मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांज-राधा

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
त्या सांजकोवळ्या उन्हात सजल्या वाटा गुणगुणती गीते तुझी निरागस लाटा मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे माडांच्या छाया झुलती वार्‍यासंगे जणु कृष्णसख्याचा रास आगळा रंगे आसमंत भारित सूर मुरलीचे आले कालिंदीचे जल थबके, कदम्ब डोले तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखांचा दरवळतो हलका भास मधुर गंधाचा या चराचराला जडली त्याची बाधा श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा

वाचन 3648 वाचनखूण प्रतिक्रिया 16

बेसनलाडू गुरुवार, 03/19/2009 - 23:09
कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू आज मिपावर गोपाळकाला कसा काय रंगलाय? (गोप)बेसनलाडू

प्राजु गुरुवार, 03/19/2009 - 23:10
क्य बात है! शब्दा शब्दाला दाद द्यावी अशी आहे कविता. :) मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे खूप गोड आहे ओळ ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मृगनयनी Fri, 03/20/2009 - 10:48
या चराचराला जडली त्याची बाधा श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा अ प्र ति म ! ! ! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

या चराचराला जडली त्याची बाधा श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा सोनुली राधा...कित्ती गोड शब्द... आणि तितकीच गोड गोडुली तुझी कविता .... सुन्दर ..!!! अवांतरः आज राधा-कृष्णा च्या कविताच कविता येत आहेत...:-) मिपाचं गोकुळ झालयं :-) ( हॉटेलाचं गोकुळ.. :-) )

In reply to by स्मिता श्रीपाद

शितल Fri, 03/20/2009 - 19:20
क्रांतीताई, तुमच्या सर्व कविता सुरेख असतात. :)

सूहास Fri, 03/20/2009 - 18:59
"आज शतजन्माच्या मीरेने राधेविषयी लिहील" क्या बात हे !!! लयबध्द आणी सुरमय कविता तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखांचा वाचुन गुदगुल्या झाल्या. सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

क्रान्ति Fri, 03/20/2009 - 19:16
धन्यवाद मित्रांनो! अशा प्रेरणादायक प्रतिसादांमुळे नव काहीतरी सुचत जात आणि लिहावस वाटत! मीरा काय आणि राधा काय? दोघींच आराध्यदैवत कान्हाच ना! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

In reply to by क्रान्ति

सूहास Fri, 03/20/2009 - 19:19
मीरा काय आणि राधा काय? दोघींच आराध्यदैवत कान्हाच ना! सही.... सुहास.. (द गुड)

लिखाळ Fri, 03/20/2009 - 19:19
वा ! सुंदर कविता. माडांच्या सावल्यांच्या रासलीला तर फार छान ! -- लिखाळ.