असच..
अशुद्ध लेखनासाठी माफ करा, ऑफीस मधे क्विलपॅड उसे करावं लागतं.
========================
"So, are you from India" - तिने सुमधुर स्वरात विचारलं.
"Yeah, from quite far. So since when are you practicing this dance?" - संभाषण पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न.
युरोपात प्रत्येक शहरात अशा काही जागा असतातच जिथे singles एकत्र जमतात.
अशाच एका बुचारेस्ट नावाच्या शहरातली एक जागा.
अमाप सुंदर पूर्व युरोपिअन मुलं-मुली. मद्य असं प्यायलं जातं जसं उद्या नाहीच.
एका हातात मद्याचा प्याला, दुसऱ्या हातात जळती सिगारेट. गोठवणारी थंडी, ओपन एअर पब.
इथे अँप्रोच करण्याचे नियम असतात. मुलं मुलींना अँप्रोच करणार. मुलीने जर तेवढ्यापुरतं उत्तर देऊन दुसरीकडे पहिलं तर ती इच्छुक नाही.
मुलीने बोलतांना जर केसांना हात लावला, मुलाच्या खांद्याला लावला, किंवा साध्या विनोदावर हसली जरी, तरी समजायचं कि भावना पोहोचल्या.
लाजण्याचा बहाणा नाही. उगीच ओठ दाताने दाबने नाही. "मी तुला कधी तसं पाहिलं नाही" नाही.
तारुण्याचा बेभाम सोहळा. शरीर सुखाच्या ओढीबद्दल अपोलोजेटिक नाही.
एक अशीही संस्कृती.
"I am practicing since a long time, I don't even remember!" - इति मेनका.
कुरळे रेशमी केस हवेने हलतात. ती हाताने त्यांना कानाच्या मागे अडकवते.
जसं संभाषण पुढे सरकत, आम्ही गर्दी पासून लांब सरकतो.
"only thing I know about my father is his name and the place he came from"
मला माझ्या आजोबांच्या मावस भावाची मुलगी कुठे दिलीये हे पण माहित आहे.
"Ohh, but nevermind, our kids will know their father well, rather too well to be healthy" - आमचा वातावरण लाईट करायचा प्रयत्न.
ती जोरात हसून खांद्यावर मारल्यासारखं करते.
उगी लाजण्याचा नको हा बहाणा.
मी सिगारेट पेटवतो. धूर आणि रात्र समोरून सरकत जाते.
हजारो मैल पलीकडे, आमच्या गावी, आजी झोपायला जाण्याआधी माझ्या फोटोवरून माझी दृष्ट काढते.
नखुल्या बाई नखुल्या, चांदण्याच्या टिकुल्या.
वाचने
9626
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
जियो
छान लिहिताय. अजून लिहा.
मस्तच....
एकदम मस्त. लिहीत रहा.
सुंदर.
कुठेही दांभिकतेचा स्पर्श नाही.
कडक
:)
खूप छान!
Our kids will know their father well :-) :-)
क्या फास्ट जा रहे हो भाई :-)
मुक्तक आवडले.
इथे अँप्रोच करण्याचे नियम असतात. मुलं मुलींना अँप्रोच करणार.तिथे पण मुलांनाच नेहमी पुढाकार घ्यावा लागतो का ?
In reply to इथे अँप्रोच करण्याचे नियम by मराठी कथालेखक
असे काही नाही.....तुम्ही खालीलपैकी एक निकष पूर्ण करत असाल तर तुम्हाला जास्त प्रयास करायची गरज नाही
श्रीमंत असणे
मदनाचा पुतळा असणे
अंडरवल्ड डॉन असणे
थोड्याफार प्रसिद्ध रॉक बँडमध्ये असणे
प्रसिद्ध खेळाडू असणे (खेळ कोणताही असूदे)
छान लिहिलंय.
झकास!!
मस्तच!
छानच जमलीये.
अजून एक शेवट -
हजारो मैल पलीकडे, आमच्या गावी, माझी आई तिच्या लाडक्या नातवाला पायावर घेऊन वाटी चमचाने दूध पाजत म्हणत असते,
अडगुल मडगुल सोन्याचं कडगुलं
In reply to छानच जमलीये. by रातराणी
आयोव.. रामा रामा रामा.
__/\__
In reply to छानच जमलीये. by रातराणी
वयोमानानी जरा कमी दिसते त्या मुळे वरील वाक्यात "आई" ऐवजी "बायको" असे चुकून वाचले गेले.
पैजारबुवा,
In reply to गलतीसे मिस्टेक हो गया by ज्ञानोबाचे पैजार
कहर...कहर....
In reply to गलतीसे मिस्टेक हो गया by ज्ञानोबाचे पैजार

In reply to गलतीसे मिस्टेक हो गया by ज्ञानोबाचे पैजार
good one!!
तसं मी सांगवं म्हणतो - स्थळ, वर्णन सगळं सत्य आहे, परंतु संभाषण काल्पनिक आहे.
ते असो, तुम्ही आपल्या वार्धक्याचा दृष्टीदोशाचा गंभीर पने विचार करावा म्हणतो..नाही म्हणजे आता फक्त आई च्या जागी बायको वाचताहत, घरी दिसायला चुकीचा लागला तर...शिव शिव !
In reply to haha by पुष्कर विजयकुम…
तसं मी सांगवं म्हणतो - स्थळ, वर्णन सगळं सत्य आहे, परंतु संभाषण काल्पनिक आहे.बस का भाऊसाहेब, इथे आपल्या आपल्यात मराठी माणसांत हे वेगळं सांगायची गरज आहे का?
In reply to तसं मी सांगवं म्हणतो - स्थळ, by गवि
tithe chalnari sambhashana farach 'direct' asatat...blog vagare var nako mhatala :D
लिहिताय.. आवडले
हे जर असंच होत असेल तर काही खरे नाही .. मला अजून एक प्रश्न पडलाय तो हा कि तिथे वटसावित्री , आय मिन वादाची झाडे नसावीत बहुधा .. आणि हेच कारण असेल कि तिथे असंच होत असेल .. नाहीतर आपल्याइकडे वटवटसावित्री काय , बैलपोळा काय नि नागपंचमी एकामागोमाग एक चालूच होतात आणि मग शेवटी आपण एकमेकांच्या नावाने शिव्या देऊन होळी पेटवतो आपल्या भावनांची .. पण मला हे सारं आवडतं , असंच नसलं तरी चालत .. आपलं कुणीतरी गोंडुल कुणी शोनुलं घरी वाट पाहत असतं , ते जरा बरं वाटतं .
मी तुम्हाला निराश नाही करत आहे , पण एक क्षण मी तिथे मला स्वतःला ठेवून पहिले आणि घुसमटलो आतल्याआत . बाहेर पडलो तेव्हा या भावना बाहेर आल्या ..
सिद्धेश्वर विलास पाटणकर
छान लिहीले आहे!
अरेवा! मस्त
जियो