मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अपुर्ण वर्तुळ

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मधे तुझी केस नेमकी माझ्या टेबलवरच यावी हा निव्वळ योगायोग नसणार. "डॉक्टर, होइल ना हो मुल"? आधी वाटले की तु चेष्टा करत आहेस. सासु समोर ओळख न दाखवता ओळख आहे का? हा प्रश्न विचारलास होतास तु. ११वी त मधल्या सुट्टीत शेपटीशी खेळत तुझ्या अनुनासीक स्वरात विचारले होतेस तु "डॉक्टर, मला तुझ्या नोटस देशील ना? माझ्या शाळेतल्या टोपण नावाने हाक मारताना आजही तु ओठ दाताखाली चावला होतास सवयीप्रमाणे. १८ वर्षात तसा तुझ्यात काहीही फरक पडला नव्हता की माझ्यात. दोन शेपट्या घालुन शाळेत गेली असतीस तर ११वी च्या वर्गात आरामात बसली असतीस. निरोप समारंभानंतर म्हणाली होतीस, "तु डॉक्टर नक्की होणारेस ना? झालास की लग्न करीन मी तुझ्याशी शाळेत कितीतरी मुली माझ्यावर मरतात हे तुला माहीत होते तरी सुद्धा. पण तुच आवडायचीस. ते प्रेम होते का? माहीत नाही. आजही नक्की सांगता येणार नाही. मी डॉक्टर झालो नाही. तु मात्र बरोबर डॉक्टर शोधलास आणि गेलीस निघुन. मी पण विसरलो तुला. आज जवळ जवळ १८ वर्षानी 'आर्टीफिशीयल इनसेमिनेशन' तुला माहीत देताना मी सुद्धा अजिबात अवघडलो नाही. शाळेचे दिवस आठवले. ______________________________________________________ दुसर्‍या दिवशी तुझा फोन आला. अर्धा तास बोललीस. सर्व माहीत परत विचारलीस. डोनर चे नाव गुप्त असते. त्यांची संपुर्ण तपासणी केल्याशिवाय नाव रजिस्टर होत नाही बॅकेत. शारीरीक, मानसीक प्रोफाईल तपासणे गऱजेचे असते. जमेल तेवढी जेनेटीक प्रोफाइल पण तयार होते ही माहीत मी तुला पुन्हा दीली. फोनवर तु माझ्या बायकोची चौकशी केलीस. तुझी चुलत बहीण शोभेल असे मी म्हणालो तर खिन्न हसलीस. मुलाचा आणि बायकोचा फोटो दाखवायची विनंती केलीस. पुढच्या तारखेला आलीस तेंव्हा तो बघीतलास. तुझा मुलगा तुझी प्रतिकृती आहेस ह्या तुझ्या शेर्‍यावर हसलो सुद्धा. तुझ्या डोळ्यात पाणी तरळले होते. कदाचीत भास असेल माझा. जाताना तु जी विनंती केलीस त्याने तर मी थक्क झालो. शक्य नव्हते ते. ----------------------------------------------------------------------------------------------- "डॉक्टर मिळेल ना हो ह्याला मुंबईच्या मेडीकल कॉलेज मधे ऍड्मिशन" परत तुझा प्रश्न. तीच मुद्रा, तोच हावभाव, तेच ओठ चावणे. आणखी १६ वर्षानंतर तु परत तशीच. माझ्यात बदल तो म्हणजे डोक्यावरच्या केसांचा रंग आणि संख्या. कुंकवाच्या जागी ती तुझी टिकली खुप त्रास देउन गेली. परत मुलाची चौकशी केलीस. त्याच्या करियर ग्राफ ने सुखावलीस. "तुम्ही सांगाल तसे करेल' तुम्ही मार्गदर्शन करा. तो मार्क काढेल. त्याने डॉक्टर व्हावे असे माझी फार इच्छा आहे." बरोबर आलेल्या तुझ्या सासुने मान डोलावली. _______________________________________________________ रिझल्ट नंतर मला भेटायला ती तुझी सासु. तु नाही आलीस. नुसता फोन केलास धन्यवाद करण्याकरता. एकेरी नावाने बोललीस. सासुने मुलाला माझ्या पाया पडायला लावले. पेढे दीले. आणि नंतर मुलाला जरा बाहेर पाठवले. आणि म्हणाली, "जीवंत राहीले तर माझ्या पणतुच्या आणि तुमच्या नातवाच्या बारशाला आमंत्रण द्यायला ऩक्की येईन हो." आता मला पाया पडा. म्हातारीला पाया पडण्यात मला काहीही त्रास नव्हता. मी पाया पडलो. "आयुष्यमान व्हा" म्हातारीने आशिर्वाद दीला. _______________________________________________________तुखरेच सांगतो. मी आजही रक्तदान न चुकता करतो. पण मी ते दान एकदाच केले होते. तुझी केस येण्याच्या आधी ४ दिवस. डोनर आला नाही म्हणुन. हा तुझा आभास असावा. किंवा तुझी आंतरीक इच्छा. का अपुर्ण वर्तुळ पुर्ण व्हायची वाट बघते आहे?

वाचने 6989 वाचनखूण प्रतिक्रिया 33

दशानन 09/04/2009 - 17:23
माय गॉड ! जबरदस्त. शब्दच नाहीत काही लिहायला वर्तुळ पुर्ण झालं !

सूहास 09/04/2009 - 19:59
............... सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

पक्या 09/04/2009 - 22:20
वा, सुंदर कथा. कथेचा शेवट काय असेल ही उत्सुकता होती. एकदम जबरदस्त शेवट !!

समिधा 09/04/2009 - 22:35
सुंदर कथा....कथेचा शेवट एकदम वेगळा. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

तरीही स्पष्ट लिहिण्यात सरांचा हात कुणी धरू शकणार नाही. अवांतरः 'आर्टिफिशियल इन्सेमिनेशन'बद्दल भारतात जागरूकता वाढायला लागली आहे ही फार चांगली गोष्ट आहे. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

अभिज्ञ 10/04/2009 - 00:19
भज्जी चा "दुसरा" म्हणतात कि काय तो हाच काय?????? प्रभुजी,महान लिहिलेय. अभिज्ञ.

In reply to by आंबोळी

हेच म्हणतो.. :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा 10/04/2009 - 15:00
गुर्जी आय सॅल्युट यू! खरंच, काय काय पाहिलं आहे हो तुम्ही ह्या आयुष्यात!!! आणि ह्या गोष्टींपासून अलिप्त राहणं म्हणजे........ अवघड आहात हेच खरं! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मुक्तसुनीत 10/04/2009 - 01:52
कथा आवडली. पूर्वायुष्यातल्या ऋणानुबंधांचे नवे रूप आणि त्यातून झालेल्या गुंतागुंती या , काहीशा ओळखीच्या पॅटर्नला नव्या जैविक तंत्रज्ञानामुळे निराळे वळण मिळाले असे वाटले. प्रभु यांची , आता ओळखीची "मिनिमॅलिस्ट" शैली थोडक्या शब्दात एकूण तथ्य व्यक्त करून जाते. मात्र अशा प्रकारच्या गोष्टींमागच्या नैतिक , भावनिक प्रश्नांवर भाष्य करत नाही. ती जबाबदारी वाचकांवर सोडते. तिची अल्पाक्षरत्वाची शक्ती मग कधीकधी त्रुटी म्हणून जाणवते.

सुंदर कथा ! वर मुक्तसुनितांच्या प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, आपल्याकडे अशा काही निमित्ताने काही भावनिक प्रश्र नक्कीच उभे राहतील असे वाटते, त्याची गुंतागुंत / प्रश्न लेखकाने जाणीवपूर्वक टाळले असतील का, असा विचार कथा संपवतांना आलाच होता. (पुन्हा आजी इतकी मॅच्युअर दाखवल्याने जरासे आश्चर्य वाटले )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसुनाना 10/04/2009 - 10:31
सुंदर कथा ! वर मुक्तसुनितांच्या प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, आपल्याकडे अशा काही निमित्ताने काही भावनिक प्रश्र नक्कीच उभे राहतील असे वाटते, त्याची गुंतागुंत / प्रश्न लेखकाने जाणीवपूर्वक टाळले असतील का, असा विचार कथा संपवतांना आलाच होता. (पुन्हा आजी इतकी मॅच्युअर दाखवल्याने जरासे आश्चर्य वाटले ) अगदी असेच म्हणतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही म्हणताय ते खरे आहे. खरे सांगतो मी फक्त रीपोर्टर आहे. भावनीक खेळात गुंतलो तर संपुन जाईन. अशा मॅच्युअर म्हातार्‍या आयुष्यात खुप बघायला मिळाल्या हे माझे भाग्य समजतो.

In reply to by विनायक प्रभू

रेवती 11/04/2009 - 05:41
भावनीक खेळात गुंतलो तर संपुन जाईन. खर आहे. अशा मॅच्युअर म्हातार्‍या आयुष्यात खुप बघायला मिळाल्या हे माझे भाग्य समजतो अश्याच मॅच्युअर आज्ज्यांबद्दल काही लिहाल का? त्यांचे विचार नविन काळाला जुळणारे कसे झाले? कधीकधी तर आपण कुठेतरी जुन्या काळात असल्यासारखं वाटेल इतके फ्रेश विचार असतात वयस्कर लोकांचे. रेवती

प्रमोद देव 10/04/2009 - 18:23
प्रभू मास्तर म्हातारे व्हायला लागलेत की काय? लक्षणं चांगली नाहीत. ;) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सँडी 11/04/2009 - 19:47
खुपच छान! -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.