दोन शशक- शबरीची बोरे
भाग-१
विकांताला मस्त ट्रेक झाला होता. दमलो होतो आणि घरी जायची ओढ लागली होती. पळस्पे फाट्यावर एस टी बसची वाट बघत उभा होतो. हा शेवटचा टप्पा नेहमीच कंटाळवाणा असतो. तेव्हढ्यात एक आजीबाई बोरे टोपलीत घेऊन विकताना दिसली. तोंडाला चाळा म्हणून तिच्याकडून थोडी बोरे विकत घेतली आणि वीसची नोट आजीबाईला दिली.तेव्हढ्यात माझी बस येताना दिसली म्हणून सॅक सावरत पळालो. आजीबाई पाठीमागे ओरडत होती, "बाळा ,सुट्टे पैसे घे रे" पण बसमध्ये जागा पकडायच्या नादात ५ रुपयाचा विचार कोण करतो? खिडकीत बसायला जागा मिळाली. बस सुरु झाली आणि खिडकीतून सहज मागे वळून पाहिले.
मिसळपाव