माझे नाव
जोवर मी लहान होतो. म्हणजे शाळेत जात असे. तोवर मला माहे नाव मुळीच आवडत नसे.
मला माझ्या आई बाबांचा खुपच राग येत असे. मला वाटायचे की, हे काय निशिगंध नाव आहे तेही मुलाचे.
नाजुक मुलीचे असल्यासारखे. कधी जर जर आजारी पडलो तरी डॉक्टर साहेब हात लावायच्या अगोदर सुचवायचे की, तुझे नाव फारच नाजुक आहे ते बदल म्हणजे तु आजारी नाही पडणार.
आणी मी नाईलाजाने एक जळजळीत नजरेने आई बाबांना खुन्नस द्यायचो. निदान निशिकांत तरी ठेवायचे.
पण आता मला निशिगंध हेच नाव खुप आवडते. कारण फक्त एकच ते म्हणजे निशिगंधाचे फुल..ते मला खुप आवडते.
पांढरे शुभ्र नाजुक असे ते फुल पाहील्यावर मला असे उगीच वाटते की मीच आहे. मग मी त्याचे गुगल वर फोटो शोधु लागलो.
पण काही केल्या ते सापडेना. खुप शोधाशोध केल्यावर चुचु ताई कडुन मला असे कळले की त्याचे इंग्रजी नाव ट्युबरोज आहे. मग पुष्कळ सापडली.
तुम्हाला तुमचे नाव आवडते का? असल्यास का?? व नसल्यास का नाही??
तुम्हाला तुमचे नाव आवडते का? असल्यास का?? व नसल्यास का नाही??
वर्गीकरण
प्रकाशचित
चुचु
मसत.
In reply to मसत. by यन्ना _रास्कला
पन
माझे नाव
धन्यवाद
मला पण माझे नाव आवडते...
मला पण माझे नाव आवडते...
In reply to मला पण माझे नाव आवडते... by वेताळ
खुप
मला पण
निशिगंध हे
_______