Skip to main content

प्रकटन

अभिनंदन!!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 08/04/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुकयाची आवली... हे मानपत्र ..!!! माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे. लेखिकेचे अभिनंदन! आणि मिपा तर्फे शुभेच्छा!!

उन्मनी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 08/04/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवात मन चैत्रपालवी धुंद मोग-याचा गंध लपेटून प्रीत जागवी तुझ्या विरहात मन वैशाखवणवा जळे तनमन, आसुसला प्राण शोधतो गारवा तुझ्या चिंतनात मन आषाढमाया शामरंगी घन आभाळी रेखिती काजळछाया तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे तुझ्या सावलीत मन शरदचांदणे सावळ्या रात्रीच्या अंगांगी फुलली लक्ष गोंदणे तुझ्या प्रणयात मन रंग फाल्गुनी घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 08/04/2009 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.

फुलोरा..(माझ्या चाली सकट)

लेखक प्राजु यांनी सोमवार, 06/04/2009 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलोरा... केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली का उषेच्या उंबर्‍याशी, रे उभी ओठंगुनी ती?? चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. - प्राजु इथे ऐका कृपया न हसता..!

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 05/04/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु. नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो!

तुझे माझे नाते

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 04/04/2009 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे नाते जशी गूढ सागराची खोली दूर दूर तरी एक तुझी माझी मनबोली तुझा धुंद निशिगंध, माझी नाजूक अबोली तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी तुझे माझे नाते जशी घनगर्द देवराई तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई तुझे माझे नाते जशी श्रावणसरींची गाणी तुला-मलाच कळली प्राक्तनाची गूढ वाणी तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी तुझे माझे नाते जसे उठती तरंग जळी आभाळीच्या खेळियाने मांडली अबोध खेळी तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी
Taxonomy upgrade extras

सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 04/04/2009 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच व्यवस्थापक ( हा शब्द आवडत नसल्यास तो असा वाचा- मॅनेजर, बॉस, पी. एम.) आपल्या कर्मचारींबद्दल काही खूणगाठी (मराठी- अझम्पशन) मनात ठेवतात. त्यांच्या ह्या त्या खूणगाठी काहींच्याबद्दल चांगल्या असतात तर काहिंच्याबद्दल चांगल्या नसतात. आपण चांगल्या नसलेल्या खूणगाठी व्यवस्थापकच्या मनात का निर्माण होऊ शकतात त्या एका शक्यतेबद्दल बघू.

तु !

लेखक दशानन यांनी शनिवार, 04/04/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?

ब्यूटी पार्लर अर्थात यौवनफुफाटा

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 03/04/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
सांग दर्पणा कशी मी दिसते... ..... जामानिमा साग्रसंगीत कौशल्याचे कुवलयापीड .... मन जळे जीव उरे काजळावर कृष्ण पुटे .... हल्लीच फुटलीय कोंडी अन् परतवलेत आरंभशूर हल्ले ... फसव्या क्रांतीला झालीय बाधा यच्चयावतांची विचक्षण त्रेधा ... पीटिकांना मसाज अन् मलम पण मनावर कोणते कलम? ... कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार दिव्या दिव्या दीपत्कार...
Taxonomy upgrade extras