माझे महान प्रयोग - २
माझे महान प्रयोग - १ मागील भाग.
सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.
सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला !
माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !
मिसळपाव