Skip to main content

प्रकटन

श्रद्धांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/04/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिपाकर सहजराव यांच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याचे कळले. संपूर्ण मिपा परिवारातर्फे विनम्र आदरांजली... तात्या.

(डास)

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 01/04/2009 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास

दास

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 01/04/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा आप, तेज, वायु, धरा, सार्‍यांतच भास तुझा तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा माझी ही कविता आमच्या मुंबईहून प्रसिद्ध होणा-या कार्यालयीन अंकात {संचारिका २००७=०८} मध्ये पूर्व प्रकाशित झाली आहे.

ओसाड राजमार्ग

लेखक जयवी यांनी सोमवार, 30/03/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन उत्तरं कशीबशी जुळवता येतात. उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला सापडतोच कुठला तरी वशिला चढ उतार नकोच असतात आडवळणं मग शोधली जातात तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन खरी वाट सोयिस्करपणे विसरुन सवयी त्याच अंगवळणी पडतात आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात. जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपितले - स्टेज आणि मी

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 30/03/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा पंधरावा आणि अंतिम लेख
मी आणि स्टेज
(माझा आत्तापर्यंत झालेला स्टेजप्रवास) तशी अंगात स्टेजवर जावुन बडबडायची होउस दांडगी ,त्यामुळे दिसली स्पर्धा की घे भाग अस नेहमीच व्ह्यायच(नंबर यायचा नाही हा भाग सोडा,पण बोंबलायचो)अगदी बालवाडी पासुन .तेव्हाचे फोटो अजुन आहेत, आता ते पाहिल्यावर माझे मलाच हसु येते पण चालायचेच स्वतःवर हसण्यात जी मजा असते ती दुसर्‍याला हसण्यात नाही हे मात्र खरे ..असो , तर असे करत मी ४थीत आलो ,आणि कधी नव्हे ते मला शाळेसमोर भाषण करायची संधी मिळाली विषय होता ल

महाजालावर कोल्हापुर

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 28/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझे मित्र राजे हे आमच्या गावाबद्दल अर्थात कोल्हापुरबद्दल खुप लिहित आहेत त्यामुळे अनेकाना कोल्हापुरबद्दल उत्सुकता असेल ती उत्सुकता ऑनलाइन भागवण्यासाठी हा लेख सध्याचे युग हे संगणक युग आहे यापुढे सर्व व्यवहार संगणकावर होणार आहेत त्यामुळे सध्या महाजालावर कोल्हापुरची स्थिती काय आहे याचा यानिमित्याने आढावा घेणे आगत्याचे ठरते आणि म्हणुनच एक नेटीझन म्हणुन घेतलेला हा आढावा तर प्रथम आपण गुगल कडे वळु गुगलवर एखाद्या गावाला योग्य स्थान असणे म्हणजे त्याबद्दलची योग्य माहिती उपलब्द्ध असणे महत्त्वाचे आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरची दखल गुगल कडे आहे गुगल मॅप द्वारे(

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

मनाच्या कुपितले-सिंदबाद आणि परिक्षा

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 27/03/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा १४वा लेख (गुढी पाडव्यानिमित्य प्रकाशित) रामराम सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षाच्या कशा शुभेच्छा द्याव्यात ते समजत नव्हते म्हणून म्हणले एक लेखच लिहु त्यातला त्यात सर्वाना आवडलेला माझा लेख म्हणजे सिंदबाद कोल्हापुरात म्हणूनच आज सिंदबादला सफरीवर घेवुन जातोय पुन्हा एकदा ..........सिंदबाद शाळेत तर सिंदबाद कोल्हापुरात खुप दिवस राहिला होता साहजीकच या काळात दहावी बारावीच्या परीक्षा ,इतरांच्या वार्षीक परीक्षा इत्यादी आलेच . नेहमी प्रमाणे कर्मधर्म संयोगाने तो तेथे प

माझं कोल्हापुर - भाग १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 27/03/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश.