दोन संघटना
१३ जानेवारी१८८८ रोजी ३३ संशोधक आणि शोधक (एक्सप्लोरर) कॉसमॉस क्लब, वॉशिंग्टन येथे जमले व त्यांनी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना केली. ह्या मंडळींना कळून चुकले होते की, जगात अजुन खूप काही शोधून काढायचे बाकी आहे व मानवाला पृथ्वीबद्दलची एकंदरीतच माहिती खूपच त्रोटक आहे. केवळ स्थानिकांकडे असलेली माहिती व आत्तापर्यंत जेथे मानव जाउच शकला नाही तेथे जाउन नवी माहिती जगासमोर आणणे अशा दोन्ही बाबी महत्वाच्या मानुन ह्या सोसायटीची गुढी उभारली गेली.
ह्या सोसायटीचे उद्दीष्ट्य "भौगोलिय माहितीचा विस्तार व प्रसारण" असे ठरले. सोसायटीची घटना तयार करुन गार्डीनर हबर्ड हे पहिले अध्यक्ष झाले.
मिसळपाव