मायबापहो,
१० जुन पासुन मी दैनिक बोम्बाबोम्ब मधला प्रशिक्षणार्थी पत्रकार प्रमोद भोंडे (पम्या) याची डायरी मिसळपावमार्फत आपल्यापर्यंत घेवून आलो. जरी मराठी माणुस असलो अन वाचन हे माझे व्यसन असले तरी अशाप्रकारचे लिखाण मी करण्याची ही पहिलीच वेळ. अर्थातच त्यात अनेक त्रुटी होत्या. पण आपण माझा हा वानवळा गोड मानुन घेतला, रोज मी जे वेडेवाकडे लिहिले ते वाचले, माझे उदंड कौतुक केले, प्रतिसाद दिले अन प्रोत्साहनही यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत.
ही डायरी लिहीत असताना अनेक जणांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी अचुक अंदाज बांधले तर काहींनी मला तसे विचारलेही.