Skip to main content

प्रकटन

अभियांत्रिकीचे दिवस-४.. ओरल्स..!

लेखक पाटिल यांनी सोमवार, 23/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
ओरल्सचं टाईमटेबल लागलं की नैराश्याचा भलामोठ्ठा काळाकुट्ट ढग सगळा कॅंपस व्यापून टाकायचा. ओरल्सच्या तयारीमध्ये मुख्य म्हणजे चेहऱ्यावर, डोक्यावर स्टाईल म्हणून मोठ्या प्रेमानं लागवड केलेल्या, विषुववृत्तीय जंगलाची सफाई करून, शक्य तितकं गोंडस बाळ दिसण्याचा प्रयत्न करणं आणि सकाळी-सकाळी दारोदार युनिफॉर्म उसना मागत फिरणं, या दोन गोष्टी महत्त्वाच्या.... बाकी देवाक काळजी..! काळ : आणीबाणीचा वेळ : ओढवलेली प्रसंग : ठासलेला पात्रे : फेस आलेली डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तीस-चाळीस पोरं/पोरी फायलींमध्ये माना घालून वेगवेगळ्या पोजमध्ये बसलेली. वाचता वाचता भीतीनं पोटात होणारी गुडगुड आणि सशासारखं पिटपिटणारं आपलं

विसरले नाही !

लेखक आजी यांनी सोमवार, 23/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो,मॅम, अरविंद बोलतोय." "बोल." "उद्या सहा वाजता मैफील आहे." "ह्यावेळी कोणाचं आहे गायन?.. की वादन?" "सरप्राइज." "ओके.उद्या कळेलच." "येस." अरविंदचं आणि माझं संभाषण दर मैफिलीच्या वेळी ठरलेलं. गायन किंवा वादन कुणाचं हे तो कधीच आधी सांगायचा नाही. ते ऐनवेळी कळायचं. त्याच्याकडच्या सगळ्या गानमैफिली माझ्या लक्षात आहेत. विसरण्याजोग्या नाहीतच त्या. अरविंदचं घर म्हणजे टुमदार बंगला. भोवती बाग. दृष्ट लागावी अशी देखणी. मुद्दाम आखून केलेली. डिझायनर. अरविंद आणि त्याची बायको सविता. दोघेही हसतमुख. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्याचं दुःख त्यांना नक्कीच वाटत असणार. पण ते त्यांनी कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाही.

पुस्तकगप्पा

लेखक मेघना भुस्कुटे यांनी सोमवार, 23/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. 'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण. लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

अभियांत्रिकीचे दिवस-२

लेखक पाटिल यांनी सोमवार, 16/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!'' अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.. होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच..

तुटक तुटक..

लेखक पाटिल यांनी रविवार, 15/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या उचंबळून येण्याचा प्रवाह चहुदिशांना मुक्त असतो.. पण पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ त्यांच्या मालकांपुरताच वाहतो.. २. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत.. समोर स्तब्ध पाण्याच्या पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा.. थरथरतोय अधूनमधून.. बहुतेक वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे.. झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी फांदी डोलावली... ३.

मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

लेखक एकुलता एक डॉन यांनी गुरुवार, 12/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे नमस्ते २००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते बरेच ,९९% बंद पडले त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ मनोगत मायबोली मिसळपाव इसाहित्य मराठीमाती ऐसी अक्षरे मागे वळून पाहताना बंद पडलेली मीमराठी भुंगा मराठीप्रेमी मराठीकिडे काय वाटेलते कृपया यात अधिक भर घालावी

रूटीन..

लेखक आजी यांनी सोमवार, 09/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
विषयच कंटाळवाणा असल्याने लेख कंटाळवाणा वाटू शकतो. मी खूप वर्षांपूर्वी रिटायर झाले. रिटायर व्हायला काही महिने असताना माझे सहकर्मचारी मला विचारायचे की तू रिटायर झाल्यावर वेळ कसा घालवणार? काय करणार? यावर मी उत्तर द्यायची की आधी काही काळ मला वेळ जात नाही म्हणून बोअर तरी होऊ द्या. मग बघू काय करायचं आणि कसा वेळ घालवायचा ते! रिटायर झाले आणि मनातून बरंच लिखाण करायचं राहिलं होतं ते हातावेगळं केलं. लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं. मग घरी रिकामं बसणं सुरू झालं. हळुहळू लक्षात यायला लागलं की, आपल्याला पूर्वीसारखं काही स्फुरत नाहीयै. प्रतिभा आटलीय. काही लिहिताच येत नाहीयै.

आरिगातो टोक्यो !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 08/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
आरिगातो टोक्यो ! मार्गरेट मीड नावाची अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist) होती. तिचं खूप गाजलेलं विधान होतं की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा टप्पा - आगीच्या किंवा चाकाच्या शोधापेक्षाही जास्त - माणसाच्या "मनुष्यत्वाचा" पहिला पडाव होता ते म्हणजे पहिल्या तुटलेल्या मांडीच्या हाडाचं (fractured femur) बरं होणं. मांडीचं हाड हे शरीरातलं सर्वांत मोठं हाड. ते तुटलं तर माणूस हालचाल करू शकणार नाही आणि अर्थातच तो माणूस भक्षकांसाठी सोपं भक्ष्य बनेल. बाकी कुठल्याही वन्य जीवांचा कळप अश्या कमजोर प्राण्यांना मागे ठेवून बाकी धडधाकट सदस्यांना घेऊन पुढे जातो.