मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवणीतील दिवाळी !

kvponkshe ·

मदनबाण 05/11/2021 - 17:40
दिवाळीच्या रम्य आठवणी आवडल्या.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।

चौथा कोनाडा 05/11/2021 - 17:57
सुंदर स्मरणरंजन. बालपणीच्या अश्या सणाच्या आठवणी म्हणजे मौल्यवान ठेवा. कधी उघडा आणि त्या गंधाने भूतकाळाचे सुख पुन्हा उपभोगायचे.

गवि 08/11/2021 - 07:55
अगदी एका वयोगटातल्या प्रत्येकाला यातील अनेक आठवणी जशाच्या तशा येत असतील. उत्तम स्मरणरंजन. खालील काही केवळ गंमत म्हणून:
दसऱ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून सहामाही सुरु होई.
सहामाही नाई काई. सहामई किंवा सामई...!!
एक मातीचा डोंगर, त्यात पायऱ्या , आणि पायऱ्या संपल्या की थेट महाराजांचे आसन.
अगदी तंतोतंत..!! शिवाय मावळे, वाघ, सिंह, पक्षी यातील कोणीही कोणाहीपेक्षा आकाराने मोठे लहान असणे हेही. हाय टेक लोक, विशेशत: पालक डॉक्टर असतील ती पोरे इंजेक्शनची सुई पैदा करुन एक सलाईन तत्वावर कारंजेही बनवत किल्ल्यासमोर.
उरलेली सुट्टी केलेला किल्ला आवरण्यात
गुहा या नंतर सुतळीबॉम्ब लावण्यासाठीच जणू बनवलेल्या असत. आपलीच रचना खुद्द आपणच उत्साहाने बॉम्ब लावून उध्वस्त करणारे वीर म्हणजे फार रोचक व्यक्तिमत्वे असू आपण मुळातच. पुन्हा एकदा, लेख आवडला.

दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्टी, 11 वी नंतरच जास्त Enjoy केली ह्या दोन्ही सुट्टट्या, आधीच खराब असलेले अक्षर, अजून जास्त खराब करण्यातच गेल्या पाढे, परवाचे, इंग्रजी स्पेलिंग आणि शुद्नलेखन ह्या चौघांच्या खांद्यावर बसूनच, आमची सुट्टीची तिरडी निघत होती जाऊ दे नकोच त्या आठवणी ...

बबन ताम्बे 09/11/2021 - 18:37
मागच्या पिढीच्या सर्वांच्या आठवणी अशाच आहेत. फक्त तो दिवाळीचा अभ्यास ही संकल्पना ज्या कुणी काढली असेल त्याला नरकात पण जागा मिळणार नाही. स्वच्छन्दी आनन्द लुटताच यायचा नाही सुट्टीचा. आमचा एक मास्तर सहामाहीचे पेपर सोडवायला सांगायचा, ज्याचा पुढच्या टर्मला काही उपयोग नसायचा. सुट्टी संपून शाळा सुरू झाली की ज्यांनी दिवाळीचा अभ्यास लिहून आणला नाही त्यांना छड्या. नुसता छळवाद होता. लेख आवडला.

आठवणीतील दिवाळी ! दिवाळी म्हणजे सणांचा राजा ! २१ दिवस सुट्टी, फराळ , फटाके , भरपूर क्रिकेट ... आम्हा बाळ गोपाळांसाठी पर्वणीच ! पण या दिवाळीचा आनंद असा सहजासहजी मिळत नसे. त्या आधी सहामाही परीक्षेचे अग्निदिव्य पार पडावे लागे. दसऱ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून सहामाही सुरु होई. आणि बहुदा पहिला पेपर गणित किंवा इंग्रजीचा असे. म्हणजे दसऱ्याला मजा करायची सोडून आम्ही मान मोडून अभ्यास करावा अशी शाळेची अपेक्षा असे. (आम्ही शाळेच्या अपेक्षा कधीच पुऱ्या केल्या नाहीत हा भाग अलहिदा ! ). सहामाही चा शेवटला पेपर बरेचदा चित्रकलेचा असे. आणि त्याआधी भूगोलाचा.

अवघाचि संसार - अनगाव ते अंबरनाथ

राजेंद्र मेहेंदळे ·

In reply to by भीमराव

बोडस गुरुजींच्या कुटुंबाचा पुढे पत्ता लागला नाही. जे वाचले ते इथे तिथे पांगले आणि तगले. हरभट आणि रामचंद्रानंतर हिंदळ्याचा संबंधही संपलाच.

हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं

हस्तर ·
हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा खोचा असतात ह्या चित्रपटात तर दरोडेखोर सरळ सांगतो कि उत्त

अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

राजेंद्र मेहेंदळे ·
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा अवघाचि संसार - कल्याण अवघाचि संसार- पुन्हा कल्याण रामचन्द्र आणि हरभट कल्याणात पावते झाले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

तिसरी घंटा

जे.पी.मॉर्गन ·

सुरिया 30/10/2021 - 07:11
अहाहा. सुरेख. अस्सल नाट्यवेड्याची आर्त आळवणी. आवडले. आवडले काय भिडलेच. बघुयात आता दीर्घ काळानंतर कोणत्या प्रयोगाने नारळ फुटतो. आम्हीही वाट पाहत होतोच.

मनोगत आवडले, फारच मनापासून लिहिले आहे. बघू नाट्यगृहात कधी पाउल टाकायला मिळते ते पैजारबुवा,

मदनबाण 30/10/2021 - 11:56
कुठल्याही "स्क्रीन" चा उबग आल्यामुळे असेल कदाचित, पण नाट्यगृहात जाऊन एखादं नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम बघायची आस लागलेली आहे. अगदी, मला पुन्हा :- पुन्हा सही रे सही बघायची खूप इच्छा आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiqui

सौंदाळा 30/10/2021 - 16:49
उत्कृष्ट आणि समयोचित लेख परवाच महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये पण याच विषयावर एक प्रवेश होता. नाटकं बघायला आतुर आहे.

आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्‍या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान. कितीतरी महिन्यांनी - जवळपास पावणेदोन वर्षांनंतर ते पान पुन्हा रंगीबेरंगी जाहिरातींनी भरायला लागलं आहे.

रुक्मिणी-अनय संवाद

मिडास ·

चौथा कोनाडा 28/10/2021 - 12:54
रोचक चित्रदर्शी लेखन ! चित्र डोळ्यांपुढे उभं राहिलं ! +१ पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

भाग १ कोजागिरीच्या मध्यरात्री वृन्दावनातल्या सळसळत्या पिंपळ वृक्षाखाली रुक्मिणी वाट बघत होती. काही अंतरावर कालिंदी आपल्याच नादात वाहत होती. त्या मंजुळ नादात रुक्मिणी काही वेळ रमली सुद्धा असेल. पण हे मान्य करायची तिची तयारी मात्र नव्हती. लोक म्हणत हिमासारखी शुभ्र अशी ती नदी कृष्णाच्या सावळ्या रंगात रंगून कालिंदी झाली. आज पौर्णिमेच्या मध्यान्हाला चंद्र कालिंदीवर चांदणं शिंपडून तिला पूर्वीच्या रूपाची आठवण करून देत होता. पण तिचं ते रुपडं बघायला रुक्मिणीशिवाय तिथे कुणीच नव्हतं. जिथे पाहावं तिथे रुक्मिणीला कृष्णाच्या नाना लीळांच्या खुणा जाणवत होत्या.

अवघाचि संसार- पुन्हा कल्याण

राजेंद्र मेहेंदळे ·

चौथा कोनाडा 26/10/2021 - 13:16
बाप रे, या भागात खुपच घडामोडी झाल्यात !
हिंदळ्यातून निघताना हरभटांनी काळभैरवाला पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तिथल्या गाभाऱ्यातील थंडावा अनुभवला. शंभो चा नाद केला. नंदीला कुरवाळले. देवळाच्या पायऱ्यांवर बसले. ओवऱ्यातून, कोनाड्यांमधून फिरले. आता ही कदाचित शेवटचीच भेट. पुन्हा इथे येणे होते की नाही कोण जाणे. आपले पूर्वज इथे राहिले, फळले, वहिवाट केली, बागा लावल्या ,घरे बांधली, माड पोफळी रोपल्या, मुलांप्रमाणे जगवल्या. ते सगळे आता इथेच सोडून जायचे. या कल्पनेने त्यांना गलबलून आले.
हे वाचताना मलाही कातर व्ह्यायला झाले ! सुंदरच लिहिता आहात. आता प्रतिक्षा पुढच्या भागाची !

आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा अवघाचि संसार - कल्याण जांभूळपाड्यात राहण्यात आता काहीच अर्थ राहिला नव्हता कारण मुळात गावाचा आणि गावकऱ्यांचाच पत्ता नव्हता तर राहणार कुठे आणि करणार काय?

अवघाचि संसार - कल्याण

राजेंद्र मेहेंदळे ·

आनन्दा 21/10/2021 - 07:07
मस्त जमतंय.. फक्त ते नवचंडी यागाचे बघा.. नवचंडी याग करायला जास्तीत जास्त 10 ब्राह्मण आणि 1 दिवस पुरतो. हा नुसता चंडियाग म्हणालात तर सोपे होईल. सारखा 30दिवसांचा नवचंडी याग दाताखाली येत होता वाचताना.

In reply to by आनन्दा

गवि 21/10/2021 - 08:19
काळ ऊर्फ टाईमलाईन जरा विस्कळीत होते आहे. म्हणजे काही घटना निवांत तपशीलवार (कथेचे सौंदर्यस्थळ) आणि मधेच अचानक एकदम बरेच काही दोन चार वाक्यात घडून जाते. शिवाय सुरुवातीला महिना- दोन महिने तिथे राहून याग चालणार त्यात मदत करण्याचा उल्लेख आहे. एका महिन्यात याग संपन्न झाला आहे. शेवटी आठ दहा दिवसांपूर्वी जांभूळपाड्यातून (कल्याणला यज्ञासाठी) निघालो असा उल्लेख आहे. हे सर्व किरकोळ आहे. पण प्रकाशनपूर्व एका सलग वाचनाने सहज टाळता येईल. कथा फारच आवडल्याने इतके लिहीले.

आपण सर्वजण इतके आपुलकीने आणि बारकाईने वाचुन मला सुचना करताय ही माझ्या लिखाणाला मिळालेली पावतीच समजतो. धन्यवाद. संपादक मंडळींना विनंती करतो की "नवचंडी" च्या जागी "चंडी" असा बदल करावा. आणि शेवटच्या परीच्छेदात "आठ दहा दिवसांपुर्वी" च्या जागी "महिन्यापुर्वी" असे करावे. काळ साधारण १८९०-९५ पर्यंत आला आहे. जसे सुचत जाईल तसे लिहितो आहे, त्यामुळे कधी कधी पाल्हाळ होत आहे तर कधी थोडक्यात उरकल्यासारखे. हे कबुल. तरीही काही एक फ्रेम् वर्क डोक्यात तयार आहे त्यानुसार कथा पुढे जात आहे. अवांतर- आपले सगळ्यांचेच आयुष्य थोड्याफार फरकाने असेच असते नाही का? आज घडणारी एखादी छोटीशी घटना किवा प्रसंग आयुष्याची दिशा बदलु शकतो. किवा नवीन धड्याला सुरुवात होउ शकते. एखादा अपघात, गुन्हा, नैसर्गिक किवा राजकीय आपत्ती, थोर माणसाची प्रभावशाली भेट असे काहीही आयुष्याचा प्रवाह अकल्पितरित्या बदलु शकतो. तसेच इथे गोष्टीतही...

चौथा कोनाडा 24/10/2021 - 17:34
बाप रे, या भागात एकदमच कलाटणी मिळाली की !
बोडस गुरुजींचे काय झाले असेल? त्यांचे कुटुंब वाचले असेल का? असल्यास ते कुठे गेले असतील? की पुरात सगळेच वाहून गेले? घरातील इतर नोकर, गुरेढोरे यांचे काय झाले? त्यांचा तपास कसा लागेल?
आम्हालाही उत्सुकता लागली. पुढचा भाग वाचनाच्या प्रतिक्षेत !

आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा रामचा निरोप घेऊन मजल दरमजल करीत हरभट हिंदळ्यात पावते झाले तेव्हा एक नवीनच समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली होती. त्यांच्या अपरोक्ष गोंद्याने जोर करून त्यांच्या अर्ध्या बागेचा ताबा घेतला होता. तात्पुरते कुंपण वगैरे घातले होते.

कंटाळा

पाटिल ·
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.

अवघाचि संसार- जांभुळपाडा

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा 18/10/2021 - 11:15
कथा मस्तच चालू आहे. पुढे काय होणार याचा आता तरी काहीच अंदाज येत नाहीये म्हणून उत्सुकता खूपच वाढली आहे. पुभाप्र

सुक्या 20/10/2021 - 02:30
तुमच्या लिखाणात बारीक तपशील देण्याची तुमची हातोटी छान आहे. सहज म्हणुन सारी गावे गूगल मधे शोधुन रस्ता मॅप केला. आजच्या गतीमान जीवनात हे अंतर काही तासाचे आहे. त्याकाळी हेच अंतर पार करण्या साठी काय दिव्य करावे लागत असेल याची जाणीव झाली ... मस्त . ..

गवि 20/10/2021 - 07:31
कथा काहीतरी वास्तव तपशील लक्षात घेऊनच लिहीली आहे हे कळत असूनही.. अधिक विचार करता.. पनवेलीजवळ असलेल्या गावात जाण्यासाठी अलिबागहून त्याकाळी इतका खडतर रस्ता किंवा वेळखाऊ प्रवास असेल तर त्याऐवजी थेट मुंबईस उतरुन पनवेल गाठणे अधिक सोयीचे पडले असते किंवा कसे असे मनात आले.

सुबोध खरे 21/10/2021 - 10:16
एक जांभुळपाडा हे गाव खोपोली पाली रस्त्यावर आहे आणि ते पालीच्या जवळ आहे. त्यामुळे तेथे जाणारा रस्ता हा पनवेल पर्यंत जात नाही तर अलिबाग वडखळ पेण वरून मंगरूळ वरून थेट जांभूळपाड्याला जातो अर्थात दुसरा जांभुळपाडा न्हावा शेवा बंदराचे जवळ चिरनेर वरून जाताना लागतो परंतु हा पालीच्या गणपती मंदिरापासून फारच लांब आहे. मूळ कथावस्तूला धक्का लागू नये म्हणून मी या तपशीलाकडे दुर्लक्ष केले होते.

चौथा कोनाडा 22/10/2021 - 17:23
वाह, सुंदर .. ओघवती चित्रदर्शी लेखनशैली ... चित्रं डोळ्यापुढं उभी राहतात.

बोटीचा प्रवास, अलिबाग ते जांभूळपाडा बैलगाडी प्रवास वर्नान आणी पाठशाळेतील वातावरण सुंदर रंगवलंय !

आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ हरभटांनी अलिबागला जायला बोट पकडली. इतक्या दिवसांनी मुलाला भेटायला जाणार म्हणून भागीरथीबाईंनी त्यांच्या सामानात काय काय जिन्नस भरून दिले होते. खरेतर हरभटांच्या कपड्याची एकच पडशी होती आणि बाकीचे सामान सगळे रामसाठी दिलेल्या वस्तूंनीच भरून गेले होते. खरेतर भागीरथीबाईंना स्वतः च रामला भेटायची फार इच्छा होती, पण घराच्या सगळ्या रागाड्यातून त्यांचा पाय कुठे निघायला ?