता. त्याच्याकडून कसलीशी पिशवी त्याने उचलली. आणि " ये ले" म्हणून माझ्याकडे दिली. "क्या है इसमे..?" मी पिशवी चापचत विचारले. आतमध्ये तर जुने फाटके कपडे कोंबून बसवले होते. "कोकेन.." तो शांतपणे म्हणाला.

सुटकेस ४

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 07/05/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस ३ ------------------------ ह्रदयाचे ठोके धडाधड पडत होते. डोक्यात घण वाजत होते. जीवन आणि मृत्यू मध्ये असल्यासारखे हे क्षण अगदीच पछाडून सोडत होते. गाडीला किक मारून मी शंकराचे एक प्रशस्त मंदिर आहे तिकडे निघालो. संकटकाळी आता तोच वाचवणार! धूप, उदबत्त्या, फुले यांनी मंदिर अगदी दरवळून गेले होते. भाविक भक्तीत तल्लीन होऊन शंकराचे दर्शन घेत होते. आणि मी एका दगडी खांबाला टेकून उदासवाणा बसलो होतो. एका उजळ चेहऱ्याच्या साधूने मला खायला प्रसाद दिला.

सुटकेस ३

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/05/2020 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस २ ----------------------- चुर्रर..! ऑम्लेटचा खमंग वास दरवळला आणि भूक भडकली. टिव्हीवर बातम्या कमी आणि जाहिरातींचा भडीमार सुरू झाला. पण साली आपण ही चूक केलीच कशी? एवढ्या रात्री परत तिकडे जायची काय अवदसा सुचली. देव देतो आणि कर्म नेते दुसरे काय! चिऊ पळत आली. आणि हातात रिमोट देत म्हणाली. "घे.." मी चॅनल बदलला. आणि कार्टून लावले. दुसरा काही मार्गच नव्हता. नाहीतर तिने आकाश पाताळ एक करायला कमी केले असते. "अरे पण त्यांना तू वरती का नाही घेऊन आलास?" बायको किचनमधून म्हणाली. "घाईत होते ते.

सुटकेस २

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 30/04/2020 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस १ गारठा चांगलाच झोंबत होता. आणि हायवेला मोठमोठाल्या ट्रॅव्हल्स सुसाट धावत होत्या. वळणाच्या अलिकडेच एक पेट्रोलपंप आहे. तिथे मी जरावेळ थांबलो. आणि कानोसा घेऊ लागलो. तशी फारशी हालचाल दिसत नव्हती. पण एकदोन लक्झरी कार त्या पुलाजवळच ऊभ्या होत्या. मी बाईक हळूहळू पुढे नेऊन त्या कारच्या पाठिमागे ऊभी केली. आणि लघुशंकेचा बहाना करून ओढ्याकडे चाललो. "अबे साले दिखता नही क्या, निचे आदमी है" कारच्या पुढे दोघे ऊभे होते. त्यातला एकजण म्हणाला. तसे दिसायला ते प्रतिष्ठित होते. "ओह. सॉरी.

सुटकेस

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 28/04/2020 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
टपरीवर सिगारेट घेतली तेव्हा बॉसचे शब्द कानात घुमत होतो. आपण फक्त गाढवासारखे काम करतो. असे तो म्हणाला. 'आपण' म्हणजे त्यात तो ही आलाच की. सिगारेटचा कश घेत मी तो विचारच डोक्यातून काढून टाकला. विक्या म्हणतो खरं आहे. आपल्याला फक्त शिव्या खाण्याचे पैसे भेटतात. जो नम्रपणे ऐकून घेईल त्याची पगारवाढ नक्की. सिगारेट संपवून मी गाडीला किक मारली. तेवढ्यात विक्याचा फोन आला. "अरे ऐकना जगदीश, बॉसला घेतला होता मगाशी केबिनमध्ये" "पुन्हा एकदा?" "हो, बेकार ठासलीय त्याची... तिन्ही डायरेक्टरनी.." "काय ग्रेट न्यूज आहे यार.. हाहा.." "पण बॉस जाम भडलकलाय, ऊद्या आपल्या टीमचं काही खरं नाही.. जरा जपून.." "ठिक आहे.

The बाल्कनी

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 15/04/2020 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
का कुणास ठाऊक पण नभ दाटून आले होते आणि वारा तुफान वहात होता. आभाळाच्या छताखाली एक कागद उंचच उंच उडत होता. मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत बसलो. मग शेवटी कंटाळलो. नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. एक कुत्र्याचं लहानसं पिल्लू रस्त्यावर मनसोक्त बागडत होतो. मी बराच वेळ पाहत बसलो. पण शेवटी कंटाळलो. तसा फारसा वेळही जात नव्हता. आणि मी आळसावलो होतो. गेल्या दोन दिवसांत काहीच न लिहीता आल्याने पुरता वैतागलो होतो. नंतर बऱ्याच वेळाने पुन्हा बाहेर आलो. बाल्कनीत एक कागद पडला होता. चांगला होता कोरा करकरीत. आता हाच वापरू म्हणून मी तो उचलला.