रोमरोमात जागली तुझ्या मुरलीची साद
दाही दिशा ओलांडून घुमे आज अंतर्नाद
भल्या पहाटे प्राणांत जणु काकडा पेटला
तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला
आसावल्या पावलांना वाट दिसे पंढरीची
सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ अंतरीची
द्रौपदीच्या दारी उभा चराचराचा हा स्वामी
भुकेल्याची तृप्ती इथे जाणवते अंतर्यामी
दूर भौतिकापासून भक्तिमार्गाला निघाले
अंतर्बाह्य बदलले, मन विश्वरूप झाले
लक्ष चौर्यांशीचे फेरे किती काळ आता साहू?
मुक्ती देई मायबापा, आता अंत नको पाहू
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2169
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर!
आशयघन
क्रांती बै
छान आहे हो
हेच म्हणते..
वाहवा!
मस्त !
तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला