नमस्ते चायना !! - (३)
नमस्ते चायना !! - (१)
नमस्ते चायना !! - (२)
ते शहर जीथं मी अशा रीतीने जगलो की वाटलं की ह्यालाच जीवन ऐसे नाव !!
निंगबो.....
चेच्यांग प्रांतातील दुसर्या क्रमांकाचं आणी चायनाचं सहाव्या क्रमांकाचं शहर.
मध्य-पूर्व चायनाचं महत्त्वाचं बंदर.
माझी मलाच गंमत वाटत होती.पिंपरी पुणे टू चायना, देखा ना तुने कभी आइना...:-)
पून्हा एकदा मागचे दिवस पूढे.नवा स्टाफ,नवा बॉस्,लोक नवे,रस्ते नवे....
आणी ह्या नवलाइत मी!!
पहील्याच दिवशी एक मित्र झाला.ऑफीसच्या बिल्डींगचा बावान (सीक्युरीटी गार्ड) !!!
त्याला बॉलीवूड पटाचं विलक्षण वेड. 'आवाला हु' असं गायचा....आणी हसुन हसुन आम्ही दमायचो..
''आखे खुली हो या हो बंद'' असं म्हणत नाचायचा.साधारण माझ्याच वयाचा.त्याच्या सोबत नंतर बर्याच चायनीज डीश फस्त केलेल्या. आणी त्याला वरण-भातापासून ते हल्दीराम च्या सोन पापडी पर्यंत सारं चाखायला दिलेलं.
कधी पट्ठ्याने आपला चहा मात्र पीला नाही.अगदी आलं-विलायची घालून केलेला 'हटेला' पद्धतीचा चहा सुद्धा त्याने नाक मुरडून नको केला.
मला जो कलीग होता,तो सुद्धा नवीण.चायनीज बोलता येत नाही किंवा फार काही माहिती नाही.पण एक झालं.त्यामुळे आम्ही सार्या गोष्टी झीरो पासून शिकलो.सुरुवातीला काम एके काम चालू होत्ं.नंतर शहरात फेरफटका मारायला सुरुवात केली.बघता-बघता पीएमटीला सरावलेलो,अगदी तीतकाच इथल्या सीटीबसची सवय होत गेली.
पहिल्या दिवसापासुन निंगबो शहराने वश केलेलं.अगदी पुण्यात रहात असल्या प्रमाणेच मी इथे वास्तव्यास होतो.मुळात ऑफीस आणी घर दोन्हीही मुख्य शहरापासून किंचीतसं बाहेर.त्यामुळे शहरी गडबड-गोंधळ नसला तरी अगदीच शांतताही जाणवायची नाही.
महीन्याभरातच बॉस सोबत सुद्धा मस्त गट्टी जमली,अगदी विश्वासाने लांब -लांबची काम बॉस मला सांगायचा.६ - ७ तासाचा प्रवास म्हणजे सवयच झालेली.त्यामुळे अनहुयी,च्यांगसु प्रोव्हीयंस ला माझ्या भेटी वाढत गेल्या.
(मध्यंतरी आलेल्या मंदीमुळे भरपूर आराम दिला म्हणा!)
पण वेगवेगळ्या शहरांच्या बोली भाषेत असणारा फरक भरपूर जाणवायचा.
आपली मराठीच प्रत्येक गावाबरोबर थोडीशी बदलते,किमान उच्चारामध्ये तरी थोडासा फरक होतोच,तो साधारण आपणास जाणवतो,समजतो.... कारण ती आपली मातॄभाषा आहे.आणी ह्याच नियमाने चायनीज सुद्धा गावोगावी (म्हणण्यापेक्षा दर प्रोव्हीयंसमध्ये/शहरात बदलते) इतकी की नवीण शिकणार्याची फूल्टूस दुर्गती होउन जाते.अशाच पद्धतीने चायनीज खाद्य सुद्धा प्रोव्हीयन्स नुसार बदलत जाते.समुद्राच्या जवळपास रहाणारे द.चायना मध्ये सी फूड खाण्यावर भर दिला जातो.तर दक्षिण-पूर्वेमध्ये सी फूड बरोबरच मांस आणी काही प्रमाणात भाज्या खाल्ल्या जातात.ह्याउलट मध्य-चायना मध्ये मांस आणी उपलब्ध असणार्या भाज्या (नदीत मिळणारे जलचर) ई.वर गुजराण होते.ही सारी माझी ऐकीव माहीती आहे.कारण मला कुणी गप्पा मारणारा भेटला की त्याला मी पीडलाच म्हणुन समजा!!!
आधीच माझं चायनीज बेक्कार.त्यात मला माहीत असलेल्या शब्दा व्यतीरीक्त वेगळा शब्द कुणी बोललं की माझ्या डोक्या वरुन जायचं.
हक्काच ह्त्यार म्हणुन "थींगपूतूंग" सोबत असायचंच.(नाय समजलं!)
फॅक्टरीमध्ये तर माझ्याशी संवाद साधू इच्छीणारे वेडे होता-होता रहायचे,इतका त्यांच्यावर अत्याचार व्हायचा..
(आपला फंडा:-टेन्शन लेनेका नै, सीर्फ देणेका!! ;-) )
चायनात पोचण्यापूर्वी त्या देशाविषयी माझी काही आग्रही मत,अनुमान होती.पण इथे पोचल्यावर,इथे वावरल्यावर त्यात बदल होत गेले.
वाटलं नव्हतं की इतक्या झपाट्याने स्वतःची प्रगती केलेला देश असेन म्हणुन.इतकच काय,त्यांच्या ऑलींपीकचं यजमानपद अशा रीतीने भुषवलं की सार्या जगाने अगदी तोंड भरून त्यांच कौतुक केलेलं.
ह्याठीकाणी चायनाचा उदो-उदो करण्याचा कुठलाच हेतु नाही.पण जे पाह्यलं,जे आवडलं ते सांगावसं वाटतये..
बाकी मेड इन चायना मालाबद्दल आणी बीजींग ऑलींपीकच्या यजमानपदाविषयी अगदी सुंदर रीतीने मीनलताईने ह्या ,ह्या आणी ह्या ठीकाणी मांडलच आहे.(आपली ती कुवत नोहे!!)
मोजुन तेरा महीने मी इथे वास्तव्यास होतो,पण ते दिवस मी अगदी खर्या अर्थाने जगलो.बक्कळ मेहेनत करणं,आणी भरपूर भटकणे,हे माझे आवडीचे उद्योग असायचे.एक प्रकारचा विश्वास,दिलासा मिळाला मला इथे.स्वतःला आजमावलं मी इथेच...आणी इथे आल्यावर,राह्यल्यावर मला समजलं की घुम फीरके दुनीया गोल है !! ;-)
आपल्या प्रमाणेच ही सुद्धा माणसे आहेत!आणी भाव भावना,सुख दुख ह्या लोकाना आपल्या इतकेच महत्त्वाचे आहेत.व्यक्त करायची,सांगायची ह्यांची फारतर पद्धत वेगळी असू शकते.
एका चायनीज मित्राच्या विवाह सोहळ्याला उपस्थीत राह्यलेलो.हॉलीवूडच्या चित्रपटात शोभतील अशी सरबराई होती.आणी खरं सांगायचं झालं तर साराच सोहळा पाश्चात्य पद्धतीने झालेला.त्यानंतर चायनीज देवतेच्या वेषात आलेल्या कलाकाराने केलेली जादुगरीसुद्धा बघण्यासारखी झालेली.तो अनुभव सुद्धा मनाच्या कुपीत जपलेला आहे....;-)
बर्याच गोष्टी आयुष्यात साठवणीच्या असतात,ज्या कायम आपल्या सोबत असतात.कधीच न विसरण्यासाठी.प्रत्येक अनुभव व्यक्त करता येत नाही,तो अनुभवावाच लागतो.
मुळात माझं काम पाट्या टाकण्याचं.साहेबी थाट आपल्याला कधी जमलाच नाही,जमणारही नाही.
प्रत्येक ठीकाणी कामगार ड्रायव्हर ईत्यादीशी आधी मैत्री झाली.
नाही म्हटलं तरी एक दोन वाइट अनुभव आलेच.
एकदा बस-स्टॉपच्या स्कॅन मशीनीतुन माझी बॅग लंपास झाली.विशेष म्हणजे त्यात माझा पासपोर्ट,एम्प्लॉयमेंट कार्ड सारं होतं.
मोजुन अकराव्या मिनिटाला माझी बॅग माझ्या हातात होती.जागोजागी लावलेल्या कॅमेर्यांची कमाल किंवा पोलीसांची तत्परता.पण त्या अकरा मिनिटात माझी हालत खराब झालेली.तुटक्या फुटक्या चायनीज मध्ये तीथल्या सीक्युरीटी वाल्याला 'माझी बॅग चोरी झालीये हे सांगताना,आणी त्यात काय-काय आहे ,बॅगेचं वर्णन' कसं कुणास ठाउक मराठी-मिक्स भाषेत त्याला लगेच समजलं.आणी तत्परतेने त्यानेही हालचाली केल्या.बरं ह्या गदारोळात माझी बस निघण्याची वेळ झालेली,आता शेजारच्या चौकीत जाउन मला बॅग क्लेम करावी लागणार होती आणी त्यात माझी बस जाणार होती.पण त्यांनी माझं तीकीटही बदलून दिलं आणी पाच मिनीतात बॅगही क्लेम करून दिली.
दुसरी घटना थोडीशी आगळी वेगळीच.
शांघाय पासुन काही अंतरावरच असलेल्या एका फॅक्टरीत लोडींगसाठी गेलेलो.सारं काही व्यवस्थीत चालू असताना मध्येच कंटेनरचा ड्रायव्हर आला.थोड्या इकडच्या-तीकडच्या गप्पा झाल्यावर त्याने 'भारतात पूरूष दोन-दोन लग्न करतात' आणी अशाच प्रकारच्या बर्याच अफवा (बोलबच्चनगीरी करायला) सुरुवात केली.तीबेट प्रश्न सुद्धा त्याने ऐरणीवर आणला.अशा वेळी रक्तातली "ब्लॅक लेबल" उसळून बाहेर आली.पहीलं तर त्याचं भारताविषयी असलेले गैरसमज दूर केले.
विषय तीब्बेटचा निघाला!!
म्हटलं बाबारे तुला कितपत माहिती आहे तिबेटविषयी.म्हणे तीबेट चायनाचा हिस्सा आहे,इतकं पूरेसं आहे.
मग असा काय पीसला त्याला की सांगता सोय नाही.तीबेटच्या सर्व शीलांमध्ये, गुफांमध्ये संस्कॄत भाषेत श्लोक कोरलेले आहेत.इतकच काय बर्याच ठीकाणी हिंदु देवतांच्या मुर्त्या आहेत अशी बरीच खडाजंगी झाल्यावर जरा लायनीवर आला.
मुळात निव्वळ भारतदेशा विषयी आणी भारतीयाविषयी मनात विष असलेले बरेचशे साप पाकीस्तान प्रमाणे इकडेही आहेत असा नवा शोध त्या दिवशी लागला.
साधारण १३ महीने निंगबो शहरात वास्तव्यास होतो.
रात्र-रात्र बाहेर भटकलो.कधी कसलीच काळजी वाटली नाही.
शहर तसं भलं मोठं.कित्येकदा बीनकामी पायपीट करायची सुप्त इच्छा बळवायची.अशा वेळी कुठलीही एक दिशा पकडून सरळ निघायचो.कुणाशी एक नाही,दोन नाही.जमेल तीतकं चालत रहायचं.तास-दोन तास भटकुन झाल्यावर,टांगांनी शेवटचा सुस्कारा सोडल्यावर एखादी मोकळी जागा पकडून दिसणारी दॄष्ये बघत बसायचं!किती वेळ कुणास ठाउक!दिसणार्या प्रत्येक घटना काही ना काही आनंद नक्कीच देउन जातात.बराच वेळ असा गेल्यावर मग आपल्यालाच खबर नसायची की नेमका शहराच्या कुठल्या भागात आलो आहोत.आणी आता परतायची नक्की वाट कुठली.अशा वेळी एखाद्याला पकडून 'बाबारे मला ह्या ह्या ठीकाणी जायचय.कसं जायचं ते सांग?'
(वि सु.:- इतक्या दिवसाच्या वास्तव्यात कुठल्याही चीन्याला मदत मागीतली तर त्याने मदत केलीचये.आजच्या तारखेत जगातला सर्वात मैत्रीपूर्ण देश अशी यांची ख्याती झालीये!!)
मग कुठल्या सीटी-बसने कुठपर्यंत जायचं,कुठल्या स्टॉपला उतरून पूढे कोणत्या नंबरची बस पकडायची वगैरे कळायचं.जास्त मचमच वाटली तर सरळ टॅक्सी पकडायची,असा बेत असायचा.
आठवड्यातुन दोन-तीन वेळेस सिचुआन पद्धतीचं डीनर व्हायचं.त्या ठीकाणी हॉटेलच्या मालका पासून ते वेट्रेस आणी आतील अगदी कूक पर्यंत ओळखी झालेल्या.ऑर्डर सुद्धा प्रत्येक वेळेस द्यायची गरज नसायची.फक्त ''यांद'' (सेम) म्हटलं तरी जमून जायचं.
बर्याचदा रस्त्यात सेल्समन भेटायचे.मार्केटींग करणारे.गरज नसताना मंडई करायचे.पण त्यांच्याशी संवाद साधताना सुद्धा गंमत व्हायची.तीन-चार शहरात तर महीन्यातुन किमान एकदा जावं लागायचं आणी रात्रीचा मुक्कामसुद्धा ठरलेला असायचा.त्यामुळे तीकडे सुद्धा मॅनेजर पासुन ते एखाद दुसर्या स्टाफसोबत ओळखी झालेल्या.पण रात्रीच्या त्या मुक्कामात रूम मधील टेलीफोनची वायर सॉर्कीट मधुन काढायला कधी विसरायचो नाही.
(नाही-तर अपरात्री फोन वाजायचा आणी एखादी चायनीज शकुनीया डोक्याची मंडई करायची)
कदाचीत असं ही असु शकतं की सारं पहील्यांदाच अनुभवत असलल्याने माझ्यासाठी आठवणीचा ठेवा आहे ..
पण हा मेवा फार काळ टीकला नाही.
परचेस मधुन आमचं प्रमोशन झालं,सेल्स मध्ये .....
पोलंड आणी युक्रेन असे दोन ऑप्शन होते....
पोलंडचा व्हीसा नाय मिळाला...
आणी युक्रेनचा मिळाला...
जगातल्या सर्वात बोल्ड आणी ब्युटीफुल सुंदर्याच्या देशात...रशीयन फेडरेशन्च्या एका देशात ..आमची रवानगी झालेली...
३० एप्रिल २००९ शांघाय विमानतळावरुन कुच केलं ..नव्या मोहीमेसाठी,नव्या अनुभवांसाठी,नव्या वारीसाठी.....
(समाप्त)

वाचन
11024
प्रतिक्रिया
28