माजी विद्यार्थी मेळावा.... असाही!
मागच्या आठवड्यात घरी फोन आला... 'उद्या माजी विद्यार्थी मेळावा आहे शाळेत. सध्याकाळी ५ वाजता शाळेच्या पटांगणात. जरूर या.' कुटुंबातील दोन पिढ्या शाळेत बालवाडी ते दहावी पर्यंत शिकलेल्या असल्याने आमंत्रणाचा विशेष आनंद झाला. उशीरा आमंत्रण दीले असले तरी काही हरकत नाही. जुने शिक्षक भेटतील आणि शाळेतील सोबती भेटतील ह्या आनंदात बाकी सर्व गोष्टी आम्ही विसरून गेलो.
ठरल्या वेळेवर (अंमळ जरा आधीच...) आम्ही शाळेत पोचलो... पुण्यातील शिवाजीनगरची 'भारत इंग्लिश स्कूल' ही अस्मादीकांची बालपणची कर्तूत्वभूमी !!! नाव इंग्लिश असले तरी संपूर्ण शाळा मराठीतच चालायची.
मिसळपाव
आपला,
विन्या विद्यार्थी