मी लावलं होतं एक स्थावर मालमत्तेचं झाड
त्याला कर्जाचं पाणी टाकून,
वाढवत होतो हळूहळू.
खूप निघत होता व्याजाचा घाम
चालू होतं हप्त्याचं ठिबक सिंचन
आणी रिकामी होत होती सेविंगची टाकी
वाट बघत होतो अशा एका पावसाची
ज्याने ओसंडून वाहील
पण होत नाहीत अशा गोष्टी
अचानक झाडाला पालवी फुटली
तरारुन वाढलं
एवढं की मला झोप येइना
बंद केलं ठिबक सिंचन
बास झाला घाम
आता फक्त आराम
आणि तेवढ्यात ती आली
मंदीची साथ
अगदीच अनोळखी रोग
झाड कोमेजलं
होत्याचं नव्हतं झालं
सगळं पाणी वाया गेलं
आता पुन्हा हिंमत नाही
ते झाड ते पाणी
आणि ते ठिबक सिंचन.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2297
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रभावी रूपक
व
मस्त!
ओहो, मस्त
व्वा. एक
वा!वा! मस्त
छान
झाड
सद्यस्थितीवर .........
अगदी.....!!
धन्यवाद
वास्तववादी!
वा