मिपा हे मराठी संकेतस्थळ समजल्यापासून अगदी रोज न चुकता भेट देत आहे. मिपावर रोज येणारे लेख, कविता हा म्हणजे तर जणू खजिनाच आहे. इथे एकदा भेट दिली कि काहीतरी मनोरंजक, ज्ञानवर्धक लिखाण नाकीच वाचायला मिळत. इस्पिकचा एक्का, गवि, स्पा, वामनसुत, विसोबा खेचर, जॅक डनियल्स यांचे लेख म्हणजे तर पर्वणीच असते वाचकांसाठी.
हे सर्व वाचत असतांना लेखनासारख्या नवीन क्षेत्रात माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला काहीतरी लिहिण्याची स्फूर्ती न येओ तर नवलच. मला ह्या संस्थळावर काही गोष्टींची उणीव भासते, ती मी इथे मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे मुद्दे सर्व मिपाकर आणि मिपाच्या व्यवस्थापनाला योग्य वाटल्यास ह्या मुद्द्यांवर विचार करावा हि विनंती, मुद्द्यांवरील उपाययोजना जर मिपावर अगोदरच असतील तर जाणकारांनी त्या उपाय योजना समजावून द्याव्यात हि अजून एक विनंती. मुद्दे योग्य न वाटल्यास बिनदिक्कत हा धागा काढून टाकावा.
१. मिपा वर मराठी कसे लिहावे हे मला तरी ४-५ लेखांनंतरही उमगले नाहीये, मी सध्या तरी गुगल चे ऑनलाइन मराठी टूल वापरून लिखाण करतो आहे. अशी समस्या कोणालाही न येवो ह्या साठी मिपावर मराठीतून लिखाणासंबंधी योग्य असे मार्गदर्शन तसेच कोणकोणत्या ब्राउझर्स मध्ये मराठी लिखाण व्यवस्थित्त करता येईल हे देखील नमूद करावे.
२ . मिपावरील सदस्याच्या नावावर टिचकी दिल्यास उघडणार्या पानावर सदस्यांचे छायाचित्र एकतर दिसत नाही किवा किवा ते अगदीच छोटे दिसते, तेव्हा हे छायाचित्र मोठे म्हणजेच चेपु वरील छायाचित्र एवढे दिसेल अशी सोय करावी जेणेकरून लेखक/लेखिका कोण आहे हे समजून घेणे सोपे जाईल व मिपा कट्ट्यावर भेटणारे सर्वच अनोळखी वाटणार नाहीत.
३ . सदस्यांच्या द्रश्य ह्या पानावर चेपुच्या सदस्यत्वाचा दुवा देण्याची ऐच्छिक सोय असावी.
४. सर्व लेख मालिकांमध्ये पुढील व मागील भागांचे दुवे स्वयंचलित रित्या डकवले जातील अशी सोय असावी जेणेकरून लेखक दुवे देण्यास विसरला असता लेखमालिकेतील सर्व लेख सहज रित्या वाचता येतील. मी स्वतः दुव्यांअभावी काही लेखमालिका पूर्ण वाचूच शकलो नाही.
५. एखादा लेख वाचत असताना त्या लेखकाच्या इतर लखांचे दुवे जर डाव्या किवा उजव्या बाजूस दिले गेले तर त्या लेखकाच्या इतर लेखनाचा आनंद वाचकांना सहजच घेता येईल.
वरील मुद्दे सर्वस्वी माझ्या मनाची उपज आहेत, ह्या सर्वात कुठलाही स्वार्थ किंवा हेतू दडलेला नाही. कृपया मिपाकारांनि मुद्द्यातील उपयुक्तता व फोलपणा प्रतिक्रियांमध्ये व्यक्त करावी.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
16636
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
एखादा प्रतिसाद आवडला तर "लाइक
असहमत
In reply to एखादा प्रतिसाद आवडला तर "लाइक by खटपट्या
+१
In reply to असहमत by क्लिंटन
भंपक पणा
In reply to असहमत by क्लिंटन
+१
In reply to भंपक पणा by चौकटराजा
मूर्खांचा बाजार.
In reply to भंपक पणा by चौकटराजा
ते एक असो.....
In reply to मूर्खांचा बाजार. by प्रभाकर पेठकर
+१ कोटी
In reply to ते एक असो..... by बॅटमॅन
नुस्ता लोकसंख्येतला फरक नसावा
In reply to +१ कोटी by कपिलमुनी
स्टेटसः
In reply to नुस्ता लोकसंख्येतला फरक नसावा by बॅटमॅन
खी खी खी. खरय.
In reply to स्टेटसः by गवि
सॅड
In reply to स्टेटसः by गवि
व्हेरी सॅड...
In reply to सॅड by बॅटमॅन
बाकी सोडा,
In reply to व्हेरी सॅड... by पिलीयन रायडर
लाइक्स देणारे पुरुष.. त्या
In reply to बाकी सोडा, by बॅटमॅन
खरंय. पुरुषांचे असे
In reply to लाइक्स देणारे पुरुष.. त्या by पिलीयन रायडर
अवांतर
In reply to +१ कोटी by कपिलमुनी
एका मैलात १७६० यार्ड असतात
In reply to अवांतर by बॅटमॅन
शक्यता रोचक आहे. जरा
In reply to एका मैलात १७६० यार्ड असतात by नितिन थत्ते
छप्पन
In reply to एका मैलात १७६० यार्ड असतात by नितिन थत्ते
ते दोन्ही आकडे डाव्या कुशीवर
In reply to छप्पन by रमेश आठवले
सहमत
In reply to असहमत by क्लिंटन
ठीक आहे,
In reply to असहमत by क्लिंटन
काही उत्तरे
२,३.वर संपादकच निर्णय घेऊ
In reply to काही उत्तरे by निशदे
हे करा
In reply to काही उत्तरे by निशदे
धन्यवाद.....
In reply to हे करा by भुमन्यु
थोडी मदत
ऑर्कुटवर अॅक्टीव्ह असताना
गि-हाईक
In reply to ऑर्कुटवर अॅक्टीव्ह असताना by सांजसंध्या
कुणाला ?
In reply to गि-हाईक by कपिलमुनी
एक विनंती,
इथे पूर्वी "सर्च" साठी tab एक
"गेल्या काही दिवसात
मिपा चे फेसबुक करु नका म्हणजे
सध्या खरडवहीतील खरडी डीलीट
खरडवही मध्ये उत्तर द्या असा
काही प्रतिसादांमध्ये फारच
माझी काही उत्तरे
१००% सहमत!
In reply to माझी काही उत्तरे by पैसा
मात्र काही गोष्टींबदल मला असे वाटते, की मिपा हे मुख्यतः चांगले लिखाण आणि वाचन सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले आहे. सोशल इंटरअॅक्शन ही दुय्यम आहे.
ह्या पेक्षा जास्त समर्पक उत्तर नसावे! - (मिपाकर) सोकाजीपैसा ताईंना धन्यवाद,
ज्योती ताई.
खरडी
In reply to ज्योती ताई. by विजुभाऊ
हा हा हा....... पूर्वी म्हणजे
Mark as Unread
प्रतिसादांची अनुक्रमणिका
आठवले साहेब,
In reply to प्रतिसादांची अनुक्रमणिका by रमेश आठवले
नंबर वेळेप्रमाणे द्या पण
In reply to आठवले साहेब, by भाते
http://marathi.changathi.com/
मिपा जाहिराती विभाग
ज्या प्रमाणे विविध blogging