Skip to main content

प्रकटन

सोसायटी आणि बॅचलर

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 04/05/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन. घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का??? मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे. घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते. मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो. घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला.

तर्कशास्त्र

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 04/05/2009 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
सुधारणा १: धनंजयने दिलेल्या प्रतिसादानंतर लेख विस्तारीत केला आहे. धनंजयच्या प्रतिसादाने खूप विचार करायला भाग पाडले. त्यामुळे वाचकांनी धनंजयचा पहिला प्रतिसाद जो "एक चांगला विषय पण लेख नीट समजला नाही. येथे वाद म्हणजे "आर्ग्युमेंट" म्हणायचे आहे की "लॉजिक" म्हणायचे आहे?

माझी गादी

लेखक निखिल देशपांडे यांनी रविवार, 03/05/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एक अतिशय फालतु लेख आहे त्या मुळे वाचणार्‍यांनी स्वः जवाबदारीवर वाचावा.) मित्रांनो ही कथा आहे एका गादीची. मला वारसाहक्काने मिळालेल्या गादिची. गेल्या काही वर्षापासुन ह्या गादिवर हक्क सांगणार्‍या लोंकामधुन आता फक्त माझा ह्या गादीवर हक्क आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ह्याच गादीसाठी आमच्या घराण्यात अनेक वेळा भांडण तंटे झाले. तर अशीही आमची गादी. काय रे कोण म्हणतोय पानाची गादी म्हणुन.

श्रेयस

लेखक दशानन यांनी शनिवार, 02/05/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण असाच आहे फाटका एमके माझ्यामध्ये देखील वेगळा कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ तर कधी दारुमुळे झालेली आबाळ मी असाच एक श्रेयस दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता अचानक दुनियादारी शिकलेला हरवलेल्या मित्रांमध्ये कधी श्री तर कधी नितीन शोधत असलेला संतोष बार च्या अंधा-या टेबलवर दुनियादारीचा हिशोब मांडलेला मीच तो एम के कधी श्रेयस असलेला !
Taxonomy upgrade extras

दुनियादारी - माझ्या नजरेने !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.

आउटस्टँडिंग

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/05/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , आउटस्टँगिंगचं विशेषण लागायला तसं अवघ्या एकोणिसावं वर्ष उघडलं .. आता "आउटस्टँडिंग " का ? तर आपण मला भेटलाय का कधी ? ह्म्म .. कळलं असेलंच .. विनंती : पुढील वाक्य टेलेब्रांडच्या मराठीमधे डब केलेल्या जाहिरातींसारखी वाचून ऐकावीत , जसा मोठा होत गेलो .. तसा लांबच लांब वाढलो .. पण फक्त उभाच .. बाकी आम्ही पाप्याचे पितर .. उंची वाढता वाढता ६ फुट क्रॉस करून गेली. ताडा-माडाचं झाड झालो .. आणि हा माझ्या "आउटस्टँडिंग" होण्याकडचा प्रवास. बाबांचा स्वभाव मुळचा विनोदी. एकदा सर्व नातेवाईक आलेले.

महाराष्ट्रधर्म

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 01/05/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी मनांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

परीचा गाव - बालकविता

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 30/04/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
परीचा गाव - बालकविता ---------------------------------- स्वप्नांच्या राज्यात परीचा गाव तिथली गंमत काय सांगू राव ? तिथले चांदणे सोनेरी उबदार उन मात्र तिथले शीतल गारगार तिथे नाही चालायचे,नुसतेच उडायचे, दिवसा घ्यायची झोप आणि रात्री खेळायचे. शाळा नाही ,अभ्यास नाही ,ढगातून फिरायचे, चंद्राच्या झुल्यावर झोके घ्यायचे. आईस्क्रिमचे डोंगर नि थम्सअपची कारंजी, कारंजात तरंगतात कांद्याची भजी नदीतून गोडसे अमृत वहात असते, काठावर गोळ्या चॉकलेट पडलेले असते. सोन्याच्या झाडाला पाचुची पाने, गोल गोल डाळिंबात माणकाचे दाणे. 'इतक्या छान गावातून परत का आला?' त्याची सुध्दा झाली मजा सांगतो तुम्हाला. डाळिंब खाताना
Taxonomy upgrade extras

अंधार चांदण्यांचा

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 30/04/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा. आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे... उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्‍यावर कोरलेली लेणी.