दोन घडीचा डाव, त्याला जीवन ऐसे नाव.....
हं..जगणं मरणं, मरणं जगणं सारंच अनाकलनीय, विलक्षण....
माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर..
जीवन... निरर्थक, वेडेवाकडे, कागदावर रेखाटलेल्या अर्थहिन भौमितिक रेखाकृतींसारखे
कागदावरच्या सर्वच रेषांना...नसतो अर्थ जसा....!
माझं जीवनही तसंच आहे....
मदिरेच्या प्याल्यातील शिल्लक, शेवटच्या, एकुलत्या एक थेंबासारखे ...
तृणपर्णावरुन ओघळलेल्या एकाकी दंवबिंदुसारखे ...
कपोलावर अलगद, नकळत, रेंगाळलेल्या कढत कढत कदाचित खारट आसवांसारखे ...
का जगायचे, कशासाठी जगायचे ?
जगण्यातला अर्थ जाणण्यासाठी?