Skip to main content

प्रकटन

होय निगेटीव्हच

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 15/05/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापुर्वी मी लोकप्रभात आलेल्या पराग पाटील यांच्या नकारात्मक मतावर भाष्य करणार्‍या लेखावर माझा प्रतिसाद दिला होता .तोच प्रतिसाद येथे देत आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हाच लेख आज प्रतिसादाच्या रुपाने का होइना लोकप्रभात प्रकाशीत झालेला आहे.आज आलेल्या अंकात तुम्ही तो वाचु शकता. मुळ लेख- http://www.loksatta.com/lokprabha/20090501/mind.htm माझा प्रतिसाद- http://www.loksatta.com/lokprabha/20090522/vachak.htm

( णडू णको )

लेखक टारझन यांनी गुरुवार, 14/05/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , " टार्‍याच्या डोस्क्यातले " ह्या अत्यंत मनापासून विचारपुर्वक (कि विचारपश्चिमक?) लिहीलेल्या णिबंधात्मक विडंबणातला हा कितवा तरी प्रयत्न ... पचनी पाडून घ्या ... नाय तर तापलं तापलं पघा :) रंगेश्वरम ह्यांचं "के व ळ अ प्र ति म " विडंबण '(सोडू नको)' ही वाचल्यावर हिणकसगिरी सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! म्हणूनच एक मनापासून विचारपुर्वक लिहिलेलं विडंबण स्क्वेयर =)) णडू णको . . मेला निम्मा तरी चोपायचे सोडू नको! अन प्रसंगी नडग्या फोडायचे सोडू नको!
Taxonomy upgrade extras

प्रतिसाद

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 14/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद देणार्‍या त्या कंपूस उद्देशून (चाल:- प्रतिमा उरी धरोनी) प्रतिसाद मनी धरोनी कुणी लेख लिहित रहावे ते लेख निर्मितीचे विचार करोनी लिहावे उस्फुर्त भावनानी स्वप्नात गुंग व्हावे पुष्पात गंध जैसा लेखात भाव तैसा अद्वैत लिखणीचे त्यां जीवनी असावे तुम्ही सप्तरंग वाचनाचे व्हावे अनेक मतांचे विषय जीवनाचे चर्चीत कुणी बसावे का वाचकास वाटे प्रतिसाद कुणा भावे ते भावस्वप्न कुणाचे बेकार कुणी करावे प्रतिसाद मनी धरोनी कुणी लेख लिहित रहावे श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras

घाम

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 13/05/2009 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय के.एस.देवेगौडाजी, कशी आहे आपली तब्बेत. आपल्याला मस्तकशुळ झाल्याचे विविध वाहीन्यांवर पाहीले म्हणुन हा पत्रप्रपंच. मला डोके आहे असा गैरसमज झाल्यामुळे माझ्या सासुबाईंनी विशिष्ठ प्रकारांच्या फुलांचे एक तेल पाठवले होते. मस्तक शुळावर रामबाण उपाय. कुठल्या पत्यावर पाठवायचे ते व्य. नी. ने कळवा. टोकन नंबर पुकारला जात नाही म्हणुन म्हणुन मधल्या वेळेत आपण मिपा उघडले की काय? ...... आणि माझे मारुती-१, मारुती २ हे लेख वाचलेत की काय? ह्या लेखांनी काही सदस्यांना असाच मस्तकशुळ दिला होता. त्यातल्या नायिकेच्या स्वभावाशी आपले वर्तन मिळते जुळते आहे ह्या भावनेचा आपल्याला त्रास झाला असेल तर क्षमस्व.

माझी मद्रास ची सफर

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 13/05/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... मी मिपा ची एक शांत वाचक.. ईथे बरीच मंडळी धो-धो लिहीताना पाहून वाटे.. की आपणही लिहावं.. पण का कोण जाणे.. पट्कन गूगल क्रोम उघडले जाते... नी त्यात.. एक अक्षर खोडले , की पुढची अक्षरं बोंबलतात.. पण आताशा ही उर्मी जरा जास्तच उचल लागलीय... कारणे दोनः एक, पेशावर मधल्या एका गायिकेची भावांकडून हत्या.. कारण काय.. तर ती टी. व्ही. वर गाते... आणि दुसरे.. देवांनी चालु केलेली.. मद्रास ची लेखमालीका... चला... काही कारणाने सुरुवात तर होतेय... मी हे माझ्या तिथल्या वास्तव्यातले अनुभव मांडतेय... काही नव्याने माहीत झालेल्या गोष्टी... काही विचित्र वाटलेल्या.. त्यातल्या काही तर खुपच खटकलेल्या...

एका बेसावध क्षणी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 12/05/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी तुझ्या सोबतीचा किती गर्व, अभिमान होता महाराज्ञी होते जशी, जग सारे जिंकून मी चार भिंती, छत, दारे यांना घरपण दिले चांदण्याचे कवडसे अंगणात शिंपून मी चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले रंग माझे विसरले तुझ्या रंगी रंगून मी नाही घेतला मी ठाव, नाही मोजली मी खोली तुझ्या अस्तित्वात असे दिले मला झोकून मी तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी तुझ्या यशाचे मंदीर, शिखराचा तूच धनी नामदेवाची पायरी तशी दारी थांबून मी माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिन्दू तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी एक
Taxonomy upgrade extras

हक्क

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 12/05/2009 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
"मला माझ्या मुलाला साईंटीस्ट करायचे आहे, कृपया मार्गदर्शन कराल काय?" नेहमीच्या डॉक्टर,इंजीनीयर पेक्षा वेगळी अपेक्षा असलेले पालक पण भेटतात कधी कधी. " माझे नाव अजिंक्य आपटे. मी आपल्या पालक सभेला दोन वर्षापुर्वी आलो होतो. माझा मुलगा आता दहावीत जाणार आहे" अहो, पण मी ७ वीच्या मुलांसाठी पालक सभा घेत नाही.- मी " हो, मला माहीत आहे ते. मी मुख्याध्यापकांना विनंती केली होती. गेली दोन वर्षे तुम्ही शाळेत येत नाही" " शाळेने दुसरी काही तरी व्यवस्था केली आहे, त्यामुळे निमंत्रण नाही" -मी "हो आजकाल ट्र्स्टीच्या नातेवाईकांपैकी कोण तरी हा कार्यक्रम करतात. दर विद्यार्थ्यामागे २०० रुपये फी पण आकारली जाते.

बिंदू

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 12/05/2009 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणात फुलतं ओठांवर एक कुत्सित हास्य .... आणि उगारले जातात विखारी शब्दांचे भाले रोखून पाहणार्‍या डोळ्यांमधे दिसते अघोरी चमक एक असहाय्य सावज कोंडीत पकडल्याच्या उन्मादाने लखलखणारी स्वतःचं 'मी' पण सुखाउन शांत झालेलं त्यांचं मन मश्गुल होतं .....यशाच्या धुंदीत ------- आणि माझ्या मनात उमलत असतो ..रसरसलेला एक बिंदू .... तिरस्काराचा ! या आत्ममग्नांच्या कळपात राहूनही मनावर तरंगत असते एकच जाणीव " मला जायलाच हवं .." कुठे? -- कसं? काहीच माहिती नसतं पण ...
Taxonomy upgrade extras

ऍट्लास

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 11/05/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी प्रभादेवी ओलांडुन वरळीला जायच्या कोपर्‍यावर सेंचुरी मील्स चा मोनोग्राम बघितला आहे? पुर्ण पृथ्वी खांद्यावर घेतलेला आणि त्यामुळे त्रासलेला ऍटलास. ---------------------------------------------------------------------------------------------- का, हो तुम्हाला आपली नोकरी गेली तर काय होणार ह्याची भिती वाटते का? - ऑफिसला जाताना बायकोने पँटीत विंचु सोडला. नोकरी करत नाही मी. कंसलटंट आहे मी.- माझा डीफेंस. तेच ते. काय ते तुम्ही ट्ण्ट्ण करता ते उद्या नसेल तर? २ महीने जरा त्रास होईल. परत मुळ पदावरयेईल सर्व काही. तु काळजी करु नकोस. - मी आश्वासन दीले. ते कसे काय? - बायको अग हा नाही तर तो.

आई

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 10/05/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
सामंत काकांचा हा लेख वाचला आणी ही कविता सुचली.
Taxonomy upgrade extras