Skip to main content

माध्यमवेध

(लावू कशी पाटी मी दुकानला हो )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 29/08/2008 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
(लावू कशी पाटी मी दुकानला हो ) मुंबई व उर्वरीत महाराष्ट्रातील फलक मराठीतुन करण्याची महापालिकेने ( मनसेने ) दिलेली मुदत काल संपली.
Taxonomy upgrade extras

तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 12/08/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
बय्राच खरडींना उत्तरं देण्यापेक्षा मी जाहीर करून टाकते की आज झी २४ तास वर माझी मुलाखत दाखवणार आहेत. पण संध्याकाळी ४:३० (भारतीय वेळेनुसार)! शक्य झालं तर रेकॉर्डींग कुठेतरी उपलब्ध करून देईन, त्या वेळी हापिसातून मिपा वाचणाय्रांसाठी! यमी /अदिती / यमी आज्जी वगैरे वगैरे वगैरे! अवांतर (पण महत्त्वाचं): माझं खरं नाव संहिता जोशी आहे (आणखी एक जोसपड मिपावरची)! :-)

आयआयटीत मराठी ऐट!

लेखक एडिसन यांनी शनिवार, 09/08/2008 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आयआयटी मुंबईचा ४६वा पदवीदान समारंभ पार पडला. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या मुख्य अतिथी होत्या. या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण! आजच्या मटामध्ये आलेली ही बातमी पण हेच सांगून जाते.
विशेष म्हणजे २००८-०९ या शैक्षणिक वर्षात बी.टेक्.,एम्.टेक्.,ड्युअल डिग्री आणि पी.एच्.डी.

बत्तीस शिराळा - नागपंचमी

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 05/08/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
बत्तीस शिराळा सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील हे खेडे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिध्द होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पध्द्ती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील एक वैशिष्ठपुर्ण उत्सवाची पार रया गेली आहे. पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापुर कडे जाताना, पेठ नाका ( इस्लामपुर ) पासुन उजव्या बाजुला एक फाटा फुटतो. इथुन साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गाने समृध्द आहे. बत्तीस शिराळ्या पासुन जवळच चांदोली अभयआरण्य, चांदोली धरण आहे.

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

लेखक नंदन यांनी गुरुवार, 31/07/2008 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल. मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल. यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.

मिसळपाव आज पुणे मिरर मधे...

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 28/07/2008 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिसळपाव बद्दल टाईम्स ऑफ इन्डीयाच्या पुणे मिरर या वर्तमानपत्रात बातमी आली आहे. मिसळपावकरांनी बंगलुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जी तात्काळचर्चा केली आणि त्याला बंगलुरूवासी मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यात माहिती दिलेली आहे. मिसळपावचा एक फोटो (स्नॅपशॉट) देऊन ५ नं पानावर ही बातमी आहे. पुणे मिररचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्यामुळे बातमीचा मथळा देत आहे. Potpourri of information Misalpav.com is one the websites which has been pivotal in relaying news from the blast-torn cities of Bangalore and Ahmedabad.

मिसळपावची दखल ई-सकाळवर

लेखक पुणेरी मिसळ्पाव यांनी शनिवार, 26/07/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
बंगळूर बॉम्बस्फोटानंतर मिसळपाववर जी काही चर्चा घडली त्याची दखल थेट सकाळसारख्या माध्यमाने घेतली आणि तेही त्यांच्या ई-सकाळच्या अपडेटस्‌मध्ये. यावरून मिसळपावचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचाच प्रत्यय येतो. आपला, पु़णेरी मिसळपाव.

लास्ट लेक्चर - प्रोफेसर रँडी पॉश्च

लेखक विकास यांनी शनिवार, 26/07/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
"जेंव्हा तुम्हाला जे हवे ते मिळत नाही, तेंव्हा जे मिळते त्याला अनुभव म्हणतात...हे जगणे म्हणजे फक्त तुमची स्वप्ने साकार करणे नव्हे तर ते आपण आपल्या जीवनाचे कसे नेतृत्व करतो, या संदर्भातील आहे. जर तुम्ही तुमचे आयुष्य योग्य रीतीने पुढे नेत रहाल तर तुमची कर्मे आपोआप बाकीच्या गोष्टींची (यशाची) काळजी घेतील. आणि तुमची स्वप्ने साकार होतील." - शेवटचे भाषण (स्वैर अनुवाद "लास्ट लेक्चर")
- प्रोफेसर रँडी पॉश्च, (Randy Pausch, October 23, 1960 – July 25, 2008), कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी.

( अटी मान्य केला सर्व ह्या, )

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 22/07/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
( अटी मान्य केला सर्व ह्या, ) आज काँग्रेस प्रणीत आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावास सामोरे जात आहे. बहुमतांसाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवताना मनमोहन / सोनियाजी यांच्या मनातील ही भावना. चाल : सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ( विशेष मदत : केसु गुरुजी ) ------------------------------------------------------- अटी मान्य केला सर्व ह्या, पाठी उभा राहशील का? ॥धृ.
Taxonomy upgrade extras

फिरती इमारत - स्पीनिंग टॉवर

लेखक सहज यांनी बुधवार, 25/06/2008 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
इस्त्रायली-इटालियन वास्तु विशारद डेव्हीड फिशर यांनी एका नव्या फिरत्या इमारतीचे डिझाईन केले आहे. स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम चित्र स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम वैशिष्ट्ये ही संभाव्य ६८ मजली स्कायस्क्रॅपर मजलेवार गोलाकार फिरणारी असणार आहे. एका मजल्याचे एक आवर्तन पुर्ण होण्यास ९० मिनटे लागतील [एका मिनीटाला ६ मिटर या गतीने] व आतल्या लोकांना मळमळणार नाही :-) असे फिशर म्हणाले. प्रत्येक मजला हा "डोनटच्या" आकाराचा असणार आहे. विंड टर्बाईनच्या तंत्रज्ञानाने ही इमारत गोलाकार फिरताना स्व:ताची उर्जानिर्मीती दे