Skip to main content

तुझे माझे नाते

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 04/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे नाते जशी गूढ सागराची खोली दूर दूर तरी एक तुझी माझी मनबोली तुझा धुंद निशिगंध, माझी नाजूक अबोली तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी तुझे माझे नाते जशी घनगर्द देवराई तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई तुझे माझे नाते जशी श्रावणसरींची गाणी तुला-मलाच कळली प्राक्तनाची गूढ वाणी तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी तुझे माझे नाते जसे उठती तरंग जळी आभाळीच्या खेळियाने मांडली अबोध खेळी तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4075
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

कविता छान "फुलली" आहे !! :)

फुले ओवुन छान कविता केली आहे. :)

In reply to by अनामिक

आवडली !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

योग्य चाल लावली तर छान गाणे तयार होईल.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

वा! मस्त कविता! छान आहे. फुले ओवुन छान कविता केली आहे. असेच म्हणते.. --शाल्मली.

मस्त. कविता आवडली ऋषिकेश

एकदम सुंदर कविता क्रांतिजी... खास करुन हे कडवे अप्रतिमच तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी फक्त शेवटच्या ओळीत मला थोडी दुसरी ओळ सुचली ती देत आहे तुझे नि माझे नाते, जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ, तुझ्या नि माझ्या गाठीभेटी मनास मोह पाडी तुझी ती अंगकाठी शेलाटी ... :) किंवा मनाची तगमग अन् मग विरहात आठवतात तुझ्या त्या अटी :)

सुंदर कविता... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

माझी नाजूक अबोली तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी या ओळी मस्तच. पण गुलाबाची कोरांटी हे पटत नाहीं. उगीच न्यूनगंडात्मक भावना वाटते. तसेंच अशा भावरम्य कवितेंत मध्येंच प्राक्तन आणि आभाळाचा खेळ असे तत्वज्ञान रसभंग करतें तरी मस्त कल्पनांचा आस्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. सुधीर कांदळकर.

प्रतिसादांनी कवितेला आणखी फुलविणा-या सगळ्या मित्रांना धन्यवाद. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई........ अगदी अगदी :) फार गोड कविता झालीये क्रान्ति !!

वा फुलांचा खुप छान बहार आला आहे कवितेत.