मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चैत्रगौर

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी. पहा आवडतेय का! गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

वाचने 7456 वाचनखूण प्रतिक्रिया 19

मदनबाण गुरुवार, 04/09/2009 - 07:27
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती सॉलिट्ट्ट्ट्ट्ट्... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

प्राजु गुरुवार, 04/09/2009 - 07:35
अतिशय सुंदर! केवळ सुंदर! शब्द भांडार जबरदस्त आहे. :) जियो!!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी गुरुवार, 04/09/2009 - 15:46
अहा....... अगं किती सुंदर...!! अक्षरशः मढवलंस तू चैत्रगौरीला तुझ्या शब्दालंकाराने......... !! मस्त !! "आभाळशेला" खूप आवडला :)

समिधा Fri, 04/10/2009 - 01:55
सजलेली चैत्रगौर अगदी डोळ्यासमोर आणलीस. खुपच सुंदर शब्द वापरले आहेस.. गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी मस्त =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शितल Fri, 04/10/2009 - 03:07
सुंदर काव्य रचना चैत्रगौर तुझ्या शब्दांनी सुंदर सजली आहे. :)