Skip to main content

प्रकटन

वाटा वेगळ्या

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 14/04/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द निळाईने रंगले आभाळ शांत तळ्याकाठी दिशा विसावल्या हलकेच जरा छेडता वा-याने पाण्यात तरंग होऊन सांडल्या सोन्याची झळाळी माखलेली सांज फुलवित आली प्राजक्तपाकळ्या घुमे घंटानाद राउळाच्या दारी दूर डोंगरात झांजाही वाजल्या काजळे क्षितिज, अंधाराच्या संगे गूढ, अनामिक सावल्या जागल्या एका अवघड वळणावरून झाल्या तुझ्या माझ्या वाटाही वेगळ्या तुझ्या वाटेवर आतुर फुलांनी मुलायम गंधपाकळ्या पेरल्या माझ्या वाटेवर उदास काळोख, काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या तुझी वाट साद सुखाची घालते, उजळीत लाख चांदण्यांच्या कळ्या माझी वाट घुटमळते एकटी, जशा पायी मणामणाच्या साखळ्या
Taxonomy upgrade extras

कोणास ठाउक...!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/04/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचाही जयघोष करावा इताका मी लहान नाही.. कुणाचाही उपमर्द कारावा इतकाही मी महान नाही..! मी असा एक पांथस्त आहे , जो शोधतो आहे मार्ग , अंतःस्थ होण्याचा.. कधी पासुन.. ? कोणास ठाउक..! कारण... मला कधीच नाही सापडलं या गर्दीत माझ अस्तित्व.. अन तरी ही मी सामिल होतो त्या गर्दीत अधुन मधुन.. का .. ? कोणास ठाउक..! मी सापडलो आहे द्वंद्वात जीवन मरणाच्या.. कारण मला वाटते आदर्शां बद्दल आदरयुक्त भीती.. पण कळत नाही कशी रोखु माझी नैतिक अवनती.. हीणकस स्वार्थपरता.. हि लालसा खदखदती... मला वाटतं हा लढा मी हारणार.... मी लढता लढता असाच मरणार.. कधी..? कोणास ठाउक..!!!
Taxonomy upgrade extras

मृत्योर्मां अमृतं गमय !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/04/2009 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्य उगवताना खुप सुंदर दिसतो , पण त्याही पेक्षा सुंदर दिसतो मावळताना , कारण तो देतो दशदिशांना... उद्याच्या सुर्योदयाची ग्वाही...! सरणावर मरण जळतांना , कुणीतरी नाजुक ढुश्या देत असतं मातेच्या गर्भालाही...!! मृत्योर्मा अंमृतं गमय .. याचा अर्थ हाच असावा बहुधा...!!!!
Taxonomy upgrade extras

गणित

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 11/04/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला का ग? कशाला वाट बघत आहेस त्याची? नाही येणार तो. एकदाच चुकलीस तु. बेरीज केलीस वजाबाकी झाली. काहीही झाले नाही आहे मला. परवा परवा तर खेळलो आपण 'चेरीचा' खेळ आज दिसली नाहीस. का मलाच झोप लागली होती? दोन्ही गालावरच्या तुझ्या खळ्यात मी मला शोधतो. गमतीने म्हणायचो तुला तु असलीस तर पाण्याची टंचाई नाही. दोन बालद्या पाणी तर तुझ्या गालावरच्या खळ्यात साठवता येईल. कालच स्वप्न सांगु का तुला? उगाच अर्थ शोधायचा नाही. डोळ्यात पाणी आणायच नाही. वचन दिले आहेस तु मला. त्याची वाट तर अजिबात बघु नकोस. अग बटण शेवटी तीसराच दाबणार ना? तो असला काय नसला काय काहीही फरक पडणार नाही. तु मात्र जरुर ये. अगदी नियम मोडुन तस

शर्यत

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 10/04/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा तुझी काळजी वाटते मला. तु म्हणतेस की बराच शांत झालो आहे. खरे तर खुप अस्वस्थ आहे. लग्नानंतरचे १ ले वर्ष सोडले तर तु स्वःतला मुलाभोवती केंद्रीत केलेस. तुझ्या आयुष्याच्या वर्तुळाचा केंद्रबिंदु होता तो. अर्थात बाकीच्या जबाबदार्‍या पण समर्थपणे पेलल्यास. बायको, सुन, काकी, मामी, मावशी ही नाती सांभाळताना कुठेही कमी पडली नाहीस. सर्व कुटुंबात तुझा उदो उदो आहे. ही कर्तव्य पार पाडताना कुठे गुंतली नाहीस. माझ्यात सुद्धा नाही. अर्थात त्या बाबत आज माझी काहीही तक्रार नाही. फारसे सख्य नसलेल्या जावेच्या नातीत गुंतायला का लागली आहेस? तुम्ही दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी कशा काय होत आहात? का चाहुल लागली आहे तुला

पुढील टप्पा--IIM अहमदाबाद

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 10/04/2009 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मला आपणास कळवायला अत्यंत आनंद होत आहे की मला जून २००९ मध्ये सुरू होणार्‍या अहमदाबादमधील भारतीय प्रबंधन संस्थान (IIM Ahmedabad) या संस्थेच्या प्रबंधनातील पदव्युत्तर प्रोग्रॅम (MBA) साठी प्रवेश मिळाला आहे.निकाल थोड्या वेळापूर्वी जाहिर झाला.माझा अभ्यासक्रम जून महिन्यात सुरू होईल आणि त्यापुढील दोन वर्षे चालेल.दरम्यानच्या काळात मिपावर कधी आणि किती वेळा येणे होईल हे सांगता येत नाही तरीही मिपा हेच माझे आंतरजालावरील मराठी घर असेल यात मला कसलीच शंका वाटत नाही. मी या लेखात म्हटल्याप्रमाणे चांगला निकाल लागताच मिपावर जाहिर करत आहे.

अपुर्ण वर्तुळ

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 09/04/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मधे तुझी केस नेमकी माझ्या टेबलवरच यावी हा निव्वळ योगायोग नसणार. "डॉक्टर, होइल ना हो मुल"? आधी वाटले की तु चेष्टा करत आहेस. सासु समोर ओळख न दाखवता ओळख आहे का?

कावड , टरबुज अन शक्ती !

लेखक पहाटवारा यांनी गुरुवार, 09/04/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही या नव्या घरी रहायला येउन २-३ आठवडेच झाले होते. काल संध्याकाळि घरि येताना गल्लीच्या तोंडाशी थोडि गजबज जाणवलि. तिथे एक मारुतिचे मंदिर आहे. एरवी एक पुजारि अन एक दोन वयस्क सोडले तर कुणी फारसे दिसले नव्हते. हिला विचारले, "आज कोणवार गं, बुधवार ना ?" "ह्म्म !" दिवसभराच्या ऑफिसच्या रगाड्यामुळे दमलेल्या आवाजात तिने ऊत्तर दिले. "मग बरोबर आहे. ऊद्या हनुमान जयंती ना ! त्याचीच गड्बड असेल." मी थोडेसे मनाशीच बोलल्यासारखे म्हणलो. "तुला काय माहित? कालनिर्णय तर सापडत नाहिये नविन घरात आल्यापासुन" "अगं, शुक्रवारिच तर रामनवमीची सुटि होती ना? मग रामनवमी पासुन सहा दिवसांनी हनुमान जयंती!

भाकरीतला जलालाबादी

लेखक कवटी यांनी गुरुवार, 09/04/2009 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : रेवती आणि विशाल कुलकर्णी वार्डाबुरुंडी फिरताना, जुनी मळकी भाकरी मिळाली हलकेच घासता भाकरीमधुनी जलालाबादी की हो निघाला ठो ठो ठो ठो .... हवेत गोळ्या झाडून म्हणाला बोल माझ्या मुला, कुठले ऐकवू भाषण तुला? भाषण तर कधीच ऐकले शोधतो नव्या 'क्षणभंगूर सिंगूर' ला महाकाव्य शोधणे झाले मुश्किल बाबा रे, आता तुझाच हवाला विषण्ण हसला, हळुच म्हणाला मालको, जुना जमाना गेला भाकरी गेली पिझ्झा आला असते जर सोपे लिहीणे महाकाव्य ते पुर्ण करणे महाकवी तुझा हा असा असता का गंजल्या खाटेवर पडला? वार्डा, बुरुंडी नाहीतर गेल
Taxonomy upgrade extras

चैत्रगौर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 09/04/2009 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी.