दोन शशक- बटणाचा मोबाईल
लेखनप्रकार
शशक१-
बाबा, जाऊदेना तो जुनापुराणा बटणाचा मोबाईल आता?मी इकडे अमेरिकेत, तुम्ही काही इकडे यायला तयार नाही.आई गेल्यापासून मला सारखी तुमची काळजी लागून राहते. मी काय म्हणते? आजकाल सगळे म्हातारे लोक व्हाट्सअप वापरतात. व्हिडीओ कॉल करून मुला-नातवंडांशी छान बोलतात. तुम्हालाही मी इथून एक चांगला मोबाईल पाठवू का? हळू हळू जमेल तुम्हालापण.
अग नको पोरी , मला काही ते समजत नाही. फक्त आलेला कॉल घ्यायचा किंवा कधीतरी कॉल करायचा इतकेच जमते ते बस आहे की.
ते काही नाही बाबा.मी आता तुमचे काही ऐकणार नाही.पुढच्या आठवड्यात माझी मैत्रीण येणारे इंडियाला परत. मी पाठवतेच तुमच्यासाठी एक छान मोबाईल तिच्याबरोबर. तुम्हाला व्हाट्सअपसुद्धा शिकवेल ती. आता आपण व्हिडीओ कॉलवरच बोलू.
==================================================================================
शशक दोन-
काही महिन्यांनी -
बाबा- आजकाल तुम्ही असे घाबरेघुबरे का दिसताय? व्हिडीओकॉल वरसुद्धा काही सांगत नाही नीट.काय झालाय?मोकळेपणाने बोलत का नाही माझ्याशी?आणि हो! तुमच्या अकाऊंटमधून अचानक पन्नास हजार रुपये कोणाला दिलेत परवा?
पोरी-आग काय सांगू तुला? परवा रात्री मी उघडाच झोपलो होतो. अचानक मला एक व्हिडीओकॉल आला आणि एक नागडी बाई समोर येऊन काहीतरी अचकट विचकट चाळे करायला लागली. मी घाबरून कॉल बंद केला . मला वाटले सुटलो. पण आता तिने आमचा दोघांचा घाणेरडा व्हिडीओ बनवून पाठवलाय. ते लोक मला पैशासाठी धमक्या देत आहेत.या वयात काय ग ही बदनामी? मी खरे सांगतो मी काहीसुद्धा केले नाहीये ग. माझा बटणाचा मोबाईलच बरा होता का ग?
वाचने
7272
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
माझा बटणाचा मोबाईलच बरा होता का ग?
हे तुमचे मत आहे
In reply to हे तुमचे मत आहे by राजेंद्र मेहेंदळे
बरोबर.
2
छान आहे. पण आजोबांनी पन्नास
In reply to छान आहे. पण आजोबांनी पन्नास by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बदनामीला घाबरुनच पैसे देतात लोक
समोर बसूनही मोबाईल शिकवता येत नाही तर
In reply to समोर बसूनही मोबाईल शिकवता येत नाही तर by कंजूस
पाठवलेला मोबाईल
In reply to पाठवलेला मोबाईल by राजेंद्र मेहेंदळे
Ok
धागा 'तंत्रज्ञान' विषयाकडे वळतो आहे- जाणकारांनी खुलासा करावा
फोन बँकिंग, नेट बँकिंग, कार्डांचा वापर वगैरे विषयी सावधगिरी
सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो
In reply to सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो by राजेंद्र मेहेंदळे
नेटबँकिंग वगैरेतील 'सावधपण सर्वविषयी'
In reply to सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो by राजेंद्र मेहेंदळे
आज आपले फोटो फेसबूक इत्यादि
सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो
सेक्स्टॉर्शन टाळायला मोबाईल कसा धरावा
In reply to सेक्स्टॉर्शन टाळायला मोबाईल कसा धरावा by चित्रगुप्त
वा छान!!
In reply to वा छान!! by राजेंद्र मेहेंदळे
हो हो..
ह्म्म....
नुकत्याच घडलेल्या (शीतल म्हात्रे) व्हिडीओ मॉर्फिंग प्रकरणाच्या
In reply to नुकत्याच घडलेल्या (शीतल म्हात्रे) व्हिडीओ मॉर्फिंग प्रकरणाच्या by टर्मीनेटर
सहमत आहे!!
In reply to सहमत आहे!! by राजेंद्र मेहेंदळे
दिल्लीत काय परिस्थिती आहे, विचारू शकतो.
सरकारने पोर्नोग्राफी
In reply to सरकारने पोर्नोग्राफी by चित्रगुप्त
हम्म!!
खजुराहो / वात्सायनकालीन भारतात काय परिस्थिती होती ?
बाबौ !
टर्मीनेटर यांच्या मताशी सहमत
सर्व वाचकांचे धन्यवाद!!