Skip to main content

प्रकटन

महाराष्ट्र शाहीरः नोंदी

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 05/05/2023 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
"महाराष्ट्र शाहीर" पाहिला. चित्रपटाची चित्रपट म्हणून मला चिकित्सा करण्याची अधून मधून उबळ येते, त्या अर्थाने हा रसास्वादही नाही, परीक्षणही नाही, समीक्षा तर नाहीच नाही. चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती, निरपेक्ष नीरक्षीरविवेक मांडून तपासायचे माझ्याकडून हळू हळू कमी होत आहे. एरवी स्मरणकातरतेचे मला वावडे आहे. मराठीला ग्रासलेल्या स्मरणकातरतेची उबग येते. विशेषतः मराठी चित्रपटांना एखादा हिट फॉर्म्युला सापडला की दळ दळ दळण दळतात. नॉस्टॅल्जियाचे म्हणालतर खूप मोठे मार्केट आहे. मराठी चित्रपटांना ते सतत खुणावत असतं. त्याची जाणीव ठेवूनच हा चित्रपट पाहायला घेतला.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 04/05/2023 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.

लाईफमें कभी कभी मसाला मंगता है..

लेखक आजी यांनी गुरुवार, 04/05/2023 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ झाली.भैरु उठला. न्याहरी करुन शेतावर गेला. माझीही अशीच तऱ्हा. तेच ते आणि तेच ते. "बाई मी दळण दळिते" हे खरं तर "बाई मी पीठ दळते." असं हवं. माझीही सकाळ उगवली. वाॅशरुममध्ये गेले. तोच तो ब्रश घेतला. तीच ती उदासवाण्या पांढऱ्या रंगाची पेस्ट त्यावर लावली. माझी पेस्ट ना खुशबूदार,ना झाग वाली,ना असरदार. मी दात घासले. टंग क्लिनरनं जीभ साफ केली. मग त्याच त्या वासाच्या, लवकर न झिजणाऱ्या आणि न संपणाऱ्या साबणानं चेहरा धुतला. केस नीट केले. आणि अंजनीबाईंनी केलेला तोच तो पाणचट चहा प्यायले. चहा किती बेचव,पुळकवणी!

जनोबा रेग्याचे वंशज!

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 13/04/2023 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुम्ही पू लं चे चाहते असाल तर जनोबा रेगे हा इसम/व्यक्तिरेखा तुम्हाला माहिती नाही असे होणे शक्य नाही. बटाट्याच्या चाळीतला एक अफलातून विनोद बुद्धी असणारी ही व्यक्ती. चाळीत खर म्हणजे एकापेक्षा एक नमुने आहेत, पण ह्याची बात काही औरच. ह्या व्यक्तिरेखेची 2 ठळक वैशिष्ट्ये, अत्यंत मोजक्या शब्दात विनोद निर्मिती आणि अफलातून म्हणावी अशी टायमिंग. एखादा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे त्यात सगळे गंभीरतेने चर्चा करत आहेत आणि अशा वेळी अचानकच असं काहीतरी ही व्यक्ती बोलून जाते की त्या प्रसंगाच गांभीर्य समूळ नष्ट होऊन जातं आणि चालू असणारी गोष्ट खरोखरच गांभीर्याने घ्यायची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो.

पुरते फसले.... -

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 05/04/2023 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकर हा विषय का काढला असेल राहुलने आणि तमाम तथाकथित सेक्युलर, ढोंगी पुरोगामी, हुशार विचारवंतांनी का बरे तो उगाळायचा ठरवला असेल ? 2024 मध्ये काहीही करून मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत याची यांना कुणी सुपारी दिलीय की काय ही शंका यावी !! भारतीय समाजात एक अजस्त्र ध्रुवीकरण झाले आहे. याचा थांगपत्ता मोदी विरोधकांना नाही हे अशक्य आहे. काँग्रेस पक्षाचा नेता तपस्या, रामायण, मंदिरांमध्ये पूजा, जानवे परिधान करून फोटोग्राफी असले उद्योग अन्यथा का करेल ? सगळे राजकीय प्रयत्न करून झाल्यावर ज्या कारणामुळे मतदान मोठयाप्रमाणात विभागले जात आहे ती दृश्य वाटणारी कारणे निष्प्रभ करण्याचे हे प्रयत्न होते.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 03/04/2023 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

शशक-पिंप आणि कपाट

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 03/04/2023 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्याच महिन्यांपूर्वी आम्ही विरारहुन मामाच्या खोलीत लालबागला राहायला आलो आहोत.विरारला शांतता होती, पण ही खोली रस्त्याला लागूनच आहे. मला तर अजिबात आवडली नाही ही जागा.उजाडले की रस्त्यावरचे कर्कश आवाज चालू. पण काय करणार? मला नोकरी नाही आणि आईला पण . डोक्यावर छप्पर आहे हेच महत्वाचे. शिवाय मामाकडून दर महिन्याला खर्चासाठी दहा हजार रुपये मिळतात ते वेगळेच. त्यामुळे कसेबसे भागते.त्यात खालचा सँडविचवाला अंकल मस्त आहे. माझी उधारी ठेवतो. त्यामुळे नाश्त्याची सोय होते. तिथे काम करणारी दोन मुलेसुद्धा ओळखीची झाल्येत. मेसेज केला की काय पाहिजे ते घरी आणून देतात.पण ही आई मला त्यांच्याशी बोलूच देत नाही.

दोन शशक- नीट

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 29/03/2023 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, तुम्ही नका ना त्याला सारखे सारखे टोचून बोलू. आपण दोघे डॉक्टर आहोत म्हणजे त्याने सुद्धा डॉक्टरच व्हायला पाहिजे का? एकुलता एक मुलगा आपला.नसेल त्याची इच्छा तर त्याला जे करायचे ते करू दे ना?" म्हणजे काय? एव्हढी मेहनत करून आपण हे हॉस्पिटल उभारलंय. ते कोण सांभाळणार पुढे? त्यात रशिया युक्रेनचाही पर्याय बंद झालाय. चायनाबद्दल तर बोलायलाच नको. त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला. म्हणाला "डॉक्टरसाब चिंता मत करो. आप बस जेब ढिली रखो, और कितने मार्क्स चाहिये बोलो.

गोदातीरीची ऐतिहासिक भेट.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 25/03/2023 13:53 या दिवशी प्रकाशित केले.

आज सकाळी कधी नव्हे ते, बॅडमिंटन खेळायला गेलो. पूर्वीसारखे आता नियमित खेळणे होत नाही. नेटजवळील सेटल घ्यायला जी लवचिकता आणि चपळता लागते ती आता वयांपरत्वे कमी व्हायला लागलीय. पण, मित्रांसाठी भेटीगाठी होतात म्हणून अधून-मधून बॅडमिंटन कोर्टवर जात असतो.

अलौकिक!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 23/03/2023 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी नोकरदार आणि संसारी माणसाची बऱ्याचदा "हम तो बिझी राहते है फालतू के कामो मे" अशीच अवस्था असते. त्यातही विकांताला एक सुंदर कार्यक्रम बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल, कारण रविवार सकाळ मोकळी मिळणे, घराजवळ कार्यक्रम असणे आणि चक्क फुकट पास मिळणे हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो ३ असेच झाले नाही का? तर आमच्या तबल्याच्या क्लासच्या कायप्पा ग्रुपवर एका दानशूर व्यक्तीने ही माहिती कळविली आणि पास हवे असल्यास व्य नि करण्यास सांगितले . लगेच हावरटपणा करून एक पास राखून ठेवायला विनंती केली. कार्यक्रम २ दिवस होता.पण पहिल्या दिवशी मुख्य गायन होते, आणि गाण्यातले मला काही कळत नाही.