आज
नक्कीच काहीतरी चुकतय आज
कशान हे मन वेड दुखतय आज?
कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी
पिंगा घालतात भलत्याच वेळी
अनावर रात्री चांदण्याची खेळी
सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज!
मनातल गाणही ओठांवर नाही
सुरांच गाव कुठे दूरवर राही
उजाड माळ का वाट माझी पाही?
आभाळही पापण्यांत झुकतय आज!
उदास झाडांची गळतात पानं
निस्तेज चंद्राच वितळून जाणं
धुक, जस दुखणं जुनं-पुराणं
उफाळून पुन्हा का सलतय आज?
Taxonomy upgrade extras
मिसळपाव