मिपा हे मराठी संकेतस्थळ समजल्यापासून अगदी रोज न चुकता भेट देत आहे. मिपावर रोज येणारे लेख, कविता हा म्हणजे तर जणू खजिनाच आहे. इथे एकदा भेट दिली कि काहीतरी मनोरंजक, ज्ञानवर्धक लिखाण नाकीच वाचायला मिळत. इस्पिकचा एक्का, गवि, स्पा, वामनसुत, विसोबा खेचर, जॅक डनियल्स यांचे लेख म्हणजे तर पर्वणीच असते वाचकांसाठी.
हे सर्व वाचत असतांना लेखनासारख्या नवीन क्षेत्रात माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला काहीतरी लिहिण्याची स्फूर्ती न येओ तर नवलच. मला ह्या संस्थळावर काही गोष्टींची उणीव भासते, ती मी इथे मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.