Skip to main content

प्रकटन

चक्रव्यूह

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 23/04/2009 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
साध्या सोप्या संदर्भांचा अर्थ लावणंही कठीण होतंय भोवळ येईतो फिरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? अज्ञात भविष्याच्या दोरीवरून अधांतरी चालताना मनाचा तोल सावरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? नाचवणारी बोटं कुठली, धागा कुठला, दिसत नाही बाहुल्या होऊन नाचत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा भळभळणारा शापित जन्म जखमा फुलवत हसत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का? चक्रव्यूहात तडफडणा-या अभिमन्यूच्या अगतिकतेनं दैवाच्या गुंत्यात अडकून जाणं, एवढंच हाती राहिलंय का?

मी वसंत मी वसंत..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 23/04/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले, बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत... खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी, भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत... ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे, राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत... धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली, सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत... तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे, पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत... भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी, सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत...

माझे नाव

लेखक निशिगंध यांनी गुरुवार, 23/04/2009 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
जोवर मी लहान होतो. म्हणजे शाळेत जात असे. तोवर मला माहे नाव मुळीच आवडत नसे. मला माझ्या आई बाबांचा खुपच राग येत असे. मला वाटायचे की, हे काय निशिगंध नाव आहे तेही मुलाचे. नाजुक मुलीचे असल्यासारखे. कधी जर जर आजारी पडलो तरी डॉक्टर साहेब हात लावायच्या अगोदर सुचवायचे की, तुझे नाव फारच नाजुक आहे ते बदल म्हणजे तु आजारी नाही पडणार. आणी मी नाईलाजाने एक जळजळीत नजरेने आई बाबांना खुन्नस द्यायचो. निदान निशिकांत तरी ठेवायचे. पण आता मला निशिगंध हेच नाव खुप आवडते. कारण फक्त एकच ते म्हणजे निशिगंधाचे फुल..ते मला खुप आवडते. पांढरे शुभ्र नाजुक असे ते फुल पाहील्यावर मला असे उगीच वाटते की मीच आहे.

आणि माझा मारूती झाला-२

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 23/04/2009 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
As far as I am concerned, the child is absolutely normal. There are no strong triggers to confirm DYSFUNCTION>DISORDER>REBELLION>CHAOS THERORY. There is no random instance leading to another random instance and therfore traceble pattern to confirm chaos theory. May be the pattern is yet to emerge. And nothing is wrong in desire to leave a life with own Terms. In the mean time what do I tell the parents. केस हाताळ्णारे डॉक्टर म्हणाले. _____________________________________________________ मी कुमारीका नाही. मी पुरुष द्वेष्टी पण नाही. 'निंफोमॅनीयॅक' तर नाहीच नाही.

तारखेवरून वार

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 22/04/2009 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षांपुर्वी दुरदर्शन वर ज्ञानदीप का काहिश्या कार्यक्रमात एक वल्ली आली होती. ह्या महाशयांना म्हणे सर्व वर्षांचे कॆलेंडर पाठ होते. समोर बसलेला श्रोतृगण ह्यांना तारखा सांगत होते अन हे धडाधड त्यादिवशी वार कोणता हे सांगत होते. दोनेक वेळा हे गुरुजी चुकले देखील परंतु सुत्रसंचालकाने कशीबशी वेळ मारून नेली होती. परंतु त्या माणसाच्या ह्या सामर्थ्याचे आम्हाला त्यावेळी फ़ारच कौतुक वाटले होते. परंतु पुढे मागे ह्या तारखे वरून वार ओळखण्याच्या फ़ॊंर्म्युला समजला अन आम्हाला परम आनंद जाहला. तर मंडळी विषय असा होता कि कुठल्याही तारखेवरून त्या दिवशी वार कोणता होता हे कसे ओळखायचे? (अर्थात का

एक व्य नि..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/04/2009 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, आत्ताच ऑनलाईन आलो. नेहमीप्रमाणेच मिपाबद्दल काहीना काही सूचना करणारे, कंप्लेन्टी करंणारे, एकमेकांबद्दल तक्रारी करणारे दोन-पाच व्य नि आले होते. परंतु त्यातील एक व्य नि मला खूप सुखावणारा होता, आनंद देणारा होता. त्या व्य नि तील जो मजकूर होता त्याचे श्रेय अर्थातच मिपाचे आणि मिपाकरांचे! :) आपल्याही सर्वांना त्या व्य नि तील मजकूर निश्चित आनंद देऊन जाईल या हेतूने तो व्य नि मी येथे देत आहे. व्य नि पाठवणार्‍या व्यक्तिचे नाव उघड करणे अर्थातच उचित होणार नाही.

माझा परीघ

लेखक जयवी यांनी बुधवार, 22/04/2009 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
मनातलं..खूप खूप आतलं…….!! इतक्या वर्षानंतर सुद्धा तश्शीच आहे नव्हाळी तशीच कोवळी काही फांद्या झाल्या असतील थोड्‍याशा जुन्या… पण आतला ओलावा मात्र अगदी तस्साच ! एक छोटंसं मोग-याचं फुल सतत आसपास असावं… तसा तुझा सहवास हवाहवासा, ताजा, गंधाळलेला इतकी सवय झालीये ना त्याची !! कधी हेच मोग-याचं फुल अबोली बनतं ना… तेव्हा मात्र मन कावरंबावरं व्हायला लागतं अबोलीच्या मनातलं काढून घेणं फार फार कठीण ! पण एकदा का ही अबोली बहरुन गुलाबाची टप्पोरी कळी झाली ना…… की सगळं जगच गुलाबी होऊन जातं माझं ! ….. … आता हा गुलाब… आणखीनच डौलदार झालाय डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा आलाय केसातली ती चंदेरी वळणं… कानावर

निरोप घेताना..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 22/04/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेताना... नमस्कार मंडळी. निरोप!! निरोप देणं आणि निरोप घेणं या जशा दोन वेगवेगळ्या कृती आहेत त्याच प्रमाणे त्यांचे अर्थही संदर्भानुसार बदलतात. "जा, जरा समोरच्या काकूला निरोप दे, दुपारी बाजारात जाऊया म्हणून." असं आई म्हणते तेव्हा समोरच्या काकूला आईनं सांगितलेलं सांगणं.. याला आपण निरोप देणं असं म्हणू शकतो. निरोप घेणं यामध्ये सुद्धा बरेच अर्थ निघू शकतात. जसं, " मी बाहेर जाते आहे, आजोबांचा फोन आला तर निरोप घेऊन ठेव." यामध्ये आजोबा जे सांगतील ते लक्षात ठेव असा अर्थ असतो.पण बर्‍याचदा"निरोप घेणं" याचा अर्थ "टाटा, बाय बाय" असाच घेतला जातो. मुलगी सासरी जाताना आई-बाबांचा निरोप घेते.

मी पिंपळ

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 22/04/2009 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी पिंपळ... एक शतक तरी मी उभा आहे.. अलिप्त, नि:संग, एकटा... असंख्य चिमणी पाखरं माझ्या फाद्यांवर बसुन गेली वसंतातील कोकिळ कुंजने.. मी ही मनसोक्त ऐकली.. मी ऐकली प्रेमिकांची लाजरी कुजबुज.. त्यांचे रुसवे फुगवे.. लटकी भांडणे.. अश्रुंचे सांडणे.. समजावणे.. अन गजरा माळणे.. अनेक पांथस्थ , माझ्या सांनिध्यात विसावली. मी ही बनलो , त्यांच्या साठी सावली.. मी पाहिली माणसे , कोलमडलेली.. असंख्य वादळे , मी ही झेलली.. मी आहे अनेक लढ्यांचा , साक्षिदार... अन ऐकल्या गप्पाही , खुमासदार.. पण आता सारच संपलं या गावाचं म्हणे .. शहर झालं... आता पहिल्या सारख , नाही राहिलं
Taxonomy upgrade extras

फक्त 'बी'

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 22/04/2009 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वाजता ठाणे स्टेशनला उतरलो. आता रिक्षाची कटकट. रात्री दहा वाजता स्टेशनला रिक्षा मिळण्यासाठी 'पुर्वपुण्याई' सुद्धा पुरत नाही. त्यादिवशी काही पुण्यकर्म केले असेल तरच. बाहेर येतो तर ही मोठी लाईन. चालायला सुरु केले. म्ह्टल बघु मधे कुठे मिळाली तर. दहा पावले चाललो नसेन, बाजुला एक रिक्षा उभी राहीली. रिक्षातुन एक चेहेरा डोकावला. "या सर, तुम्हाला सोडतो". लगेच बसलो रिक्षात. "रामवाडी, ना" चेहेरा बोलला. "लुईस वाडी" मी काही हरकत नाही, मी घोड्बंदरला चाललो आहे. माझ्या काही लक्षात येइना. हा कोण ते. मला गप्प बघुन तो म्हणाला, "काय, सर ओळखले नाही का"? " नाही ब्वॉ" मी त्याने खुलासा केला, आणि लक्षात आले.