मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

माझा देव

शब्दानुज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हातातल्या चावीचा जुडगा सावरत त्यातली नेहमीची चावी वेगळी केली आणि समोरच्या कुलुपाला लावली. बराचवेळा चावी फिरवूनही कुलूप काही उघडेना. शेवटी कुलुपाला धरून जोरात ओढले. कुजलेल्या बिजागरीने कुलपाची साथ सोडली आणि कुलूप हातात आले. कडीही निघून खाली पडली. आत काय असणार याचा मला पुरेपुर अंदाज होता. तरीही मनाची खात्री करून घेण्यासाठी आत डोकावून बघितले. दहा रुपयाच्या दोन नोटा एका कोप-यात पडून होत्या. दुस-या कोप-यात एक कोळी आपले जाळे मांडून बसला होता. त्या दोन नोटा बाहेर काढून मी खिशात टाकल्या आणि देव्हा-याकडे निघालो.समोरची गणेशची मुर्ती माझ्याकडे रोखून बघत होती.

आठवण एका साथीदाराची...

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो.

ध्यानधारणा ....ज्याची त्याची....

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेरणा ... विपश्यना आणि रॅन्डम मी ... https://www.misalpav.com/node/49591 ... -------- मुळात, ध्यानधारणा ही आवश्यक आहे का? माझ्या अनुभवा नुसार, ध्यानधारणा ही अत्यावश्यक आहे... मला जाणवलेले काही मुद्दे म्हणजे, आपणच आपली उन्नती करत जातो. हळूहळू का होईना पण, निश्र्चितच आपण आपल्याला ओळखायला लागतो. मनाचा मनाशी मनापासून संवाद होणे, म्हणजेच ध्यानधारणा.

विपश्यना आणि रॅन्डम मी

पाटिल ·
लेखनविषय:
(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.) १. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा‌ दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो. रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला. म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय. रिक्षातून उतरलो तर सेंटरच्या गेटवरच्या छोट्याशा हॉटेल कम् टपरीमध्ये दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे.

द विच ऑफ पोर्टोबेलो(ऐसी अक्षरे ....मेळवीन -४ )

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक –द विच ऑफ पोर्टोबेलो लेखक-पाउलो कोएलो १ इकडे पलिकडेच खफवर धारपांच्या पुस्तकांची चर्चा चालू होती.वाचनालयात धारपांची दोन तीन पुस्तक चाळली.झोपेत भूतखेत येण्याचे पर्याय दिसू लागले,पुस्तक तिथेच ठेवली.तेवढ्यात हि बया दिसली !भुतासारखी खाली वाकलेली..पांढरी फटक उघडी पाठ असलेली...मुखपृष्ठावर !लेखकही माझा आवडताच होता.काय हरकत आहे थोड धाडस केलं पाहिजेच म्हणत पुस्तक घेऊन आले. नेहमी प्रमाणे माझ्या हातात नवीन पुस्तक दिसल्याबरोबर मुलीले प्रश्न

शिवशाहीर.....

अभ्या.. ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
. काळ: असाच साधारण नव्वदीच्या आसपासचा. वय: असंच आडनिडं वडलांचा हात धरुन बाजारात फिरायचं. अक्कल: अशीच पाठ्यपुस्तकात अन घरात मिळायची तितकी. छंदः असाच गणिते टाळून घोड्यावरचे शिवाजीमहाराज काढायचा. आईवडील: असेच मध्यमवर्गीय चारचौघांसारखे. पोराचं अन त्याच्या छंदाचं कौतुक असणारे. परिस्थिती: तीही अशीच. जशी ह्या सर्व गोष्टीत असते तशी. . झालं असं की गावात एका बँकेच्या व्याख्यानमालेत तीन दिवस एक व्याख्यान चालणार होतं. बँक परिवाराची म्हणजे आपलीच. आमंत्रण होतंच पण घरटी दोन प्रवेश फक्त. मग चौघांच्या कुंटुंबात असं ठरलं की पहिल्यांदा आईसोबत मी जाईन. दुसरे दिवशी वडील माझ्या भावाला घेऊन जातील.