समसचा २० वा वाढदिवस
लेखनप्रकार
३ डिसेंबर १९९२ ला नील पॅपवर्थ नामक ब्रिटन मधील एका टेलीकम्युनिकेशन मधे काम करत असलेल्या इंजिनियरने मोठ्या संगणकावर Merry Christmas असे टंकले आणि "एंटर" चे बटन दाबताक्षणी ते युकेस्थित व्होडाफोनच्या एका डायरेक्टरच्या हाताच्या पंजापेक्षा मोठ्या असलेल्या मोबाईल फोनवर चमत्कार झाल्याप्रमाणे ते अवतिर्ण झाले आणि जगातला पहीला एस एम एस तयार झाला. अर्थात एका हाडाच्या इंजिनियरच्या दृष्टीने त्याने एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. यापुढे काही नव्हते. पण कंपनीच्या उद्योजक मनास त्यातूनच एक मोठी धंद्याची संधी दिसली. पुढे बघता बघता एस एम एस चे प्रस्थ वाढत गेले. अर्थातच हा पॅपवर्थ काही एस एम एस कल्पनेचा जनक नव्हता तर त्याचे श्रेय फिनलंडच्या एका माजी सरकारी अधिकार्यास, मॅट्टी मॅकोनेनला जाते, ज्याने ही कल्पना सर्वप्रथम १९८४ साली मांडली होती. तरी देखील त्या शोधाचे श्रेय हा मॅट्टी स्वतःकडे घेत नाही, कारण तो अस्तित्वात त्याने स्वतः आणला नाही म्हणून.
या एस एम एस ने अमेरीकेत हवे तितके बस्तान बसवले असे वाटत नाही. अर्थात आत्ताची टीन एजर आणि थोडी त्यावरील पिढी जरी टेक्स्टींग करत असली तरी. पण भारत आणि इतर अनेक राष्ट्रात त्याने चांगलेच मूळ धरले आहे. कालांतराने, एस एम एस बरोबरच एम एम एस पण चालू झाले. स्मार्ट फोन्समुळे हे अधिकच सोयिस्कर होऊ लागले. याचा उपयोग जसा सहज संवादासाठी होऊ लागला तसेच त्याचे महत्व हे आपत्कालीन स्थितीत पण जाणवू लागले.
एस एम एस मुळे दोन ठळकपणे दिसणार्या गोष्टी नक्की झाल्या. एक म्हणजे इंग्रजीचा वापर करत पण lol, omg, ttyl वगैरे अनेक शब्दांचे पेव फुटले. कुठेही औपचारीकतेने बैठका घेऊन यातील एकाही शब्दाला प्रातिनिधिक मान्यत न मिळता ही एक आगळी वेगळी लोकभाषा तयार झाली!
दुसरे म्हणजे एस एम एस मधील Character मर्यादा लक्षात घेऊन त्याचा इंटरनेट माध्यमात वापर करत ट्वीटर तयार झाले. इंटरनेट अॅक्सेस असलेल्या कुठल्याही लहान स्क्रीनच्या फोनवर वाचता येईल असे हे आगळेवेगळे संवादाचे माध्यम तयार झाले आणि त्याने अक्षरशः क्रांतिकारी मदत या जगात केली, त्याच बरोबर भारताच्या बाबतीत म्हणायचे तर अगदी अमिताभ पासून ते दिग्गीराजांपर्यंत अनेक जणांना vent out करायचे एक साधन मिळाले!
आजच्या जगाय तुम्ही टेक्स्टींगवर किती अवलंबून आहात? का फेसबुक्/इमेल कडे गाडी अधिक वळली आहे? एसएमएस संज्ञेतील कुठले शब्द तुम्ही जास्त वापरता असे वाटते? नव्याने तयार झालेले काही शब्द? मराठीत असे शब्द आहेत का? वगैरे वगैरे वगैरे...!
वाचने
6439
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
समसचा इतिहास माहित नव्हता.
In reply to समसचा इतिहास माहित नव्हता. by रेवती
हं....
In reply to हं.... by प्रास
हा हा हा. मलाही आत्ता तो
In reply to समसचा इतिहास माहित नव्हता. by रेवती
"समस" व "गबोल" हा भाषांतराचा
In reply to "समस" व "गबोल" हा भाषांतराचा by श्रीरंग
हेही मला आधी माहित नव्हतं पण
In reply to हेही मला आधी माहित नव्हतं पण by रेवती
हे तर काहीच नाही...
In reply to हे तर काहीच नाही... by विकास
थोडंसं अवांतर
माहितीपूर्ण लेखन.... धन्यवाद
लेख आणि लेखविषय आवडला
In reply to लेख आणि लेखविषय आवडला by बहुगुणी
छान लेख छान प्रतिक्रिया
In reply to लेख आणि लेखविषय आवडला by बहुगुणी
लघुरूपे
काही वर्षांपूर्वी
लेख
In reply to लेख by नंदन
लेख आवडला.
In reply to लेख by नंदन
law of Attraction ???
लेख आवडला
हो काल एस एम एस चा वाढदिवस
वर्षा-दोन वर्षापुर्वीपर्यंत
वॉव. लेख आवडला. संदेशाची
उत्तम लेख
विकास साहेब, लेख उत्तम आहे.
२० वर्षांच्या मानाने समस हे
नवीन गोष्ट कळाली
In reply to नवीन गोष्ट कळाली by इरसाल
.
एसेमेस ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
In reply to एसेमेस ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! by पैसा
ठीक आहे. मग मला तो अर्ध्या
In reply to ठीक आहे. मग मला तो अर्ध्या by रेवती
नंबर दे
In reply to नंबर दे by पैसा
(No subject)
धन्यवाद
मी स्वतः क्वचीतच समस वापरतो