Skip to main content

प्रकटन

मातीचेच पाय

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 28/04/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय? जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय! मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली वैभवाची ऐट हंड्या-झुंबरात टांगलेली देवाच्याच दारी होई देवाचाच निरुपाय मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली? सुकला स्तब्ध अश्वत्थ, इंद्रायणीही गोठली पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय कशी, किती जोजवावी माया ममतेची नाती? त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय!
Taxonomy upgrade extras

(बहु असोत)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 28/04/2009 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥ गगनभेदी माया तरी पडते ती उणी लोभाच्या सीमाही वाढती झणी चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥ प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे रस्ता वा चौकासही नाव मम पुरे "भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥ जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती 'फोडा अन राज्य करा' हीच तर निती धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥ गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो लक्ष्मी, कीर्ती, सत्

३रा दिवस

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/04/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
दचकलात काय? हे प्रकटन अगदी निष्पाप, निर्मळ, आणि निर्व्याज आहे. अगदी जपानी बँके प्रमाणे. ह्या प्रेमकथेतील पात्रांचे स्थळ, काळ, पत्ते हवे असल्यास व्यं. नी करावेत. वाचन झाल्यावर 'तब्बेत बिघडली का?' च्या खरडी पाठवु नयेत. पात्रसंख्या-३ काका, वय ५३, काकु वय ४५ मुलगा २१ लग्नाला २२ वर्षे झालेली. काकांनी कामाचे तास वाढवुन मंदीवर विजय मिळवलेला आहे. थोडक्यात सुखी मध्यम वर्गीय घर. काकू घरीच असतात. _______________________________________________________ भ्रमण ध्वनीचा गजर झाला. त्या मधुर नादाने मला जाग आली. वातानुकुलीत यंत्राची कालच आंघोळ झाल्याने शयनगृहाला 'काश्मिर्'चे स्वरुप आले होते. हळुच बाहेर आलो.

महाराष्ट्र गर्व माझा

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
१ मे २००९ महाराष्ट्र राज्य स्थापना सुवर्ण महोत्सवी माझी ही कविता माझ्या महाराष्ट्रासाठी !
संतांची पुण्यभूमी वीरांची रणभूमी जगात वेगळा महाराष्ट्र माझा शिवबा माझे दैवत भवानीची मला सोबत जोशात लढेन दर्याला हरवेन पंचगंगेचे पाणी कोल्हापूरी वाणी शत्रुंनो तलवार म्यान करा वाहतील रक्तांच्या धारा महाराष्ट्र गर्व माझा
कवितेमधील व्याकरण व लय चुका सुधारण्यासाठी प्राजु ह्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

जे मला दिसले ते

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

फिक्शन - मी त्याला चावलं

लेखक टारझन यांनी रविवार, 26/04/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
सन ३१०२ : मेचा कडक थंडीचा हिवाळा ,सगळी कडे बापे लोक .. आप्पाराव सोपानराव वाघमारे हॉस्पिटलचा परिसर, णर्सोबांची (मेल णर्स) धावपळ !! मॅटर्निटी वॉर्डचा परिसर .... मजला नंबर ४१०, रूम १२: -------------------------------------------------------------------------------------------------------- ऍकिलोप्टस आपल्या पाचव्या डिलेव्हरीसाठी आला होता , अजुन एका डिलेव्हरी नंतर त्याची ओव्हर संपणार होती . ३ वर्षांपुर्वीच ऍकिलोप्टस आणि काळूराम ह्यांचा विवाह झाला होता... आनंदात दिवस जात होते आणि ऍकिलोप्टसची एकेक डिलेव्हरी होत होती .. सगळी सरळसोट गोरी पोरं ?

मी तिला वाचवलं!

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 25/04/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, तिला पहिलंवहिलं कन्यारत्न झालं होतं. तिच्या सासरी माहेरी दोन्हीकडे मुलांच प्रमाण जास्त होतं, मुलगी ही एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! तिलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दिवसभर सासूबाई आणि रात्री आई दोघी चिमुरडीची काळजी घेत, त्यामुळे तिला निवांत आराम मिळत असे.

एकमत

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 25/04/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
जिंका हारा पाडा झोडा एकमताने सत्ता येता लोणी चापू एकमताने टांगायाची बाकी आहे वेशीवरती अब्रु लुटूया जत्रेनंतर एकमताने देश आमचा तरुणाईचा पहा झोपला म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने सत्तेसाठी सोडले पहा कमरेचेही नागवा म्हणती समोरच्याला एकमताने सत्तेच्या सर्कशीत नाहि मजा राहिली विदुषकांनी केला गोंधळ एकमताने सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने वार्‍यावरती देश सोडला एकमताने तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

मेहूण म्हणून ऍव्हलेबल! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 24/04/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियाच्या या लेखातील मेहुणाच्या आधुनिक कल्पनेनुसार, मी व माझी एक आवडती स्त्री कुणाकडेही मेहूण म्हणून भोजन झोडायला Available आहोत. कुणाकडे सत्यनारायणाची पूजा वगैरे असल्यास अवश्य कळवण्याचे करावे! :) आपला नम्र, तात्या अभ्यंकर.

शोकांतिका

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 24/04/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
का वाढत आहे ही दरी कुठे गेली माझी पावसाची परी पैंजणी नादावर नाजुक कमरेवर झुलणार्‍या नागीणींचा झालो होतो मी दास गडगडासकट वाढणार्‍या मेदाच्या मिठीत आज अडकतो आहे श्वास का वाढत आहे दरी कुठे गेली माझी पावसाची परी मादक कटाक्ष तुझे ओढ लावी उरी जड पावलांना का वाटत नाही आज यावेसे घरी खळखणार्‍या हास्याची मिठी छुरी का झाली कापणारी रामपुरी का वाढत आहे दरी कुठे गेली माझी पावसाची दरी
Taxonomy upgrade extras