मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

व्यर्थ न हो बलिदान...

·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मरकेगाव, तालुका धानोरा. नक्षलवाद्यांनी पंधरा पोलिसांना हाल हाल करून मारलं. कुणाच्या डोळ्यात पहार खुपसली, कुणाचे हात पाय तोडले,तर कुणाच्या डोक्यात दगड घालून मेंदू बाहेर काढलेला... कुणाही जखमीला गोळी घालू नका! त्यांना दगडाने सळईने चेचून मारा असं त्या नक्षलवाद्यांचा प्रमुख ओरडून सांगत होता. लोकसत्तात आलेली ही बातमी. आज भारताला नक्की धोका कुणापासून आहे? बाहेरील देशातून आलेल्या दहशतवाद्यांकडून का स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाल्यानंतर सुद्धा नायनाट न करता आलेल्या अंतर्गत अतिरेक्यांकडून?

तेथे कर माझे जुळती !

·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मूळचे केरळचे रहिवासी असलेले रेनिल्सन आणि निशा आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलीबरोबर घरी परत जात होते.प्रवासात त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यात निशा जागीच ठार झाल्या. रेनिल्सन यांना अनेक फ्रॅक्चर्स झाली. छोट्या तमन्नाला जबर दुखापत झाली. डॉक्टरांनी तमन्नाला ब्रेन डेड घोषित केले. ही घटना 20 जानेवारीची. पत्नी अपघातात गेलेली, स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल मधे जखमी अवस्थेत अशा परिस्थितीत देखील रेनिल्सन यांनी अपूर्व मनोधैर्य दाखवत स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून तमन्नाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

विसोबा खेचर ·
राम राम मिपाकरहो, आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो! हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच!

विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन

लिखाळ ·
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, आजच सकाळी पेपरात वाचले की गुगल मुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात भर पडते आणि एकदम अश्चर्य वाटले. ती बातमी बीबीसीच्या स्थळावर वाचता येईल. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीनुसार आपण एकदा गुगलवापरुन शोध घेतला की ७ग्रॅ कर्बवायूची भर वातावरणात पडते. गुगलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सांगीतला गेलेला हा आकडा फार मोठा असून तो वास्तवात केवळ ०.२ग्रॅम इतकाच आहे. बातमीमध्ये, अमेरिकन संशोधकांच्या मते सध्या आयटीचा जागतिक कर्बवायू उत्पादनात २ टक्क्याचा वाटा आहे. तो आकडा वास्तविक काहिही असो.

उणीदुणी वाचा

घोडीवाले वैद्य ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जगभराची उणीदुणी काढणाऱ्या पत्रकारांची उणीदुणी वाचा येथे http://www.batmidar.blogspot.com/

अण्णांना मानवंदना..

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
अण्णांना मानवंदना..! इच्छुकांनी वरील संस्थळावर येऊन अण्णांना लेखी मानवंदना देण्याचे करावे.. राष्ट्रपतींच्या हस्ते अण्णांना भारतरत्न हा किताब मिळाल्यावर वरील मानवंदनांचे संकलन करून त्या पुस्तकरुपाने अण्णांना देण्याची सदर संस्थळ चालकांची योजना आहे.. आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

आपण गाणी का म्हणतो?

चित्रा ·
लेखनविषय:
इकॉनॉमिस्टच्या या महिन्याच्या अंकात एक " व्हाय म्युझिक" म्हणून एक लेख होता, त्याने लक्ष वेधले. लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे, म्हणून इथे दुवा देते. पण थोडक्यात लेखाच्या विषयाबद्दल सांगायचे तर आपल्या (माणसांच्या) आयुष्यात गायन/वादन यांचे एवढे महत्त्व का असावे यावरून मांडलेल्या विचारधारांचा हा एक मनोरंजक माहिती असलेला लेख आहे.

नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?

चेतन सुभाष गुगळे ·
लेखनविषय:
चित्रपट :- नामुमकीन (१९८९) दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी गीतकार :- आनंद बक्षी संगीतकार :- राहूल देव बर्मन गायक :- किशोर कुमार गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा अभिनेत्री :- झीनत अमान सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?

गांधी.

कलंत्री ·
लेखनविषय:
वाघ म्हटला तरी खातो वाघाबो म्ह्टला तरी खातो तर वाघ्याच का न म्हणावं? एक वाक्प्रचार. सध्या बंगालच्या वाघीणी या लेखाद्वारे आम्हाला गांधीवर इतरत्र चर्चा करा असे सांगितल्यामुळे हा वेगळा पंक्तिप्रपंच. आता मुळ विषयाकडे. गांधीबद्दल सरळसरळ चर्चा करण्यासाठी हा लेख सुरु करत आहे. काही मुद्दे मांडत आहे.